ऑनलाईन सुरक्षा
१) ऑनलाईन खरेदी करताना, ज्या संकेतस्थळावरून खरेदी कराल; त्या संकेतस्थळाचे पान verysignsecure आहे की नाही याची खात्री करूनच खरेदी करा.
२) बॅंकाचे अकाउंट्स तपासताना ब्राऊजरच्या ऍड्रेस बार मध्ये https:// आणि ब्राउजरच्या खालच्या भागात कुलुपाची आकृती, या दोन्ही गोष्टी आहेत की नाही हे अवश्य तपासा. बॅंकेचे व्यवहार करताना या दोन्ही गोष्टी जर आढळल्या नाहीत तर तुमचे युजर आय़डी आणि पासवर्ड अजिबात टाकू नका आणि ताबडतोब तुमच्या बॅंकेशी संपर्क साधून ही माहीती त्यांना द्या. त्याकरता उघडलेल्या पानाचे URL ; ऍड्रेस बार मधून टिपून ठेवा.
शक्यतो तुम्ही नेहमी व्यवहार करत असलेल्या बॅंकेचे संकेतस्थळ / लॉगिन पेज बुकमार्क करून ठेवा आणि त्याचा वापर करूनच संकेतस्थळावर जा.
३) https:// हे सुरक्षित नेट सर्फिंगकरता वापरले जाते. ज्यायोगे डेटा १२८ बाईट्सने एनक्रिप्ट केला जातो. यामुळे ब्राउजर नेहमी पुनर्वापराकरता ज्या कुकीज सेव्ह करून ठेवतं त्या करता येत नाहीत. शिवाय बॅक हा पर्याय वापरून आपण आधीच्या पानावर सुद्धा जाऊ शकत नाही.
