यावर आपले मत नोंदवा

आम्ही ती स्मशाने….


आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेत ही न वाली !

मुंबईतले कालचे भीषण बॉंबस्फोट हे मुंबईच्या बकाल जीवनाची ग्वाही देणारे
आहेत. एवढी मनुष्यहानी होऊ शकणारी स्फोटके खुलेआम मुंबईत आणली जातात तेव्हा स्कॉटलंड यार्ड नंतर दुस-या क्रमांकावरच्या मुंबईच्या पोलिसखात्याला साधा पत्ता सुध्दा लागू नये ?

काही मूठभर जिहादी एवढ्या मोठ्या हिंदुस्थानाला कसे त्यांच्या इशा-यावर
नाचवत आहेत ? हिंदुस्थानात हिंदूच आता अल्पसंख्याक झाले आहेत.

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि सगळ्या सुखसोयी हात जोडून उभ्या असणा-या आमच्या मुंबापुरीत प्रत्येक मुंबईकर भरडला जातॊ आहे. आधी निसर्गनिर्मित आणि आता मानवनिर्मित संकटांना तोंड देताना आम्ही मेटाकुटीला आलो आहोत. सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी येईल की नाही याची शाश्वती नाही. सर्वत्र असुरक्षितता दाटून राहिली आहे.

विरोधी पक्ष सरकारात असणा-या पक्षाचा राजीनामा मागणार, आजचे सरकार
उद्या विरोधी पक्षात आल्यावर ते ही तेच करणार. सगळे षंढ आहेत. सरकारातल्या एकाचही रक्त का खवळून उठत नाही ? रविवारी एवढी हुल्लडबाजी करणारी शिवसेना आता का शेपूट घालून बसली आहे ? मुंबईकर सहनशील आहेत हॊ, पण किती ? उद्या ह्याच सहनशीलतेचा उद्रेक झाला तर सरकारने मुंबईकरांकडून रीडर्स डायजेस्ट वाल्यांसारखी ‘सॉरी’ ची अपेक्षा धरु नये.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: