कात्रणे
रोजच्या वर्तमानपत्रामधून आपण अनेक बातम्या वाचतो. राजकीय पक्षांबाबातच्या ब-याचश्या आपण वाचून सोडून देतो. रोज मरे त्याला कोण रडे ? काही वाचतो आणि उपयोगी माहिती आहे असे म्हणतो पण त्याचे करत काहीच नाही. पण जेव्हा काही करायची वेळ येते तेव्हा नेमकी ती माहिती आपल्याजवळ उपलब्ध नसते. वर्तमानपत्रही एव्हाना रद्दीत गेलेलं असतं. मग काय करणार ? यावर उपाय म्हणून मी माझ्याकडे येत असलेल्या वर्तमानपत्रातील उपयोगी कात्रणांचं सकंलन करायचे ठरवले. इतरांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून ती कात्रणे माझ्या या अनुदिनीवर देण्याचा माझा प्रयत्न आहे.
आजकाल बरीच वर्तमानपत्रं ई स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहेत. परंतु एक तर मराठी फॉन्ट्स च्या वापरात एकवाक्यता नसल्याने माझ्याकडे दिसणारे वॄत्तपत्र इतरांकडे दिसेलच असे नाही. मग यावर उपाय म्हणून ती माहिती मी इमेज फॉरमँट मध्ये परावर्तीत करायचा प्रयत्न केला. माझ्याकडे स्कँनर असल्याने ते काम सोपं होतं ; पण त्यात फाईलची व्याप्ती वाढायला लागली म्हणून मग पीडीएफीकरण करायचा प्रयत्न केला. यामुळे ब-याचश्या गोष्टी सोप्या झाल्या. एक तर फाईलची व्याप्ती थोडी कमी करता आली, शिवाय एकाच विषयावरची वेगळ्या वॄत्तपत्रातली माहीती एकत्रित माडांयची सोयही झाली.
नाहीतरी मराठीतला छापलेला प्रत्येक शब्द मला डिजीटल करायचा होताच…. चला तशी नाहीतर अशी सुरूवात तर झाली.


You are really GREAT hats off to you. Mala swatahala MARATHI khup awadate pan aajkal marathi bolnare khup thode rahile ahet. (Ha majha gair samaj aso)
Dhanyawad.
happy d
hey dude,
this is just fantastic ….quite appriciable …….
doing so for marathi …..is really great ……
keen to join …..if have some task ….
conatct @ abve
कात्रणे
तुमची आणि माझी आवड सारखीच दिसते. मला देखील कात्रणे जमवायचा लहानपणा पासून् शौक आहे. परंतु आता मी इ-कात्रणे संग्रहित करतो. हे काम अतिशय सोपे झाले आहे ते zotero हे फायरफाक्सच्या एक्सटेंशन मुळे. हे सॉफ्ट्वेअर तुम्ही http://www.zotero.org या संकेतस्थळावरून मोफत डॉउनलोड करू शकतो. सध्या मी १.५ ट्राय करीत आहे. फार उत्तम काम करते.
झोटेरोचा एक फायदा असा आहे कि नेटवर कुठल्या भाषेतील मजकूराचे कात्रण मला माझ्या संग्रहा मधे टाकता येते . उजव्या बाजूच्या पॅन मधे मी किती ही संग्रह तयार करू शकतो. डाव्या बाजूच्या पॅन मधे माझ्या स्वतंत्र नोंदी हिन्दी, ईंग्रजी किवां मराठी भाषे मधे यूनीकोड एडिटर असल्या मुळे साठविता येतात.
तुम्ही पीडिएफीकरण केलेले कारगील वरील पुस्तक सध्या बाचीत आहे.