7 प्रतिक्रिया

राजकारण माझ्या दॄष्टीकोनातून


काल स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे शिवसेनेने जॊ काही धिंगाणा घातला तो कितपत योग्य होता ?

पुतळ्याची विटंबना हा खचितच निंदनीय आहे याबाबत माझे दुमत नाही. पण जी व्यक्ती राजकारणात स्वतः सक्रीय नव्ह्ती , आणि केवळ माननीय हिंदूहृदयसम्राटांची पत्नीपद लाभल्याने तिचा पुतळा मुळातच अशा सार्वजनिक ठीकाणी उभारायची गरज नव्हती. बर, उभारला तर उभारला, निदान पोलिसांनी आपली कामे सोडून त्या पुतळ्याची देखभाल करावी अशी चुकीची अपेक्षा तरी शिवसेनेने सरकारकडून करू नये. इतकीच काळजी होती तर स्वतःची खाजगी सुरक्षा तिथे तैनात करायला हवी होती अथवा तो पुतळा सार्वजनिक ठिकाणी न उभारता, शिवसेनाभवनात उभारायला हवा होता.

माझ्या मते माननीय श्री. राज ठाकरे यांची पध्दतशीर पणे गळचेपी करायचा घाट शिवसेनेने घातलेला आहे. नुकतेच मागच्या आठवडय़ात त्यांनी पालिकेच्या कामाविरुध्द पर्यायाने सेना-भाजप युती विरूध्द बरेच ताशेरे झाडले आणि या आठवडय़ात त्याविरोधात पालिकेवर मोर्चा काढायचे ठरवले होते. हे सगळे घडले तेव्हा ते शिवसेनेत होते हा भाग वेगळा ; पण आता ते ‘महाराष्ट्राच्या नवनिर्मिती चे’ स्वप्न घेऊन ‘दिलसे’ नव्हे तर ‘मनसे'(त) उतरले आहेत. मॉसाहेब हा त्यांच्याही जिव्हाळ्याचा विषय असल्याने, या प्रसंगी त्यांचे सहकार्य घेऊन, त्यांच्या येणा-या मोर्चातली हवाच काढून टाकायचा उद्देशही नाकारता येत नाही.

शिवसेनेतून बाहेर पडूनही , मूळ वॄत्तीशी फारकत घेता येत नसल्याने श्री. राज ठाकरे यांना अजूनही तोंड दाबून मुक्क्याचा मार सहन करावा लागेल असे दिसते.

जेव्हा ते नुकतेच शिवसेनेतून बाहेर पडले होते, त्यावेळी कोणत्या तरी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगॄहासंबंधात काही वाद निर्माण झाला होता. ती मुले आपणहून श्री. राज ठाकरे यांना भेटायला जाऊन त्यांना मदतीची विनंती केल्याचे वाचले होते. पण नंतर असे वाचनात आले की उध्दव ठाकरे यांनी त्यात लक्ष घालून त्या मुलांचा प्रश्न सोडवला होता. यावरून सुज्ञास अधिक सांगणे न लगे की राजकारणातही राजकारण चालते.

बरे, राज यांना सुध्दा कदाचित मनात नसताना त्यांच्या झेंडयावरच्या इतर रंगीय पक्षांना मदतीस घ्यावे लागले. अन्यथा रेल्वे बोर्डाच्या भरती परीक्षेवेळी ते स्वतः आंदोलनात उतरते ना. त्यांच्या पक्षाच्या झेंडयाच्या उदघाटन प्रसंगी नंतर त्यांनीही मखलाशी केली की मुंबई च्या बाहेरून येऊन स्थानिक लोकांच्या नोक-या बळकावणा-यांना विरोध आहे, इतर भाषिक स्थानिकांना नव्हे.

असो ठाकरे कुटुंबियांच्या भांडणात महाराष्ट्र चे च अस्तित्व धोक्यात येऊन तोच पुन्हा निर्माण करायला लागू नये एवढीच सदिच्छा.

