बलुतेदार्स

2008 April 7
by माझी दुनिया

शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं असेल ना  ! की आहे तर मराठी पण अनेकवचन करताना विंग्रजीचा आधार लागावा ?

पण वाचकहो हे नाव आहे एका मराठी माणसाने चालू केलेल्या हेल्पलाइन सर्व्हिस उद्योगाचं. पूर्वी बलुतेदारी पध्दत अस्तित्वात होती हे आठवतयं ? म्हणजे गावात एकच शिंपी, एकच चांभार, एकच गवंडी अशी एका पेशाकरता एक एक च माणसं उपलब्ध असतं. थोडक्यात एका पेशाचा माणूस सगळ्या गावाची त्या कामापुरती गरज भागवायचा.  एखादे गाव वसवायचे झाले की १२ बलुतेदारांची निकड भासायची. तीच पध्दत ’बलुतेदार्स सेल्स ऍंड सर्विसेस’ च्या अनिल दळवी यांनी अवलंबली आहे. आज छोटी छोटी कामं करायला अनेकदा माणसं उपलब्ध नसतात. एकीकडे मराठी माणूस कष्टाला नाकरतो अशी ओरड होत असतानाच एका मराठी माणसानेच अश्या प्रकारे धंद्यात उतरून एक नवीन दिशा दाखवून दिली आहे. या सेवेमुळे ग्राहक आणि सेवा पुरवठादार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालू आहे. यात मराठी माणसाला प्राधान्य दिले जाणार आहे. अर्थात या अश्या प्रकारच्या अनेक सेवा सध्या कार्यरत आहेत. पण मराठी माणसाने ही उपलब्ध करून दिली असल्याने त्याचे विशेष कौतुक करावेसे वाटते. या सेवेबद्दल तुम्ही इथे वाचू शकता.

No comments yet

Leave a Reply

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS