या अनुदिनीबद्दल थोडेसे

रामराम मंडळी. डायरेक्ट मराठीमधून असा हा माझा पहीलाच ब्लॉग आहे. तेव्हा चुकभुल द्यावी घ्यावी. जर ही साइट तुम्ही ऑपेरा , फायरफॉक्स अथवा इतर कुठल्या ब्राउजर वरुन पाहात असल्यास कृपया मेन्यु मधील व्ह्यु वर क्लिक करुन तुमच्या गरजेनुसार अक्षरांचा साइज वाढवून घ्या. किंवा त्याहीपेक्षा सोपा उपाय म्हणजे तुम्ही जर ‘स्क्रोल माऊस’ वापरत असाल तर हा उपाय करा. प्रथम तुमच्या कळपटलावरील ( कीबोर्ड )’कंट्रोल’ची कळ दाबून ठेवून तुमच्या स्क्रोल माऊस ची स्क्रोल चकती तुमच्या दिशेने एकदाच फिरवा. अक्षरांचा साइज वाढेल. तुम्हाला हवा तेवढा साइज वाढेपर्यंत हा उपाय करा. या साइट वर तंत्रद्यानाशी संबधित शब्द इंग्लिश मधूनच वापरले आहेत अन्यथा वाक्यांचा क्लिष्टपणा वाढला असता. मुळात मी काही लेखिका नाही, आणि रोजच्या वाचनात इतक्या घडामोडी येत असतात, इतकी वैविध्यपूर्ण माहिती असते तीच जर जपून ठेवता आली तर उत्तम या हेतूने मी आता मला आवडलेली किंव्हा उपयुक्त वाटलेली माहिती मी इथे संकलीत करत आहे. लेखकाचे नावही लिहिलेले असेल. अधूनमधून माझेही लिखाण वाचायला मिळेलच.

13 प्रतिसाद leave one →
  1. 2007 जुलै 21

    उजवीकडे शोधाच्या खाली इंग्रजीमध्ये ‘सर्च’ हा शब्द दिसत आहे. त्यावर टिचकी दिल्यास या अनुदिनीच्या वर क्विलपॅडचा सर्च चा पर्याय उघडतो. त्यात तुम्हाला अपेक्षित असलेला शब्द ‘बरहा’ किंवा ‘गमभन’ मध्ये टाईप करता तसाच टाईप करा. ‘गो’ वर क्लिक केल्यावर , या अनुदिनीवर ज्या ज्या लेखांमध्ये तो शब्द असेल त्याची यादी दिसेल.

  2. 2008 जानेवारी 29

    mala marathi asnyacha garva aahe

    • 2009 सप्टेंबर 10
      समीर जोशी permalink

      आपल्याला गर्व (vanity, conceit, impudence, haughtiness) असे म्हणायचे आहे की अभिमान (self respect, pride, honour, self esteem, noble feeling) ? हिंदीच्या नादाला लागून आपण सुयोग्य आणि उत्तमोत्तम मराठी शब्द सोडून चुकीचे शब्द प्रयोग करतो. पण त्याबद्दल आपण दक्ष रहायला पाहिजे. इंग्रजीत आपण self respect या सद्गुणासाठी vanity किंवा conceit असा शब्द वापरू का? मग आपल्या भाषेतच आपण असे बेपर्वा का असावे? मराठी भाषा अत्यंत संपन्न भाषा असून त्यात थोड्याथोड्या फरकाने भावना आणि संवेदना व्यक्त करणारे अनेक शब्द असतात. त्यांचा आपण योग्य उपयोग करायला हवा. हिंदीच्या नादी लागून आपण स्वर्गवासी ऐवजी स्वर्गीय, मानससरोवर ऐवजी मानसरोवर, व्यग्र ऐवजी व्यस्त, अभिमान ऐवजी गर्व इत्यादी चुकीच शब्द वापरता कामा नयेत असे मला वाटते.

      • 2009 सप्टेंबर 10

        अगदी बरोबर लिहिलेत समीर, तुम्ही !

      • 2009 सप्टेंबर 10
        समीर जोशी permalink

        हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे असा आपला गैरसमज असतो. त्यामुळे हिंदी म्हणेल ती काळ्या दगडावरची रेघ असा आपल्याला हिंदी बद्दल दरारा आणि स्वभाषेबद्दल न्यूनगंड असतो. या संबंधात खालील दुव्यावर एक चांगला लेख आढळला. सर्व स्वाभिमानी मराठी मंडळींनी आवर्जून वाचावा असा हा लेख आहे.

        http://amrutmanthan.wordpress.com/2009/07/21/15/

      • 2009 सप्टेंबर 10

        वा समीर ! मस्त दुवा दिलात, धन्यवाद

      • 2009 सप्टेंबर 22
        समीर जोशी permalink

        मराठी माणसाच्या गुणावगुणांची चर्चा करणारा हा देखिल एक लेख मला आवडला.

        http://amrutmanthan.wordpress.com/2009/09/14/स्थानिक-आळशी-मराठी-माणूस/

        वाचून पहा.

  3. 2008 मार्च 10
    Atul S. Kadam permalink

    A very good website for marathi people.

  4. 2008 मार्च 10
    alkapj permalink

    website aavadali. mazyasarkhe khoop vacahak milot hich shubhechha

  5. 2009 फेब्रुवारी 22
    Vilas Umaji Tawde permalink

    Mala hi site faar awadli. Pharach chhan watle. Majhya tarphe aply sitela shubhechha, tasech sitela bhet denare divasendiwas wadhat jawot.

  6. 2009 जून 6
    shirishkumar Patil permalink

    Namaskar
    Abhinandan Aani Aabhr
    Marathi wachayla aani anubhawayla khupach
    mast watate.mi kahi jangal katha esnips.com war upload kelya aahet.
    गुगाल सर्च मध्ये जवुन Marathi jungle Katha लिहा आणि एंटर करा किंवा Shirishkumar Patil लिहा व एंटर करा .आपल्या कारिता मराठि जंगल कथा
    उपलब्ध होइल.
    Thanks

    Shirishkumar Patil

  7. 2009 सप्टेंबर 9
    Tejaswini permalink

    Good blog…keep it up

  8. 2009 नोव्हेंबर 7

    Aapli he website khoop chhan ahe. Mala tar awadlich pan ankhi anekana awadel ashi asha karto. Dhanyawaad.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS