3 प्रतिक्रिया

तहान


सुखांमागे धावता धावता, विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माश्याची मग भागत नाही तहान

स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप
वाटी – वाटीने ऒतले तरी कमीच पडते तूप

बायको आणि पोरंसाठी चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ऒतेन म्हणतो; पण मागू नका वेळ

करीयर होई जीवन , मात्र जगायचं जमेना तंत्र
बापाची ऒळख मुले सांगती पैसा छापणारं यंत्र

चुकुन सुट्टी घेतली तरी पाहुणा स्वतःच्याच घरी
दोन दिवस कौतुक होतं, नंतर डोकेदुखी सारी

मुलंच मग विचारु लागतात, बाबा अजून का हो घरी ?
त्यांचाही दोष नसतो, त्यांना सवयच नसते मुळी

क्षणिक औदासिन्य येतं, मात्र पुन्हा सुरु होतं चक्र
करीयर करीयर दळण दळता, स्वास्थ्य होते वक्र

सोनेरी वेली वाढत जातात, घराभोवती चढलेल्या
आतून मात्र मातीच्या भिंती, कधीही न सावरलेल्या

आयुष्याच्या संध्याकाळी मग जाणवू लागतं काही
धावण्याच्या हट्टापायी मुळी श्वासच घेतला नाही

सगळं काही पाहता पाहता, आरशात पाहाणं राहून गेलं
सुखाची तहान भागता भागता, समाधान दूर वाहून गेलं

copyright 2005, Mukul Joshi
mukul.joshi@gmail.com

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “तहान

  1. Namaskar. Tumachya “blog” var mazi kavita pahili. Copyright sakaT takalyabaddal dhanyavaad. Utsukata aahe ki apaN koN aahat.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: