यावर आपले मत नोंदवा

कॉलेज


किंचित हादरा देणारी कादंबरी

कादंबरीचं नाव ‘कॉलेज’… कोणाच्याही मनात झिंग आणि नशा निर्माण व्हावी असं. काही नॉस्टॉल्जियात शिरतील. २००६ नंतरच्या दशकातला ऐवज यात सापडेल असं कुतूहल काहींच्या मनाला स्पर्श करेल. मात्र या कादंबरीत तरुणाईचा जल्लोष नाही. तरुणांच्या ‘कॉलेज’ला, त्यांच्या ‘कॉलेज जगण्या-अनुभवण्याला ‘स्पर्श करावा असा या कादंबरीचा हेतूच नाही. झूओलॉजीच्या विभागप्रमुख असणाऱ्या प्रौढ, विवाहित, हुशार प्राध्यापिकेच्या बुद्धीला-मनाला, संस्थेच्या प्राचार्य-कार्यकारिणीने, मारलेल्या डंखाची ही हकीकत आहे.

कॅनव्हास आहे कॉलेज-प्राध्यापकांचे गट, प्रत्येकाचे स्वभाव. त्यांच्या बऱ्या-वाईट दांभिक वृत्ती. ‘अर्धवेळासाठी काम द्या’ म्हणून डोळ्यात पाणी घेऊन येणारी आणि पुढे ज्यांनी काम दिलं त्यांच्याच डोळ्यातलं पाणी काढणारी वाकडे नावाची बाई. कथानक फिरतं ते या लबाड स्त्रीने खेळलेल्या खेळीभोवती. सुमती सुखटणकर या विभागप्रमुख. सरळ स्वभावाच्या पण थोडंबहुत राजकारण कळूनही स्वत:ला आक्रसून घेत, आपल्या हतबलतेचा आलेख काढणाऱ्या. त्यांची सहाध्यायी इंग्रजीची प्राध्यापिका रीमा-तिचं बुद्धीचापल्य, स्पष्टवक्तेपणा याची भुरळ सुमतीवर आहे.

दुसऱ्या बाजूला जयू नावाच्या अपंगासाठी आयुष्य वेचणाऱ्या मैत्रिणीबद्दलचं कौतुक… मात्र स्वत:कडे बुद्धी-हुशारी असूनही असावी तेवढी तडफ-ठामपणा नसल्याने कधी पतीचा आधार कधी रीमाच्या शब्दांचा प्रभाव यातून कॉलेजमध्ये प्रचंड मानसिक गुंतवणूक केलेली सुमती… ती ज्या गोष्टी-प्रसंगांनी कोलमडून जाते त्याबाबी तात्कालिक डिप्रेशन देणाऱ्या असतीलही, परंतु तिच्या मनावर सर्वच गोष्टींचा परिणाम खोलवर होतो. तिचं प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाण्यापूवीर् धास्तावणं, इतरांसमोर काय व किती बोलावं याबद्दलचं दडपण. तिचं हेच ‘भिडस्तपण’ कादंबरीभर विखुरलेलं आहे. तिला समजावून घेणारे, समजावून सांगणारे तिची प्रखर बुद्धीमत्ता मान्य करतात, पण जगण्यातल्या व्यवहार्य भागाचं तिला आकलन होत नाही म्हणून अस्वस्थ होतात. तिच्याविरुद्ध चालणाऱ्या कारस्थानात अग्रभागी असणाऱ्या वावडेबाई व त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले प्राचार्य यांचे सुमतीच्या आयुष्यावर होणारे थेट परिणाम याच सूत्रातून कादंबरी पुढे सरकते. विद्यार्थ्यांच्या कलाकलाने वागणाऱ्या वाकडेबाईंना शिकवण्यासाठी तास दिले जातात, सर्व अॅक्टिविटीज दिल्या जातात, याचा अर्थ त्यांच्यात थोडीतरी क्षमता असणारच. त्यांचा अदृश्य जाच परमारच्या आत्महत्येला कारणीभूत ठरतो. असं दाखवून वाकडे नावाची खलवृत्ती, तिच्या लोचटपणाचा कळसाध्याय मांडण्यात लेखिका यशस्वी ठरली आहे.

