बृहन् अशी बिरुदावली मिरवणार्या मुंबईत नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणूका पार पडल्या. प्रभाग पाडल्याने बरीच समीकरणे बदलली, वृत्तपत्रातील बातम्यांवरून एक कळले की तरूणाईने मतदानाकडे चक्क पाठ फिरवली. बर्याच ठिकाणी नावे यादीत सापडली नसल्याने कदाचित तरूणाईला आणि पर्यायाने त्या तरूणाईची मते मिळू शकणार्या पक्षाला याचा फटका नक्कीच बसला. पण तरीही मतदान केवळ ४५ टक्क्यांच्या आसपासच झाले. आता निवडून आलेला/ली नगरसेवक/सेविका आपल्याला हवी असलेली असो किंवा नसो, आपल्याला आणि त्यांना पुढची पाच वर्षे एकमेकांबरोबर नांदावेच लागणार. अश्यावेळी नगरपालिकेची कामे ,कायदे-कानून आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. नुसतेच मतदानाच्या वेळी सुजाण नागरिकाचे मतदानाचे पवित्र कार्य पार पाडून; नंतरची पाच वर्षे झोपून रहाण्यापेक्षा त्या त्या वेळी केलेल्या / न केलेल्या कामाचा जाब विचारणे हे जास्त योग्य. अर्थात त्याकरता आपल्याला स्वत:ला हे माहित असणे आवश्यक आहे की महानगर पालिका चालते तरी कशी? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयार केलेली ही पुस्तिका वाचून त्याचा अभ्यास करून हे काम आपण नक्कीच करू शकतो, नाही का?







धन्स ताई…. खूप उपयोग होईल या पुस्तिकेचा. डालो केलं आहे