एका लग्नात बुफे च्या ठिकाणी केलेली कलाकुसर.
याच लग्नातल्या रुखवताच्या घराचे हे विडियोज.
एका लग्नात बुफे च्या ठिकाणी केलेली कलाकुसर.
याच लग्नातल्या रुखवताच्या घराचे हे विडियोज.
माझ्या १० वर्षाच्या लेकाची चित्र तुम्ही या पूर्वी पाहिली असतीलच. कालच काढलेलं हे एक नवीन ताजं चित्र. आता ही बया कोण मला माहीत नाही…..कारण त्याने ते पुस्तकात पाहून काढायचा प्रयत्न केलाय. पहा कसा काय जमलाय !
khup chan
स्वस्त आणि मस्त!
घर सजवायचं म्हणजे प्रत्येक वेळी खिशाला तसदी दिली पाहिजे असं नाही. घरातल्या काही जुन्या वस्तूंमधूनही आपण घराची चांगली सजावट करू शकतो.
काही जुन्या झालेल्या साड्या आपण टाकून न देता नीट घड्या घालून ठेवतो. कारण त्या टाकून देण्याइतपत विटलेल्या नसतात. अशा साड्यांचे मोठे चौकोनी तुकडे कापून ते लॅम्पशेड्सना गुंडाळावेत. संध्याकाळच्या वेळेस असा रंगबिरंबी उजेड वातावरण धुंद बनवतो.
मुलांच्या डेनिम पॅण्ट्सही अशाच पडून असतात. त्याच्या शॉर्ट पॅण्ट्स कराव्यात किंवा त्यापासून ट्रेण्डी हॅण्डबॅग्ज बनवता येतील.
कॉमिक बुक्सही बरेचदा रद्दीत पडून राहतात. त्यांच्या रंगीत पानांपासून मुलांच्या खोलीसाठी सुंदर वॉलपेपर बनवता येईल.
घरात काचेच्या बाटल्या खूप झाल्या असतील तर त्या फेकून देऊ नका. त्यांच्यावर निऑन ग्लास पेण्टने डिझाइन करून बाटल्यांना अधिक आकर्षक बनवता येईल. जुनी इमिटेेशन ज्वेलरी त्यावर चिकटवून या बाटल्यांना अधिक ‘फंकी’ बनवता येईल!
- मैत्रीण टीम
महेंद्र 7:32 pm on नोव्हेंबर 22, 2009 Permalink |
सुंदर……