१ प्रतिक्रिया

केबलनेट


गेले ८ दिवस माझे केबलनेट बंद आहे. त्यापुर्वी जवळ-जवळ २ आठवडे माझ्यासकट घरातल्या सगळ्यांची आजारपणं झाली. त्यामुळे गेले कित्येक दिवस ब्लॉग वर काहीही लिहीता आले नाही. खूप काही लिहायचे आहे पण पोस्ट करता येत नाही त्यामुळे जाम फ्रस्ट्रेशन आले आहे. शिवाय कोणतेही ब्लॉग्ज वाचता येत नाहीयेत. झालचं तरं दिवसभर सर्फींग करत बसायच्या सवयी मुळे खंडीभर ग्रुप्सना सबस्क्राईब केलेले आहे. घरपोच डिलीव्हरी सारखे त्याचे दिवसागणिक १००-१२५ मेल्स माझ्या इन बॉक्स मध्ये येऊन पडत आहे, पण डाऊनलोड करु शकत नाही. शिवाय माझे इंटरनेट मी ऑनलाईन ट्रेडींग करता वापरत असल्याने, मार्केट क्रुशियल स्टेज ला असताना इतके दिवस इंटरनेटच्या अभावामुळे नुकसान होत असल्याने नुसता चडफडाट होतो आहे पण काहीच करू शकत नाही. त्याहीपेक्षा ‘इंटरनेट’ म्हणजे काय हे सुध्दा माहीत नसणा-या (त्यानेच तसे मला सांगितले आहे) त्या अडाणी केबलवाल्याचे सतत पाय धरावे लागत आहेत याचा जास्त राग येतो आहे.

मुंबईतल्या पेसनेट या कंपनीने सगळ्या केबलवाल्यांना हाताशी धरून उपनगरातल्या इंटरनेट इच्छुकांची सोय केली आहे. म.टे.नि.लि. चं ४०० मेगाबाईट्सचं नियंत्रण नको असणा-यांना ही सोय बरी आहे. इंटरनेटचा वेग कमी आहे पण ज्यांना कमी पैशात अनलिमिटेड डाऊनलोडींग हवे असेल तर ही तडजोड करायला काही हरकत नसावी. निदान माझी तरी तडजोडीला हरकत नाही. पण पेसनेटने हे जाळे पसरताना एक मोठी चुक केली आहे, जी सातत्याने आम्हा ग्राहकांना भोगावी लागत आहे.

हे केबलनेट प्रीपेड आहे. म्हणजे दर महीन्याला आधी पैसे भरून आपल्या केबलवाल्याकडून स्क्रँच कार्ड घेऊन , त्यातला नंबर टाकुन मगच ते तुम्हाला चालु ठेवता येतं. तुमचं खातं बंद झाले असले तर त्या कार्डावरचा नंबर पेसनेट वाल्यांना सांगुन ते चालु करता येतं. पण पेसनेट्ने मेख अशी मारून ठेवली आहे की तुम्हाला डायरेक्ट पेसनेटशी डील करता येत नाही. त्याकरता तुमचा लोकल केबलवाला, मग पेसनेटचा लोकल डीलर आणी मग पेसनेट अशी फटावळ आहे. तुमचं खातं संपत आले की ४ दिवस आधी पेसनेट कडून तुम्हाला सुचना मिळते , त्यानुसार एखाद्या ग्राहकाने स्क्रँच कार्डाची मागणी केबलवाल्याकडे केली तर तो त्याच्या सोयीने ( तुमच्या गैरसोयीशी त्याला काही देणे-घेणे नाही) तुमच्याकडे येऊन पैसे घेऊन जातो. मग लोकल डिलर कडे जाऊन तो तुमची मागणी नोंदवल्यावर बहुतेकवेळा ते कार्ड “आऊट ऑफ स्टॉक” असते. २-४ दिवस पाठपुरावा केल्यावर ते तुमच्या हातात पडते; तोपर्यंत तुमचे खाते बंद होऊन २ दिवस झालेले असतात. लोकल डिलर जेव्हा केबलवाल्याकडे कार्ड सोपवतो तेव्हा त्या कार्डचा अनुक्रमांक त्याने पेसनेटला कळवायचा असतो. की अमुक एक कार्ड ह्या एरीयातल्या ह्या केबलवाल्याकडे गेलेले आहे. पण तो लोकल डिलर ही तुमची सोय पाहात नसल्याने त्याने ते काम केलेले नसते. त्यामुळे कार्ड तुमच्या हातात पडल्यावर खूष होण्यात काही अर्थ नाही हे मी आता पावणे दोन वर्षांच्या अनुभवातुन शिकले आहे. तुमचा केबलवाला मात्र मी सगळे सोपस्कार केलेले आहेत असे छातीठोक्पणे सांगतो. त्यानंतर खाते बंद असल्याने जर डायल-अप वरून तुम्ही तुमचे खाते चालु करण्याची खटपट केली तरी वर सांगितल्याप्रमाणे लोकल डिलरच्या मेहेरबानीने ती खटपट व्यर्थ जाते. मग फोनचा उपयोग करून पेसनेटला फोन केल्यावर तुम्हाला डिलरच्या अर्धवट कामाची माहिती मिळते. डिलर कडून अधिकॄत माहिती मिळाल्याशिवाय आम्ही काही करु शकत नाही असे नेहमीचे उत्तर मिळाल्यावर, तुम्ही तोंडात येणा-या शिव्या आतल्या आत गिळत ;आता अजून उशीर नको म्हणून लोकल डिलर ला फोन करायला लागता. मगाशी लिहिल्याप्रमाणे तो तुमची सोय पहात नसल्याने १० ते ६ च काम करतो. या गदारोळात अजून एक दिवस फुकट जातो. मग लोकल डिलरचे ऑफीस उघडल्यावर त्याला विनंती केल्यावर तो त्याचे अर्धवट काम उपकारकर्त्याच्या थाटात पुर्ण करतो आणि तुमचे खाते चालु करून देतो.

मी अनेक वेळा पेसनेटच्या तत्सम ग्राहक तक्रार निवारण कक्षाशी याबद्द्ल बोलले की तुम्ही ग्राहकांना ऑनलाईन खाते रिन्यु करायची सुविधा उप्लब्ध करुन द्या. जी खाती रिन्यु होतील त्याचे कमिशन लोकल डिलरला आणि केबलवाल्याला द्या. पण पसनेट याला कबूल नाही. कदचित जास्तीत जास्त ग्राहक मिळवायच्या मिषाने त्यांनी ही केबलवाल्यांची मक्तेदारी मान्य केली असावी. यात गोम अशी आहे की जे कार्ड तुमच्यापर्यंत येते त्याच्यावर एम.आर.पी. नसते. एखादा माल विकताना उत्पादक त्याला येणारा खर्च, वितरण, जाहीरात वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या उत्पादनाची एक किंमत ठरवतो की जेणेकरून रिटेल विक्रेत्याला त्याने गुंतवलेला पैसा परत मिळून नुकसान होऊ नये ; पण त्याचबरोबर त्याने अव्वाच्यासव्वा किंमत सांगून ग्राहकाला नाडू नये. उत्पादकाने अशी किंमत उत्पादनावर छापल्याने रिटेलर ग्राहकाकडून त्यापेक्षा जास्त किंमत वसूल करू शकत नाही. आता इंटरनेट सेवा ही एम.आर.पी. कायद्याखाली येते की नाही माहित नाही पण तशी किंमत कार्डावर न छापल्याने, केबलवाल्याने त्याकरता घेतलेल्या पैशाची कोणतीही पावती न दिल्याने, पेसनेट ने केबलवाल्यांना याचे सर्वाधिकार दिल्याने आणि वारंवार या गोष्टीकडे त्यांचे लक्ष वेधून सुध्दा त्यांचे याकडे काणाडोळा करणे या सगळ्या गोष्टींमुळे; प्रत्येक ग्राहक हा आवश्यक्तेपेक्षा जास्त पैसे भरुन हलक्या दर्जाची सेवा घेत आहे याला पुष्टी मिळते आहे. जवळ-जवळ दिड वर्ष मी महीना ५००/- भरुन ही सेवा घेत होते. पण २ महीन्यापुर्वी अचानक केबलवाल्याने ५००/- एवजी ३६०/- घ्यायला सुरवात केली. कंपनीनेच भाव कमी केले असे त्याने मला सांगितले. मी तसे पेसनेट ला विचारणा केल्यावर तसे काही नसल्याचे मला कळले त्यावर “कदाचित केबलवाल्याने आपली मार्जिन कमी केली असावी” ही एकच शक्यता लक्षात आली. चला हे ही नसे थोडके पण सेवेचं काय. कारण वर लिहील्याप्रमाणे माझा केबलवाल्याकडचा स्टाफ हा इंटरनेट च्या कामाकरता उपयोगी नाही, त्याकरता त्याच्याकडे प्रशिक्षित माणसे नाहीत, जी येतात ती टीकत नाहीत. अर्थात हा त्याचा प्रश्न आहे, पण आम्ही ग्राहक यात भरडले जात आहोत त्याचे काय ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “केबलनेट

  1. malaa itakaa baareek kaa deesato aahe haa font? barech diwasapasun tyamule mala blog waachataach yet naahee aahe:(

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: