Posts Mentioning RSS Toggle Comment Threads | Keyboard Shortcuts

  • माझी दुनिया 3:42 pm on April 15, 2008 Permalink | प्रत्युत्तर  

    वर्षभर खूप अभ्यास (?) करून आता सुट्टीत खूप धमाल करायची असं सगळ्या बालदोस्तांनी ठरवलेलं असेलचं. माझ्या लहानपणी शेवटचा पेपर देऊन आले की पहिलं काम मी लायब्ररीत जाऊन सुट्टीच्या २ महिन्यांकरता लायब्ररी लावायचे करायचे. त्याकरता किती तरी आधीपासून फिल्डींग लावलेली असायची. वडीलांना विचारायची सोय नसायचीच म्हणून आईकडून मध्यस्ती केली जायची. त्यांनी घातलेल्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागायच्या. त्यात प्रामुख्याने आईला मदत म्हणून आणि एरवी अभ्यासाच्या नावाखाली न केली जाणारी कामं करायची अट, झालंच तर जुन्या पुस्तकांची रद्दी काढणे, वह्यांच्या उरलेल्या को-या पानांची रफ वापराकरता वही बाइंड करणे, सगळे कप्पे आवरणे, नविन इयत्तेची मैत्रीणीकडून जुनी पुस्तके आणून त्या वर्षाचा अभ्यास सुरूवातीला उत्साहाने चालू करणे ही आणि अशी अनेक फुटकळ कामं करायची अट मान्य करावीचं लागे. पण वाचनाची इतकी आवड होती की त्या एका आवडीकरता तितकी बलिदानं द्यायची तयारीही होती. त्यामानाने आजची पिढी सुदैवीच म्हणायला हवी. त्यांनी काही मागायची खोटी की सगळं काही हातात मिळतंय..किंबहुना मागयचीही गरज लागत नाहीये. अर्थात न मागता मिळणारी आजची ऎदी पिढी सुदैवी की मागूनही ब-याचदा न मिळणारी आमची कींवा आमच्या आधीची पिढी सुदैवी हे काळच ठरवेल. हा तंटा मात्र पिढीजात चालूच राहील.

    तर माझ्या वाचनाची आवड असणा-या काही बालदोस्तांकरता सकाळ बालमित्रची ही महाजालीय आवृत्ती इथे देत आहे.

    शंका समाधान, विनोद, अक्षरांतून चित्रे

     

    कोडी, चित्रे, हस्तकला, गोष्टी

     

     
  • माझी दुनिया 1:23 pm on April 15, 2008 Permalink | प्रत्युत्तर  

    मिनिएचर गार्डनमध्ये डिश किंवा ट्रे गार्डनप्रमाणेच अजून नजाकतीचा व सुंदर प्रकार म्हणजे टेरारियम. काचेतल्या हंडीत केलेली ही छोटीशी बाग कौशल्याचे काम असले, तरीही जास्त आकर्षक व टिकाऊही आहे. ……काचेतली बाग

     

    सारवलेलं पिवळधमक अंगण, तिथं असलेलं तुळशीवृंदावन, आजूबाजूची फुलझाडं अशा परसबागेचं चित्र आपल्या प्रत्येकाच्याच मनात असतं; परंतु आता काळ बदलला. शहरात फ्लॅट संस्कृती आली आणि परसबागेची जागा गॅलरीनं घेतली. ……गॅलरी बाग

     

    “रेनवॉटर हार्वेस्टींग” ही संकल्पना भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. त्याचे अनेक नमुने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बघायला मिळतात. बुंदेला चौक, तालाब, कुल, बावडी, कुंड, तलाई अश्या अनेक नावानी दिसतात……रेनवॉटर हार्वेस्टींग

     
  • माझी दुनिया 4:01 pm on April 11, 2008 Permalink | प्रत्युत्तर  

    आत्ताशी चैत्र सुरू झालाय. अजून वैशाख वणवा यायचाय. माणसाने गैरवापर करून लुटलेला निसर्ग माणसाला याची पुरेपूर कींमत मोजायला लावणार. गेली काही वर्ष महाराष्ट्र पुराने हैराण झालाय. थंडीने तर गेल्या वर्षी मुंबईतला नीचांक गाठला होता. ८० च्या घरातल्या माणसांनी सुध्दा निसर्गाचे हे रौद्र रूप यापूर्वी कधी न पाहील्याच छातीठोकपणे सांगितलं. या पार्श्वभूमीवर येणार उन्हाळा किती तलखी निर्माण करतोय माहीत नाही. पण त्यापासून वाचण्याकरता खास तज्ञांचे मार्गदर्शन लाभलेले ; वाचनात आलेले हे काही लेख.

    फलाहारी उन्हाळा

    उन्हाळ्याशी सामना

    उन्हाळ्याच्या तडाख्यापासून वाचवा मुलांना

    उन्हाळी फळे आणि आपले आरोग्य

    डॉक्टर मी काय पिऊ ?

     
  • माझी दुनिया 1:33 am on March 8, 2008 Permalink | प्रत्युत्तर  

    दरवर्षी ८ मार्च रोजी येणारा दिवस जागतिक महिला दिवस या नावाने साजरा केला जातो. या निमित्ताने वैशिष्टयपूर्ण कामगिरी करणा-या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा वेगवेगळ्या पातळीवर सन्मान केला जातो. आजकाल मिडीयाच्या एखाद्या चावून चोथा होईपर्यंत घटना दाखवत राहाण्याच्या वृत्तीमुळे हा दिवस प्रत्येक घरातल्या लहानथोरालाही माहित झालेला आहे. मग आईकरता, बायकोकरता, बहिणीकरता, मुलीकरता…त्यांना खूश करण्याकरता काहीतरी करावे या हेतूने बराचसा पुरूषवर्ग ह्या एका दिवशी झटतो. थोडक्यात या एका दिवशी निदान मुंबईसारख्या मोठ्या शहरात महिलांकरता तो एक बैल पोळा असतो. बैलपोळ्याच्या दिवशी नाही का बैलाला सजवतात..त्या दिवशी त्याला कामाला लावत नाहीत. तसाच काहीसा हा प्रकार. पण हा फक्त एकच दिवस…एरवीचं काय ? मला विरोपातून आलेला एक लेख आणि महिलादिनाचं औचित्य साधून दैनिक सकाळ ने काही कविता प्रकाशित केल्या आहेत. मला आवडलेल्या चार कविता वाचा आणि पहा काही उकल होते का ?

     
  • माझी दुनिया 2:03 pm on February 12, 2008 Permalink | प्रत्युत्तर
    Tags: ,   

    संदीप खरे यांच्या आवडत्या कवितेतली पुढची कविता आहे…

    फुंकरफुंकर

     

     
    • Vaidehi 1:21 pm on सप्टेंबर 4, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      Really touching

    • shilpa gaikwad 7:05 pm on नोव्हेंबर 5, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      very bad

    • VANESH 3:34 pm on नोव्हेंबर 20, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      tumchya pratek kavitet bhavnancha kallol asto.
      VANESH MALI

c
एक नविन पोस्ट तयार करा
j
next post/next comment
k
previous post/previous comment
r
उत्तर द्या.
e
edit
o
प्रतिक्रिया दाखवा/लपवा
t
वर जा
l
go to login
h
show/hide help
esc
cancel