<!– HMHucC7g8Lk99CJ –>

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

7 comments on “राजकारण माझ्या दॄष्टीकोनातून

 1. एक गोष्ट राहीली तुम्ही राजला शिवसेना सोडुन जाण्याची वेळ का यावी याबद्द्ल विचारणा केली आहे. त्याबद्द्ल मला वाटते की ती एक दुर्दैवी घटना आहे शिवसेनेसाठी नव्हे तर राजसाठी. आपण जेव्हा एक सैनिक काम करत असतो मग तो शिवसैनिक असो वा सीमेवरचा सैनिक असो त्यापुढे एकच ध्येय असते की आपण देशासाठी काय करु शकतो

  तो असा विचार करत नसतो की “देश माझ्यासाठी काय करत आहे”

  दुसरी गोष्ट उध्धवसाहेबांना कार्याध्यक्ष करण्याची शिफारस राजसाहेबांनीच केली होती हे आपणास माहीत आहे?

 2. एक शिवसैनिक व एक मराठी माणूस

  मी मनाली व आशिषच्या मताशी सहमत आहे. मला एक समजत नाही तुम्ही शिवसेनेवर टीका कशी करु शकता ते. हा हे मान्य की काही गोष्टी चुकत असतील शिवसेनेमधे शेवटी शिवसेना एक संघटना आहे पण आज जगात एक ही अशी संघटना सापडणे अवघड आहे की जिथे एका वाघाचा एकछत्री अंमल आहे. आज महाराष्ट्रामधे शिवसेना आहे म्हणून महाराष्ट्र जिवंत असल्यासारखा वाटत आहे नाहीतर हे नपुसंक काग्रेसजण मुस्लीमाचे चोचले पुरविण्यात मग्न असतात.

  अरे या हिन्दुस्थानात राष्टीय एकात्मता आहे ना मग या राज्यात व भारत देशात हिन्दु पण आहेत त्यासाठी काहीतरी केलेले काम बोला. मग शिवसेनेचे नाव काढा.

  मातेचा अपमान सहन करणारा षंढ असला पाहीजे. मग ती पुतळा विटंबनेची घटना तर परमपुज्य मातोश्री मीनाताइच्या पुतळ्याची होती. मग शिवसैनिक पेटुन उठणार नाहीत तर मग काय पोलिसाना निवेदन देणार?

  तिकडे बाबरी मशीद पडली / तर पाडली असा आरोप झाला तर कोणावर शिवसैनिकावर त्यावर बाळासाहेबांचे वाक्य काय होते माहीत आहे त्यावेळी या नेत्याचे नव्हे तर आपल्या शिवसैनिकाना वारयावर न सोड्ण्यारया व आपल्या शिवसैनिकावर प्रेम करणारया वाघाचे शब्द होते की “ती जर शिवसैनिकानी पाड्ली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे”

  तरी या वाघावर टीका करताना किवा शिवसेनेवर तसेच शिवसैनिकावर टीका करताना हजार वेळा विचार करावा हि विनंती

  आपण ही शिवसैनिक आहात असे म्हणता तर टीका करणे टाळून त्यावर उपाय सुचविला तर फार चांगले होईल असे मला वाटते

  धन्यवाद

 3. आशिष,

  हा निर्णय घेताना ’राज’ यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची आपण कल्पनाच न केलेली बरी.

  मी आपल्याला हाच प्रश्न उलट पध्दतीने विचारते की ज्या शिवसेनेकरता राज यांनी रक्त आटवले, कळायला लागल्यापासून शिवसेनेव्यतिरीक्त दुसरा पक्ष न मानणा-या राज यांना असा निर्णय घ्यायची वेळ का यावी ? कार्यालयातल्या एखाद्या मान मोडून काम करणा-या माणसाला त्याची सिनिऑरीटी नाकारून जर साहेबाच्या एखाद्या नातेवाईकाला जर इखादे पद दिले गेले की अपमानाचे शल्य जास्त असते. पण त्याचवेळी आपल्याच साहेबाविरुध्द आपण कोणतीही ऍक्शन घेऊ शकत नाही. हा अपमान पचवूही शकत नाही. मग अश्या वेळी केवळ आपला मार्ग वेगळा करणे या व्यतिरीक्त मार्ग रहात नाही.

  राज महाराष्ट्रातल्या जनतेची साथ ते निभावतील की नाही हा भाग अलहिदा, ते काळच ठरवेल.

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: