3 प्रतिक्रिया

खाण


घरातली सगळी कामं आटपून दिक्षा बाहेर पडली. मनातून आईच्या चौकशा नको वाटत असतानाच, तिला ब-यापैकी कपडे घातलेले बघून ; आरशात आपलं लावण्यं निरखीत असलेल्या दिक्षाला आईने विचारलं , “कुठे गं निघालीस तिन्हीसांजेची ?”
“काही नाही , इथेच , जरा सुमेधाला भेटून येते ” दिक्षा उत्तरली.
आईला जास्त चौकशा करायला भाग पडू नये म्हणून चट्कन पायात चपला सरकवून दिक्षा भराभर जिना उतरून रस्त्यावरच्या गर्दीत मिसळून सुध्दा गेली. एवढ्या गोंगाटात सुध्दा आईचं,”अंधार पडायच्या आत परत ये गं बाई ” हे वाक्य तिच्या कानांनी टिपलं. पण एका वेगळ्याच साहसाच्या कल्पनेने ती भारावल्यासारखी स्वतःच्याच तंद्रीत झपझप पावलं टाकीत निघाली. निघेस्तोवर तिला आधीच उशीर झाल्याने अंधार पडायच्या आत इच्छित स्थळी पोचायला आता बरीच धावाधाव करायला लागणार होती.

थंडीचा कडाका वाढत चालला होता. दिक्षाने ओढणी डोक्यावरून मफलर सारखी गुंडाळुन घेतली होती. थंडीच्या खुणा तिच्या हातांवर आणि घरावरही दिसत होत्या. हातचे तळवे लालबुंद झाले होते आणि ब-याच ठिकाणी त्यांची सालपटं सुध्दा निघाली होती. या वेळच्या; नेहमीपेक्षा जास्त जोरदार वाहाणा-या वा-याने तिच्या घराच्या कौलांची दाणादाण उडवली होती.

हलक्या हाताने तिने कपाळावरच्या बटा मागे सारल्या. तिचा विपुल केशसंभार तिने काळजीपुर्वक बांधला असला तरी काही चुकार बटा तिला त्रास देतच होत्या. तिला तिच्या लांबसडक रेशमी केसांची , टपो-या पाणीदार डोळ्यांची, नितळ त्वचेची आणि नाजूक चणीची देणगी तिच्या आईकडून मिळाली होती. उणापु-या १७-१८ वर्षांच्या आयष्यात अनेक खडतर प्रसंगांना तोंड देऊनही ते निसर्गदत्त सौंदर्य तसूभरही कमी झालेले नव्हते.

आत्ता ती ज्याला भेटायला चालली होती, ‘तो’ तिचा सद्य परीस्थितीतला एकमेव आशावाद होता. सुमेधाने ‘त्या’च्या बद्दल सांगितल्यापासुन गेल्या अनेक रात्री तिने ‘त्या’च्या बरोबरच्या भेटीची स्वप्नं पाहीली होती. हा निर्णय तिच्याकरता सोपा खचितच नव्हता. पण जागून काढलेल्या अनेक अर्धपोटी रात्रींनी ते बळ दिक्षाला मिळवून दिले होते.

क्रमशः

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “खाण

  1. mala hi katha saransh rupat wachayla aavdli pan mala ti purn vachayla aavdel

  2. I would like to read the whole story but its been a year this story hasn’t updated. May i know the reason why?

  3. mala tumachi khan hi katha avadali ahe mala ti purn vachanyachi icchaa ahe

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: