3 प्रतिक्रिया

वाचनालय


नविन वर्षाच्या समस्त नेटकरांना शुभेच्छा !

महाजालावरच्या मराठी लेखक / वाचकांना ‘माझे शब्द’ हे नविन तयार झालेले संकेतस्थळ नविन नसेलच. ज्यांना ते माहित नाही त्यांच्याकरता – माझे शब्द हे एक महाजालावरचे वाचनालय आहे. फक्त मराठी पुस्तकांकरता असलेल्या ह्या वाचनालयात तुम्ही तुमच्याकडच्या मराठी पुस्तकांची भर घालू शकता. अर्थात ती पिडीएफ रूपात असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जरी पुस्तके उपलब्ध नसतील तरी; तिथे उपलब्ध असलेली पुस्तके तुम्ही तुमच्या संगणकावर उतरवून घेऊ शकता. तीसुध्दा कोणताही मोबदला न देता.

सध्या हे संकेतस्थळ बाल्यावस्थेत आहे. कारण उपलब्ध असलेले साहित्यातले बहुतेक साहित्य हे सध्या महाजालावर अस्तित्वात असलेल्यापैकीच आहे. जुने / नवे दर्जेदार साहित्य उपलब्ध होण्याकरता तुम्हा समस्त ‘नेट’ करांची गरज आहे. ‘माझे शब्द’ च्या व्यवस्थापकांनी त्यासंबधात आवाहन केले आहेच. तरी समस्त नेटकरांनी या उपक्रमास हातभार लावावा ही सदिच्छा.

वानगी दाखल “माझे शब्द” वर उपलब्ध असलेल्या प्रसिध्द लेखकांच्या पुस्तकांची / लिखाणाची ही यादी.

असा मी असामी – पु.ल.देशपांडे

पर्स हरवलेली बाई – मंगला गोडबोले

मौज दिवाळी अंक २००६

थेंबातील आभाळ – प्रवीण दवण

मी माझा  – चंद्रशेखर गोखले

नाथ हा माझा – कांचन घाणेकर

यापेक्षा कितीतरी अधिक आणि चांगल्या विषयावरची पुस्तके इथे आहेत. तेव्हा या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. तुम्हाला आवडतील ती पुस्तके उतरवून घ्या. तुमच्याकडची पुस्तके मात्र द्यायला विसरू नका.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “वाचनालय

 1. i think you are making readers to wander here and there that’s it & nothing else, because when i searched for the books listed above for downloading i couldn’t get any book. & thanks very much for jingle mingle.

  • गंधार,
   हे संकेतस्थळ केव्हाच बंद पडले आहे. त्यानंतर राज जैन यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे दुसरे एक संकेतस्थळ त्यांनी काढले होते. पण बहुदा तेही चालत नसावे. इतर पुस्तकांबाबत सांगू शकत नाही पण ’पर्स हरवलेली बाई’ हे मंगला गोडबोले यांचं पुस्तक तुम्हाला नक्की उतरवून घेता येईल.
   पर्स हरवलेली बाई :- भाग १,भाग २, भाग ३

 2. नमस्कार,

  http://mazeshabd.ekbhasha.com/

  गेल्या तीन महीन्यांच्या अंधकारमय वाटचालीतून आज माझे शब्द पुन्हा आपल्या मार्गी लागले आहे व नवनवीन सोयी तथा सुविधांचा उपयोग करुन हे संकेतस्थळ पहिल्यापेक्षा जास्त वेगवान तथा सुरक्षित झाले आहे, जुन्या माझे शब्द वरील काही पुस्तके येथे सलग्न केलेली आहेत व काही होत आहेत लवकरच आपले ग्रंथालय परिपुर्ण होईल ह्याचा विश्वास आहे मला.
  हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी ड्रुपल ह्या प्रणालीची मदत घेतली आहे व आपले मित्र श्री निलकांत ह्यांनी खुप मदत केली आहे, तसेच शांतनू जोशी, नागपुर ह्यांच्या मराठी लेखन सुविधा प्रणालीचा वापर करुन आम्ही माझे शब्द वर मराठी लेखन सुविधा प्रदान केली आहे, येथे ई-पुस्तके सलग्न करण्याची व छायाचित्रे सलग्न करण्याची सुविधा दिली आहे.

  मराठी वाचकांनी आपल्याकडील पुस्तकांची येथे भर घालावी व येथे उपलब्ध असलेल्या साहित्यांचा आनंद घ्यावा ही विनंती, एखादे लेखन / साहित्य आवडल्यावर येथे आपले मत प्रतिसाद रुपात जरुर नोंदवा.

  माझे शब्द…
  राज जैन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: