१ प्रतिक्रिया

ब्रेकींग न्यूज


१५ ऑगस्ट २००६ च्या रात्री ‘इंडिया टी.व्ही.’ ने “प्राईम मिनिस्टर की सुरक्षा मे आतंकवादी” नावाची एक ‘ब्रेकींग न्यूज’ दिली. त्या बातमीचा थोडक्यात गोषवारा असा :

“बारामुल्ला परीसरात राहाणा-या ३ आतंकवाद्यांनी १९९५ – १९९८ च्या सुमारास स्वतःहून भारताकडे शरणागती पत्करली. त्यापूर्वी त्यांनी प्रत्येकी ६ महीने, पाकव्याप्त काश्मिरमध्ये दहशतवादी कारवायांचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते. शरणागती पत्करल्यानंतर ; त्यांना भारतात सी.आर.पी.एफ़. मध्ये प्रवेश

मिळाला. तिथूनच त्यांना भारताच्या पंतप्रधानांच्या घरी सुरक्षारक्षक म्हणून तैनात केले गेले होते.

एक दिवस ‘राजकुमार’ नावाचा त्यांचा सहकारी स्वत:ची ‘कारबाईन आणि २ मेगेझिन्स’ स्वत:च्या बिछान्यावर ठेवून काही कामाकरता घरी गेला. पण जाण्यापुर्वी त्याने या ३ पैकी २ आतंकवादी जे त्याचे सहकारी होते, त्यांना त्याबद्द्ल सांगितले होते आणि ‘कारबाईन’ वर लक्ष ठेवण्यासही बजावले होते. दुस-या दिवशी कामावर आल्यावर त्याला ‘कार्बाईन’ नाहीसे झाल्याचे लक्षात आले. राजकुमार ने मग त्या २ सहका-यांना त्याबाबत विचारले असता, ते त्यावर काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांना बजावून सुध्दा ‘कार्बाईन’ गायब व्हावी आणि त्यांना काहीच माहीती असू नये याबद्द्ल राजकुमार ला आश्चर्य वाटले. म्हणून त्याने दिल्ली पोलिंसाकडे तशी तक्रार केली. दिल्ली पोलिसांनी मग चौकशी सुरु केली. आणि त्यात ही धक्कादायक बातमी उघडकीस आली. मग सी.आर.पी.एफ़ आणि दिल्ली पोलिसांची एकच भंबेरी उडाली. ही बातमी दाबण्याकरता राजकुमार वरच उलटा आरोप करून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आणि सुरक्षा रक्षकांची अख्खी तुकडी बदलण्यात आली. आतंकवादी असलेल्या तुकडीला दुसरीकडे तैनात केले गेले आहे. त्यात अजूनही ते आतंकवादी सेवेत आहेत.”

राजकुमार ने दिल्ली पोलिसांकडे केलेल्या तक्रारीचा कागद ‘इंडिया टी.व्ही.’ च्या हाती लागल्याने त्यांनी त्यावर ‘ब्रेकींग न्यूज’ तयार केली. विविध पक्षाच्या नेत्यांच्या मुलाखती दाखवल्या. बहुतेकांचे एकच मत होते की “जिथे स्वतः पंतप्रधानच सुरक्षित नाहीत तिथे सामान्य माणूस स्वतःला कसा काय सुरक्षित समजू शकेल ? गेल्या काही दिवसातल्या घटनांनी तर वातावरण आधीच संशयास्पद झाले आहे. त्यात ही भर. पंतप्रधानांच्या कार्यालयातून याबाबत तातडीने काही माहीती जनतेला मिळाली पाहीजे नाहीतर देशात गैरसमज निर्माण होतील इ. इ.”

पण त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत….

१) शरणागती पत्करलेल्या आतंकवादींचे भारतीय लष्कर नेमके काय करते ? पुनर्वसनाच्या नवाखाली सामान्या माणसासारखे त्यांना जगू द्यायाची मुभा देते ?

२) सी.आर.पी.एफ़. मध्ये भरती होताना , भरती होणा-याची काहीच चौकशी केली जात नाही का ? जर केली जात असेल तर दहशतवादी प्रक्षिणाची पार्श्वभूमी असूनही या लोकांना प्रवेश कसा काय मिळाला ?

३) इंडिया टी.व्ही. ला ही बातमी ( राजकुमार ने दिल्ली पोलिंसाकडे केलेली तक्रारीची कॉपी ) कशी काय मिळाली ? म्हणजे पोलिस ही मोबदला घेऊन प्रेस वाल्यांना बातम्या पुरवतात का ? अर्थात तसे जर असेल तर या घटनेत ते स्वतःच अडचणीत आले आहेत.

४) आजकाल ‘स्टिंग ऑपरेशन’ च्या नावाखाली मिडियावाले काय वाट्टेल त्या बातम्या जनतेपर्यंत पोचवल्याचे दाखवून स्वतःचा टि.आर.पी. वाढवतात. इतकी पारदर्शकता खरचं आवश्यक आहे का ?

५) ते आतंकवादी नेमके किती दिवस या तुकडीत पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये होते. ? ही घटना नेमकी कोणत्या तारखेला घडली ?

६) अजून असे किती छुपे आतंकवादी भारतीय लष्करातच कार्यरत आहेत ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “ब्रेकींग न्यूज

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: