१ प्रतिक्रिया

घरचा गणपती ३ – सचित्र (शेवट)


भाग १ आणि भाग २ वरून पुढे….

देशस्थ असल्याने आमच्या गौरी मराठमोळ्या, डोक्यावर पदर घेतलेल्या, नऊवारी साडीतल्या असतात. काहीजणांकडे अशी प्रथा आहे की नविन साडया घेऊन गौरींना त्या नेसवून मग घरातली बाई त्या स्वतः नेसते. पण आमच्या कडे मात्र गौरींच्या साडया इतर कोणी वापरत नाही. कारण दरवर्षी नवीन साडी आणली जात नाही. जर घरात लग्न, मुंज अशी काही कार्ये झाली की मगच त्यांच्या जुन्या साडया बदलून नवीन साडया नेसवायच्या. इतकी वर्ष माझ्या सासुबाई हे काम करायच्या , पण मला नऊवारी नेसता आणी नेसवता येत नाही. त्यामुळे यावर्षी आमच्या मुलाच्या मुंजीनंतर आम्ही गौरींकरता साडया आणल्या त्या पाचवारी आणल्या.

गौरींच्या दिवशी जेवणाचा थाट काय विचारता. आदल्य दिवशी त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ गोड शिरा असतोच. दुस-या दिवशी – खिर, पुरण, लाडू, श्रीखंड-पुरी, पुरणपोळी, बटाट्याची भाजी, वाट्याची भाजी, वाटली डाळ, पंचामॄत, चटणी, केळ्याची कोशिंबीर, वरण, भात, अळूवडया, घोसाळ्याची भजी इ. प्रकार केले जातात. मी जो वाट्याची भाजी म्हणून उल्लेख केला त्यात ५/७/९/११ अश्या भाज्या एकत्र करून त्याची भाजी केली जाते. साधारण भेंडी, भोपळा, दुधी, पडवळ, कारलं, काकडी, सुरणं इ. भाज्या असतात. माझ्या आजेसासूबाई मात्र यातल्या प्रत्येक भाजीची वेगळी भाजी करत असतं. सात भाज्या – सात कोशिंबीरी असे वर्णन मी माझ्या सासूकडून नेहमी ऎकत आले आहे. अर्थात तेव्हा जेवायला माणसे पण ४०-५० असतं, त्यामुळे पदार्थ खपण्याच्या दॄष्टीने काही अडचण नव्हती. दुसरे म्हणजे त्यामागचा उद्देश हा होता की त्या मोसमात मुबलक मिळणा-या भाज्या , फुले याचा या सणांकरता मुक्तपणे वापर व्हावा. मंगळागौरीची पत्री, नवरात्रात झेंडुच्या माळा याचकरता तर वापरल्या जातात. कारण मुबलक उपलब्धता. पण सध्या मात्र ही परिस्थिती  राहीलेली नाही. साधं घोसाळं ज्याला एरवी कोणी काही विचारतं नाही ते सुध्दा या वर्षी ८ रु. पाव च्या खाली मिळत नव्ह्ते. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी त्याच्या अखत्यारीत या सगळ्या गोष्टींना चाट दिली आहे.

या दिवशी दोन सवाष्णी जेवायला येतात. एक माहेरवाशीण, एक सासुरवाशीण. त्यांना यथाशक्ती मान-पान करून मगच हा दिवस संपतो.

तिस-या दिवशी विसर्जनाचे वेध लागतात. आमचा बाप्पा छोटासाच पण चांदीचा असल्याने आम्ही घरातल्या न्हाणीघरातच त्याचे विसर्जन करतो. गेले ५ – ६ दिवस ज्याने त्याच्या तालावर आपल्या नाचावलेले असते त्या गणरायाला निरोप देऊ नये असेच वाटत असते. स्थापनेच्या ठिकाणची जागा ओकीबोकी होऊन जाते. पण त्याला इलाज नाही.

असो , माझे पाल्हाळ ज्यांनी वाचले असेल त्यांना धन्यवाद आणी त्यांच्या सहनशक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडे. या लेखाबरोबर मी आमच्या गणपती-गौरींचे काही फोटो ही देत आहे ते पाहावे.

समाप्त

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “घरचा गणपती ३ – सचित्र (शेवट)

  1. गौरी सुंदर दिसताहेत. माझी आई माहेरची देशस्थ. तिच्या माहेरी मातीच्या सुगडावरती पितळी वाटी उलटी ठेऊन गौरी करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: