वर्डप्रेसची नवी सुविधा
2009 मे 18
यापूर्वीच मी ’आयुष्य सोपं करणार्या…..’ या लेखात एक विरोपाद्वारे लेख प्रकाशित करणार्या सोयीचा उल्लेख केला होता. ब्लॉगर वर अनुदिनी असणार्यांना याची गरज नव्हती; कारण ब्लॉगर ने ही सोय सुरूवातीपासूनच देऊ केली आहे. वर्डप्रेसवर मात्र असी सोय उपलब्ध नव्हती. पण मागच्याच आठवडयात वर्डप्रेसने देखील ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे, त्या सोयीचाच वापर करून हा छोटा लेख प्रकाशित होतो का ते पाहिलं.


नीटसं समजलं नाही काय फॅसिलिटी आहे ही?
विरोपाच्या माध्यमातून अनुदिनीवर लेख प्रकाशित करणे, आलेल्या प्रतिसादांना प्रत्युत्तर देणे ही सोय नविनच वर्डप्रेसने देऊ केली आहे. याकरता वर्डप्रेसवर लॉग इन असणं गरजेचं नाही.
माफ करा पण विरोप म्हणजे काय हेच कळलेलं नाही..
विरोप म्हणजे ईमेल. ईमेल द्वारा ही सोय यापूर्वी उपलब्ध नव्हती…ती आता उपलब्ध झाली आहे.
Thanks a lot. marathi jara kachcha aahe naa mhaNun..