6 प्रतिक्रिया

लग्न


लग्न
– मुकुल जोशी

वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं
आवडणा-या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं
म्हणाली, चांगल्या नव-यासाठी नवस करायला गेलो होतो;
चांगला नवराच हवा होता, तर आम्ही काय मेलो होतो ?
टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला
नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला

आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण
दुस-या पुरुषाची स्तुती ऎकून झालो आम्ही पुरते हैराण
मग ऎके दिवशी आम्हाला त्याचे दर्शन झालं
विचार नुसता करत राहीलो की ह्याच्यात हिनं काय पाहीलं

एक पर्मनंट नोकरी, लग्नाकरता पुरेशी असु शकते ?
सिक्युरीटी ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरु शकते ?
शेवटी मान्य केले आम्ही , नशिबाची आहे चालच तिरकी
प्रेमासारख्या नाजूक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी

लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नव-याबरोबर ती भेटली
हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली
प्रेमाचं आम्ही विसरुन गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते
कारण आपली काही क्षणांची मैत्रीण,
ही अनंतकाळाची तिच्या नव-याची पत्नी असते.
lagna

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

6 comments on “लग्न

  1. very nice, khup surekh ase he kavya tumhi rachlet tya baddal dhanyavad, khupach chan, agadi vachun man anandi jhale ashi vinodi pan manat tassa umatnari hi kavita avismrniya rahil. kavita lihnyach jo tumhi chhand jopaslat to kharach mahti purna v tyache gungan karanya joge ahe. jamlech tar kadhi amchya id var ekhadi kavita athava lekh kahihi je tumhi rachle plz send me

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: