2 प्रतिक्रिया

विनोद नं. ३, ४ आणि ५


कर्मचारी कसे निवडाल ?

कर्मचारी निवडायचे आहेत ? एका खोलीत १५०-२०० विटा ठेवा. उमेदवारांना त्या खोलीत बंद करून पाचसहा तासांनी जाऊन पहा….

१. जे विटा मोजत बसले असतील त्यांना लेखा (अकाउंट्स) विभागात नेमा.

२. खोलीभर विटा विखरून ठेवल्या असतील , तर त्यांना अभियांत्रिकी (इंजिनियरींग) विभागात नेमा.

३. विटांची विचित्र रचना करत असलेल्यांना नियोजन (प्लानिंग) विभागात नेमा.

४. विटा इकडे तिकडे फेकत असलेल्यांना ऑपरेशन्स या विभागात नेमा.

५. ‘विटा गेल्या जहान्नम मध्ये’ असे म्हणून झोपा काढणा-यांना सिक्युरिटी विभागात नेमा.

६. जे शांत बसून राहीलेले असतील त्यांना ‘पर्सोनेल’ मध्ये नेमा.

७. खोली सोडून गायब झालेल्यांना ‘मार्केटींग’ मध्ये नेमा.

८. खिडकीबाहेर पहात असलेल्यांच्यावर धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी सोपवा.

९. जे विटा हलवण्याबद्द्ल चर्चा करत असतील ; पण प्रत्यक्ष एकाही विटेला हात लावला नसलेल्यांना बॉस म्हणून नेमा.

————

संता व्हायरस

ह्ल्ली कंप्युटर मध्ये संता व्हायरसने बराच धुमाकूळ घातला आहे. एका ईमेलच्या स्वरूपात तयार केलेला हा व्हायरस आपल्या संतासिंगनेच केलेला आहे. हे मेल उघडले की त्यात लिहीलेले असते…

हाय,
मी संता व्हायरस आहे.
मी टेक्नॉलॉजिकली फारसा प्रगत नाहीये. मी मनुअल व्हायरस आहे. कॄपया तुम्हीच तुमच्या हार्ड डिस्क मधून सगळ्या फायली डिलीट करून टाका आणि हा मेल तुमच्या मेलबॉक्समधल्या प्रत्येकाला फॉरवर्ड करा.

सहकार्याबद्द्ल धन्यवाद.

————-

टीचरनी विचारले , “बहुतांशी दाक्षिणात्य लोक काळेसावळे का असतात ?”

नन्या उत्तरला ,”कारण ते लोक सन स्क्रीन लोशन न लावता ‘सन टी.व्ही.’ , ‘सूर्या टि.व्ही.’ आणि ‘उदय टि.व्ही.’ पाहात असतात ना !!!”

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “विनोद नं. ३, ४ आणि ५

  1. vare good but not best try agian

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: