4 प्रतिक्रिया

ब्लॉगिंगकरता मदत हवी आहे?


मराठी भाषेत साहित्यिकांचा दुष्काळ नाही. प्रश्न आहे तो प्रकाशकांचा. ब्लॉगच्या माध्यमातून प्रकाशनाचा देखील प्रश्न सुटला आहे. संगणकावर मराठी टंकू शकता ना! बर्‍यापैकी लिहू देखील शकता की! मग काढा ब्लॉग स्वत:चा! कशाला आपलं लेखन कुणी प्रकाशित करावं म्हणून पाय धरायचे प्रकाशकांचे. वर ते देखील उपकार केल्याच्या थाटात, आपल्याकडूनच पैसे घेऊन प्रती छापून घेणार…..त्यातल्या काही आपल्या हातावर टेकवून उरलेल्या स्वत: विकून खायला मोकळे. त्यापेक्षा आपणंच आपले लिखाण आपल्याला हवे तसे का नाही प्रकाशित करावे? काही साहित्यिक पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांचे असे देखील म्हणणे आहे की, सगळे लेखन साहित्य म्हणून मोडत नाही आणि कोणीही लिहिणारा लेखक असू शकत नाही. अहो! संत सांगून गेले आहेत “राजहंसाचे चालणे मोठे सुंदर असेलही, पण म्हणून इतरांनी काय चालूच नये?”. साहित्यिक मूल्य बिल्य ठरवण्याची भाषा लेखकांनी करूच नये. त्यांचे स्वत:चे लिखाण देखील त्यांना प्रकाशकांना पैसे देऊनच छापावे लागते हे सत्य ते देखील नाकारू शकत नाहीत.

असो, तर मुद्दा काय की, आपल्याला काही तरी मांडायचे आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे अशी इच्छा आहे. मग ब्लॉगवर का लिहू नये? आपल्यापैकी असे किती तरी जण आहेत जे उत्तम लिहू शकतात, आपणे म्हणणे योग्य शब्दांत मांडू शकतात, पण त्यांना ते ब्लॉगवर प्रकाशित करण्याचे तंत्र अवगत नाही. खास त्यांच्याकरता ही पोस्ट आहे. तुम्हाला ब्लॉगिंगकरता काही मदत हवी असल्यास मला संपर्क साधू शकता.

आपल्याला खालील कामात मी मदत करू शकेन.

  • पूर्णपणे नविन ब्लॉग तयार करणे.
  • आधीपासून असलेल्या ब्लॉगला नवे रूप देणे.
  • तुमच्या ब्लॉगबाबत एखादी पोस्ट या ब्लॉगवर प्रकाशित करणे.
  • तुमच्या ब्लॉगकरता ’कंटेंट राईटिंग’ करणे.
  • तुमच्या सहित्याचे ई-बुक बनवणे.

तुम्हाला या ब्लॉगवर जर ’गेस्ट पोस्टींग’ करायचे असेल तरीदेखील स्वागत आहे.

तुम्हाला नेमकी काय मदत अपेक्षित आहे ते मला लिहून पाठवा. खाली जो फॉर्म दिला आहे तो कृपया भरून पाठवा. आपल्याला मी नक्की संपर्क करीन.

आपल्याला नेमकी काय मदत हवी आहे?(आवश्यक)

4 comments on “ब्लॉगिंगकरता मदत हवी आहे?

  1. मला माझा ब्लॉग तयार करून माझे लिखाण प्रसिद्ध करता येईलच मी आता एक कथा संग्रह छापत आहे .तो योग्य कमिशन घेउन कोणीखपवून देईल का ? माझा पहिला कथा संग्रह मला कोणतीही आर्थिक झळ बसू न देता एका प्रकाशकाने प्रकाशित केला होता ( कथा चांगल्याच होत्या )

  2. ह्या ब्लोग मुळे मला माझे लिखाण वाचकांपर्यंत पोचवता येईल.

Leave a reply to श्रेया महेश फाटक उत्तर रद्द करा.