लिंकन, मास्तर आणि वस्तुस्थिती
अब्राहम लिंकन यांनी मास्तरांना लिहिलेलए पत्र जगप्रसिद्ध आहेच. त्याचा वसंत बापटांनी केलेला अनुवाद मी यापूर्वीच याच अनुदिनीवर टंकला होता. गेल्या ५ स्प्टेंबरला लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत याच अनुवादाला अनुसरून तंबी दुराई यांनी एक खुसखुशीत विडंबनात्मक पत्र लिहिले होते. कालच्या लोकसत्तेत मात्र अमरावतीच्या डॉ. हेमंत खडके यांनी सध्याच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर चपखल बसणारे एक पत्र मास्तरांकडून… लिंकन यांना…असे लिहिले होते. मूळ अनुवाद, तंबी दुराई यांचे विडंबन आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून मास्तरांचे लिंकन यांना पत्र ही सगळीच वाचनीय आहेत.


samrat 10:50 सकाळी on नोव्हेंबर 19, 2009 Permalink |
fantastic