या कादंबरीत कॉलेजमधल्या डिपार्टमेंटला भ्रष्ट प्राध्यापकामुळे झालेला संसर्ग, खच्चून भरलेल्या तपशीलांसकट येतो. जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणाऱ्या प्राध्यापकांना गृहीत धरणं इथपासून ते एनएसएसच्या कार्यक्रमातून उघड होणारा भीषण भ्रष्टप्रकार… २१ प्रकरणांतून एक शृंखलाच वाचकांसमोर उलगडली जाते.

लेखिकेची तडफड, घुसमट कादंबरीतल्या प्रत्येक पृष्ठावर व्यक्त होते. एखाद्या व्यक्तीचं खच्चीकरण करणारी यंत्रणा त्या व्यक्तीच्या विकासाबरोबरच समांतर रेषेत निर्माण होत असते. त्या व्यक्तीला तो सुगावा लागूनही ती काही करू शकत नाही. त्या होरपळीत घर तुटतं. नातलग निघून जातात. उरतं ते रितेपण. प्रश्ान् निर्माण करणारं रितेपण. ज्यांच्यासाठी मानसिक गुंतवणूक केली ते विद्याथीर् कुणा दुसऱ्यालाच डोक्यावर घेणार. आपण जीवघेण्या खेळाचे केवळ साक्षी… असा आशय कादंबरीतून व्यक्त होतो.

अर्थात ज्या विद्यार्थ्यांचा कॉलेजच्या पटावर अंतर्भाव असतो त्यांच्या संदर्भात ही कादंबरी खूप थोड्या प्रमाणात व्यक्त होते. स्टाफरूम-प्राध्यापक-संस्थाचालक-कार्यकारिणी आणि प्राचार्य याभोवती फिरताना नायिकेचं घर-तिची मानसिक-भावनिक जडणघडण यांना कवेत घेतलं जातं. त्यामुळे हा संघर्ष बहुपदरी होत नाही. कादंबरीचा आवाका शीर्षकाला लक्षात घेऊन केला असता तर ही निराळी कादंबरी ठरली असती.

गेल्या दशकातले, येऊ घालणाऱ्या दशकातले असे अनेक प्रश्ान् आज कॉलेजविश्वात आहेत. कॉलेजच्या अंतर्गत राजकारणात अर्ध-पूर्ण वेळ काम करणाऱ्यांचं शोषण- ‘नॅक’मुळे निर्माण झालेला व्यवस्थापनाच्या प्रतिष्ठेचा प्रश्ान्, या सर्वांत भरडून निघणारा प्राध्यापक त्यांची ससेहोलपट पाहणारा, जाणणारा विद्याथीर् हा कादंबरीतला एक प्रमुख घटक ठरणं आवश्यक होतं. भिंगाखाली सगळ्याच समस्या पाहत गेल्याने त्या खूपच मोठ्या वाटत जाऊन सुमती सुखटणकर दुरावते. असं या कथानकाचं केंद बनल्याने कादंबरी पसरट वाटते. यातल्या व्यक्तिरेखा ठळक आणि संवाद (क्वचित ठिकाणी) जगण्याच्या शक्यता निर्माण करणारे झाले असल्याने ती क्वचितच वाचनीय ठरते.

कादंबरीचं अप्रतिम मुखपृष्ठ ही जमेची बाजू. मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख या कादंबरीत काही ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो. तर काही जागा रिक्त ठेवल्याने कादंबरीचं अधुरेपण ठसतं. कॉलेज पॉलिटिक्सच्या एका प्रबळ भागाचं सूक्ष्म विदारक दर्शन हे या कादंबरीचं यश. २००० नंतरच्या दशकात कॉलेजसंबंधी निर्माण झालेल्या महत्त्वपूर्ण प्रश्ानंचा नसलेला समावेश हे अपयश. कॉलेजच्या कोणत्याही डिपार्टमेंटला-तिथल्या कार्यपद्धतीला तळहातावर ठेवत केलेली ही मीमांसा वाचकाला थोडासाच हादरा देते.

– वृंदा भार्गवे

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: