Posts Mentioning RSS Toggle Comment Threads | Keyboard Shortcuts

  • माझी दुनिया 6:28 pm on February 11, 2009 Permalink | प्रत्युत्तर  

    खिचडी

    खिचडी म्हटलं म्हणजे झटपट घेणारा पुलावा, त्याबरोबर कुठलीही आमटी नको किंवा डाळ नको. चवीला लोणचं किंवा पापडच छान लागतो.

    विण्टर सूप

    एका पॅनमधे बटर गरम करून त्यात आल-लसूण पेस्ट घालून परवून घ्या. त्यात सर्व भाज्या, टोमॅटो, मिरची, पाणी आणि मीठ घालून एक उकळ काढा.

    वॉव स्ट्रॉबेरी

    फक्त उन्हाळ्यात हिलस्टेशनला जायची फॅशन केव्हाच मागे पडली आहे. सध्या ट्रेण्ड आहे तो, प्रत्येक सिझनमधे हिलस्टेशनला जाण्याचा.

    लो-कॅल ड्रिंक

    हवेत जरा गारवा वाढला की गरमागरम सुप पित टीवी बघणं. स्वेटर घालून थोडंसं फिरायला जाणं. हे होतंच. थंडी असल्यामुळे रक्ताभिसरण हळू होतं.

    शॉर्ट अॅण्ड स्वीट

    तीळ अर्धा तास दुधामधे भिजत घालावेत. नंतर ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत.

    हेल्दी सॅलड्स

    हेल्दी सॅलड्स म्हणजे कच्चा भाज्या आणि मोड आलेले दाणे. याचप्रमाणे बेबी स्पिनाच म्हणजे एकदम कोवळा पालक. फक्त साफ करून सॅलड््समधे टाकता येतो.

    झटपट आणि हेल्दी

    आजच्या रेसिपीज साध्या आणि लवकर कशा बनतील अशा आहेत. जरूर तुम्हाला फायदा होईल.

    ऑइल फ्री व्हेजस्टफ

    भरलेले बहुतेक पदार्थ तेलात किंवा तुपात तळलेले असतात. कॅलरी कॉन्शस असणाऱ्यांना ते खाता येत नाहीत. त्यामुळे हेच पदार्थ ऑइल-फ्री कसे करावेत यासाठी ऑइल फ्री व्हेजस्टफ देत आहे.

    भरलेली वांगी

    वांगी धुऊन स्वच्छ साफ करावीत. त्याला उभे दोन चिरा द्याव्यात.

    डाळ आणि घोसाळे कोफ्ता

    घोसाळे किसून घ्यावं. त्याला हळद आणि मीठ लावून निथळून घ्यावं, म्हणजे सर्व पाणी निघून जाईल. त्यानंतर मूगडाळीचं पीठ त्यात टाकून त्यावर सर्व साहित्य टाकून निट मळून घ्यावं.

    चवदार लोणची

    मोठी आठ ते दहा गोड बोरं. साखर एक टीस्पून. लिंबूरस अर्धा टीस्पून.

    सुरण-भोपळा भाजी

    अर्धा किलो सुरण अर्धा किलो भोपळा (लाल) तीन-चार हिरव्या मिरच्या दोन चमचे शेंगदाण्याचा कूट….

    मौसम सुकामेव्याचा

    प्रत्येक सिझनसाठी वेगवेगळी बेगमी करावी लागते. पावसाळ्याचा मुकाबला करण्यासाठी पापड, कुडर््या, लोणची, मुरांबे, सुकी मासळी ही रसद गोळा करून ठेवावी लागते.

    हेल्दी पराठे

    पराठा हा एक जेवणातला महत्त्वाचा घटक आहे. हा एक ब्रेड किंवा चपातीचा एक वेगळा प्रकार आहे. साधारणत: सर्व पराठे गव्हाच्या पिठापासून बनवतात. त्यामुळे शरीरास पण उपयुक्त असं ठरतं. पाश्चात्त्य देशात पण गव्हापासून बनवलेले प्रकार खाण्यास सुरुवात झाली आहे.
     
  • माझी दुनिया 5:33 pm on February 11, 2008 Permalink | प्रत्युत्तर  

     
  • माझी दुनिया 3:48 pm on September 5, 2007 Permalink | प्रत्युत्तर
    Tags: कोशिंबीर   

    [ Saturday, August 25, 2007 02:34:50 am]

    साहित्य : प्रत्येकी एक किसलेलं गाजर, बीट, काकडी, एक मोठा वाडगा ताजं गोड दही, एक चमचा साखर, चिमूटभर मीठ, चिमूटभर मिरपूड, फोडणीसाठी एक हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं. सजावटीसाठी कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटोच्या चकत्या.

    कृती : एका मोठ्या बाऊलमध्ये दही घेऊन ते चांगलं फेटावं. मग त्यात किसलेलं गाजर, बीट, काकडी, मीठ, साखर, मिरपूड घालून ते एकजीव करावं. हिरवी मिरची बारीक कापून त्यासह कढीपत्त्याची पाच-सहा पानं, पाव चमचा जिरं यांची फोडणी करावी. ती या मिश्रणात घालावी. त्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकजीव करावं. सजावटीसाठी कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटोच्या चकत्या वापराव्यात.

    - सुप्रिया तेंडुलकर, बोरीवली

     
    • fafe 9:29 pm on सप्टेंबर 5, 2007 Permalink | प्रत्युत्तर

      pl. add this and other relevant stuff to wikipedia marathi…

  • माझी दुनिया 3:18 pm on September 3, 2007 Permalink | प्रत्युत्तर  

    [ Thursday, August 23, 2007 01:02:31 am]

    साहित्य : मोनॅको बिस्किटांचा एक पुडा, १० ते १२ लाल सुक्या मिरच्या (भिजवलेल्या), एक चमचा जिरं, दोन चमचे ओलं खोबरं, सात ते आठ लसूण पाकळ्या, मीठ (ही बिस्किटं खारट असल्याने मीठ बेताने घालावं), एक इंच आलं, एक वाटी बेसन, थोडी हळद आणि थोडं तिखट.

    कृती : सुक्या मिरच्या पाण्यात भिजत घालून वाटाव्यात. त्याचबरोबर जिरं, आलं, खोबरं, मीठ, लसूण हे जिन्नसही घालावेत. एका मोठ्या भांड्यात बेसन, थोडं मीठ, हळद, तिखट घेऊन त्यात थोडं पाणी घालावं. त्याचं भजीसारखं पीठ बनवावं. दोन मोनॅको बिस्किटांच्या मध्ये लाल चटणीचा थर लावून बेसनाच्या मिश्रणात बुडवून ते तळावेत.

    - रिता नाईक, विलेपालेर्

     
  • माझी दुनिया 9:11 am on August 15, 2007 Permalink | प्रत्युत्तर  

     [ Monday, July 02, 2007 04:21:52 am]

    पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा येऊ लागतो. हा गारवा पुढे हिवाळ्यातही कायम असतो. अशा थंड हवेत पौष्टिक आहार घेणं अत्यंत आवश्यक असतं. याकामी नट्स बरीच मदत करू शकतात. नट्सच्या दुनियेतलं एक लोकप्रिय नाव म्हणजे बदाम. बदाम केवळ आपल्याकडेच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहेत. जगभरात पिकणाऱ्या बदामांपैकी ८० टक्के उत्पादनाचं श्रेय कॅलिफोनिर्याला जातं. बदामाला सर्वाधिक मागणी असते चॉकलेट बनवणाऱ्या ब्रॅण्डसकडून. जगभरात पिकणाऱ्या बदामांपैकी ४० टक्के बदाम चॉकलेट्ससाठी वापरले जातात.

    बदामांचे दोन प्रकार आहेत. ज्या झाडांना बरेचदा पांढरी फुलं येतात त्यांचे बदाम गोड असतात तर ज्या झाडांना गुलाबी फुलं येतात त्यांचे बदाम चवीला कडू असतात. विसाव्या शतकापर्यंत बदामाचं तेल औषध म्हणून वापरलं जाई. कडू बदाम हे गोड बदामांच्या तुलनेत रुंद आणि बुटके असतात. या बदामांमध्ये ५० टक्के तेल असतं. गोड बदामाचं तेल विशेषत: मालिशसाठी वापरलं जातं. या तेलामुळे कांती सतेज होते, असं म्हणतात.

    बदाम ज्याप्रमाणे कच्चे किंवा रोस्ट करून खाल्ले जातात, तसेच ते अनेक पदार्थांमध्येही वापरले जातात. इतर नट्सबरोबर ते डेझर्ट्स, सण्डेज आणि इतर आइस्क्रीम बेस्ड पदार्थांमध्ये वापरले जातात. गोड बदामांमध्ये काबोर्हायड्रेट्स अजिबात नसतात. आपल्याकडे श्रीखंड, खीर आणि हलव्यांमध्ये बदाम आवर्जून वापरले जातात. ‘बदाम कतली’ ही खास बदामापासून बनवली जाणारी मिठाई अत्यंत लोकप्रिय आहे. बदामांमध्ये केवळ मुबलक ‘ई’ जीवनसत्वच नसतं तर त्यात भरपूर मोनोसॅच्युरेटेड फॅट्सही असतात. या ‘चांगल्या’ फॅट्समुळेच कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.

    बदाम कवचाशिवाय आणि कवचासहही विकत मिळतात. आपण शक्यतो कवचविरहित बदामच घेतो. तुम्ही कवचासह बदाम घेत असाल तर ते हलवून पाहा. आवाज बराच असेल तर ते बदाम जुनाट आणि उतरलेले असल्याची शक्यता असते. ताज्या बदामाचे मधोमध दोन तुकडे करा. आतला भाग दुधासारखा पांढराशुभ्र असल्यास तो बदाम ताजा आहे, याची खात्री बाळगा. मात्र हा भाग पिवळसर असल्यास त्याची चव उतरली आहे, हे समजून जा. बदाम सालीसकटच खाल्ले जातात. परंतु कधीकधी ही साल कडूही लागते. त्यामुळे बदाम कुठल्याही पदार्थात टाकण्याअगोदर त्याची चव घेणं अत्यंत आवश्यक आहे. बदाम थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी साठवल्यास ते दोन वर्षं टिकू शकतात. पॅकबंद रोस्टेड बदामही दोन वर्षं टिकू शकतात. हे दोन्ही प्रकारचे बदाम फ्रीजमध्ये साठवल्यास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ टिकतात. नट्स अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी त्याला ओल लागता कामा नये.

    सफरचंद आणि बदामाचा हलवा

    साहित्य : चार सफरचंदांचा कीस, एक कप बदाम, पाव कप साजूक तूप, पाऊण कप साखर, दोन दालचिनीच्या काड्या, दोन हिरव्या वेलच्या, एक कप मिल्क पावडर.

    कृती : बदामाची पेस्ट बनवावी. एका जाड बुडाच्या एका पॅनमध्ये तूप गरम करावं. त्यात सफरचंद आणि साखर घालून ते परतावं. या मिश्रणाचा पोत बदलेपर्यंत ते परतावं. सफरचंदांबरोबर साखर घालणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा सफरचंदाच्या कीसचा गोळा होईल. आता त्यात दालचिनी आणि वेलची घालून परतावं. नंतर त्यात बदामाची पेस्ट घालून मोठ्या आचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी परतावं. आता आच मंद करून त्यात मिल्क पावडर घालावी. मिल्क पावडरऐवजी खवाही घालता येईल. आता तो मंद आचेवर चांगला परतावा. गरम असतानाच खायला द्यावा.

    संजीव कपूर

     
c
एक नविन पोस्ट तयार करा
j
next post/next comment
k
previous post/previous comment
r
उत्तर द्या.
e
edit
o
प्रतिक्रिया दाखवा/लपवा
t
वर जा
l
go to login
h
show/hide help
esc
cancel