3 प्रतिक्रिया

माझा ब्लॉगप्रवास २


माझी स्वतःची वेब साइट सुरु झाल्याच्या आनंदात असतानाच १५ दिवसांनी मला वेब होस्टरचे इ-पत्र मिळाले की “काही कारणास्तव ही सेवा आम्ही बंद करत आहोत”. थोडक्यात आपण आपला गाशा इथून गुंडाळावा हे उत्तम. हे प्रकरण निस्तरत नाही तोच दुसरा दणका डोमेन नेम वाल्यांनी दिला की “तुम्हाला हेच नाव कायम हवे असल्यास अमूक इतके डॉलर्स भरा नाहीतर हे नाव आम्ही विकायला मुखत्यार आहोत”. आता आली का पंचाईत ! आलीया भोगासी असावे सादर…पण डॉलर्स भरायचा पर्याय मला आधीपासूनच नकॊ होता.

अधिक शोधताना मला याहू आणि गुगल च्या वेब होस्टिंग , सब डोमेन आणि डिझाईनिंगची माहीती कळली. याहू फक्त २० मेगाबाइट इतकीच जागा देऊ शकते म्हणून तो नाद सोडून दिला. प्रथमदर्शनी पाहता गुगल ची ऑफर चांगली होती.सब डोमेन , १०० मेगाबाइट जागा आणि वेब डिझाइनिंग. अर्थात त्यांचे डिझाइनिंग अगदीच बाळ्बोध धाटणीचे होते ; पण गरजवंताला अक्कल नसते या उक्ती नुसार मी माझे काम चालु केले. कालांतराने मला त्यांच्या साइटवर जाऊन , लॉग इन करुन , फाइल्स अपलोड करुन मग त्या मला हव्या तश्या मांडणे जिकीरीचे वाटू लागले. यावर उपाय म्हणून पुन्हा माझा शोध सुरु झाला. यावेळी मला ब्लॉग या प्रकाराचा शोध लागला.

सुरुवातीला हा प्रकार मला पचनी पडायला जरा वेळच लागला. कारण याची मांडणी कुठेही वेब साइट सारखी नव्हती तर एखाद्या रोजनिशीसारखे त्याचे स्वरुप होते. म्हटला तर साचेबध्द पण तरीही काही प्रमाणात “कस्टमायझेशन” करता येणारा, इमेज फाइल्स जशाच्या तशा दाखवणारा आणि मुख्य म्हणजे जागेची कमतरता जाणवू न देणारा हा प्रकार नंतर मात्र माझ्या मनाला चांगलाच भावला.

क्रमशः

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “माझा ब्लॉगप्रवास २

 1. very nice write up.you show+ed great patience.

 2. Aho Saheb, domain ani jaga fukat milte.
  domain sathi co.cc la visit kara.
  free domain detahet te lok.

  jaga denari khup sites ahet.

  Majh blog ahe : raipurem.wordpress.com

  me amaravati cha.

  Bhetun anand zala.

 3. मराठी अनुदिनी (ब्लॉग) विश्वात स्वागत आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा. तुम्ही छानच लिहिता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: