यावर आपले मत नोंदवा

माझा ब्लॉगप्रवास ३


ब्लॉग होस्टर शोधताना ब्लॉगर हे नाव बिनदिक्कतपणे डोळ्यासमोर येते; ते त्यातल्या नावाच्या साधर्म्यामुळेच. ब्लॉग म्हटला की तो ब्लॉगर वरच असणार हे काळ्या दगडावरच्या रेघेइतके सुस्पष्ट होते. मी सुध्दा ते प्रमाण मानून माझा पहीला ब्लॉग “नोबल स्टोरीज’ हा ब्लॉगर वरच उघडला आणि पोस्टिंग सुरु केले.

सगळे काही सुरळीत चालू होते. ब्लॉगर मध्ये मला हवा तसा इ-मेल द्वारे पोस्टिंग करता येण्याचा पर्याय उपलब्ध होता , अर्थात फक्त टेक्स्ट फाइल्स च. पण हे ही नसे थोडके असे म्हणून मी माझा हा उद्योग सुरु ठेवला.

हळूहळू पोस्टिंग्जचे प्रमाण वाढत गेल्यावर, मला माझ्या पोस्टिंग्ज विषयानुरुप मांडण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्यावर मी माझ्याच खात्यावर ; मला अभिप्रेत अश्या विषयांनुसार वेगवेगळे ब्लॉग तयार करुन त्या त्या विषयांवर पोस्टिंग्ज सुरुच ठेवली. कालांतराने हा पसारा वाढून माझा स्वतःचाच गोधंळ उडू लागला. ते सगळे ब्लॉग्ज एकत्र गुंफताना माझ्या नाकी नऊ यायला लागले. अर्थातच यावर उपाय म्हणून ; पुन्हा माझा शोध सुरू झाला आणि वर्डप्रेस या ब्लॉग होस्टरचा मला ठावठीकाणा कळला.

इथे सुध्दा नविन खाते सुरु केले. सुदैवाने तुमचे इतर ब्लॉग्ज तसेच्या तसे इंपोर्ट करायची सुविधा ब्लॉग या प्रकारात असल्याने खाते उघडल्यापासून २४ तासात वर्डप्रेस अंगवळणी पाडणे मला कठीण गेले नाही. ब्लॉगर मधल्या सगळ्या ब्लॉग्ज ची पोस्टींग्ज वर्डप्रेस वर एकत्र पण विषयानुसार विभागली गेली.

हे स्थित्यंतर झाल्यावर मग मात्र माझ्या लक्षात आले; की इ-मेल द्वारे पोस्टिंग चा पर्याय यावर सहज उपलब्ध नाही. आता काय करणार ? इकडे आड , तिकडे विहीर…चला पुन्हा शोध सुरू.

यावर उपाय म्हणून मी डीजीट मासिकाच्या फोरम मध्ये हा प्रश्न विचारला. मला त्यावर वर्डप्रेसचेच छोटेखानी सॉफ़्टवेअर डाउनलोड करायचा सल्ला मिळाला , ज्याद्वारे इ-मेल सारखे पोस्टिंग करणे शक्य झाले असते. ते ही मी केले. परंतु ते सॉफ़्टवेअर त्यांनी सांगितल्या प्रमाणे कॉन्फ़िगर करताना मात्र मला सतत अडचणी येऊ लागल्या. अशातच वर्डप्रेसच्या सॉफ़्टवेअरचे डॉक्युमेन्टेशन वाचताना मला अचानक ब्लॉगिंग करता खास सॉफ़्टवेअर असते याचा शोध लागला( हा मात्र मी शोधाशोध न करता अचानकच लागला).

क्रमशः

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: