3 प्रतिक्रिया

नावाविषयी


आज एक गंमत झाली. एका ‘माझी’ आडनावाच्या माणसाचा मला मेल आला. त्याने माझा ‘माझी दुनिया’ हा ब्लॉग बघितला. ‘माझी’ नावामुळे त्याला वाटले की हा त्याच्याच संदर्भात , त्याच्या आडनावाविषयी काही माहीती आहे की काय ? पण तसे काही न आढळल्याने त्याने मला पृच्छा केली की हे ‘माझी’ प्रकरण नक्की काय आहे ?
हा ब्लॉग जेव्हा मी सुरु केला तेव्हा त्याला नाव काय द्यायचे हा प्रश्न मला पडलाच नाही. एक तर कुणीसं म्हटलंच आहे की नावात काय आहे ? दुसरे म्हणजे तो पर्यंत इन्टरनेट वर एवढे मराठी ब्लॉग्ज असतील असे वाटलेच नव्हते. ह्या मायाजालात अनेक सुन्दर नावाचे आणि तितक्याच अर्थपुर्ण हकीकतीचे भरपुर ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. इथे आमचा काय पाड लागणार ? पण ही झाली पश्चातबुध्दी, तोपर्यंत नाव देऊन ब्लॉग तर चालु केला होताच.
कोणि म्हणेल , हे काय ‘माझी मराठी’ हे काय मुळमुळीत नाव दिले आहे ? तर कोणि “माझी म्हणजे काय तुमची एकट्याची आहे काय ?” असा लगेच अस्मिता दर्शक प्रश्न उभा करेल. पण खरं सांगु , इथे असा काही विचार माझ्या मनात आलाच नव्हता. एक तर माझा मुख्य ब्लॉग ‘माझी दुनिया’ ला अनुषंगून मी ‘माझी मराठी’ हे नाव देऊन टाकले. आणि त्याही पेक्षा एखाद्या आईला आपले मुल कितीही काळे, बेंद्रे, शेंबडे असले तरीही ते तितकेच प्रिय असते, त्याचा अभिमान असतो, तशीच काहीशी निर्भेळ भावना ह्या मागे होती. ह्या अनुषंगाने ‘सुरेश भटांची’ एक सर्वश्रुत गझल इथे लिहावीशी वाटतेय.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म, पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात तरंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलांत नांदते मराठी

येथल्या फुलाफुलांत हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरूलतांत सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “नावाविषयी

  1. marathi cha abhyas karnyasathi paripurn aahe

  2. कविता छान आहे. आवडली.

  3. माझं म्हटलं की लगेच एक आपलेपणा निर्माण होतो. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: