१ प्रतिक्रिया

मूठभर माती – डॉक्टर जनार्दन वाघमार


‘लातूर पॅटर्न’च्या जनकाची कथा

डॉक्टर जनार्दन वाघमारे लिखित ‘मूठभर माती’ हे पुस्तक सध्या बरंच गाजतंय. हे पुस्तक आत्मचरित्रपर तर आहेच पण त्यातल्या बऱ्याच माननीय व्यक्तींचं चित्रण, त्याचं वागणं यथायोग्य टिपल्यामुळे ते लक्षणीयही झालं आहे.

सर्वच आत्मकथांचा प्रारंभ बालपणापासून होतो. ‘मूठभर माती’चा प्रारंभ बालपणापासून होतो. ‘मूठभर माती’चा प्रारंभही त्यांच्या जन्मापासून सुरू होतो. मराठवाड्यातल्या ‘कौठा’ या अत्यंत लहान खेड्यात त्यांचा जन्म झाला. गावात शिक्षित असा कुणीच नाही आणि कुणाला शिक्षणाची ओढही नाही. परंतु जनार्दनचे वडील (ज्यांचा पुस्तकात उल्लेख केवळ ‘अप्पा’ म्हणूनच आहे.) यांना आपला मुलगा शिकावा असं वाटत होतं. अर्थात घरात दारिद्यच होतं. परंतु आपल्या मुलाला शिकवायचंच असा त्यांनी ध्यास घेतला. त्यासाठी एका मुसलमान शिक्षकाला ते गावातच घेऊन आले. त्याचं घर बसवून दिलं आणि लहान जनार्दनासहित गावातल्या ८-१० मुलांना अक्षरओळख करून दिली. त्यानंतर पुढचा शिक्षणाचा प्रश्ान् आला. वेगवेगळी गावं, लातूर, हैदाबाद पुढे औरंगाबाद इथे राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. या सर्व कालखंडात अप्पांनी उचललेले कष्ट, जिद्द याचं वर्णन लेखात आहे. पुढेही सर्व पुस्तकात अप्पांचा जिद्दी स्वभाव आपल्याला भेटतो आणि वडिलांचा जनार्दनवरचा प्रभाव जाणवत राहतो.

जनार्दन वाघमारे यांना राजकारणाची ओढ होती. त्यासाठी वकील व्हावं, प्रॅक्टिस करता करता राजकारण करावं या हेतूने त्यांनी औरंगाबादला लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एम. ए.च्या वर्गातही प्रवेश घेतला. आयसीएसचेही वर्ग अटेण्ड केले. पुढे तो नाद सोडून दिला. एलएलबीपूवीर् एम. ए. उत्तीर्ण झाले. पुढे शिक्षणाला आणि घराला आधार म्हणून उमरग्याच्या कॉलेजात स्वत:हून आलेलं निमंत्रण स्वीकारून इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि अशा प्रकारे ते शिक्षण क्षेत्रात ओढले गेले ते कायमचेच.

डॉ. वाघमारे यांना महाराष्ट्र ओळखतो तो ‘लातूर पॅटर्नचे जनक’ म्हणून. लातूर इथल्या काही प्रमुख कार्यर्कत्यांनी लातूरला आणखी एक महाविद्यालय काढण्याचं ठरवलं. (आधीची दोन कॉलेजे होतीच) तिथे वाघमारेंंना प्राचार्य म्हणून नियुक्त केलं. वाघमाऱ्यांनी महाविद्यालयाला ‘राजषीर् शाहू महाविद्यालय’ असे नाव देण्याचा आग्रह धरला. हे महाविद्यालय बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करणारं असावं, शाहू-फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रसार करावा असं त्यांचं म्हणणं होतं. ते मान्य झालं. यापुढे पुस्तकातल्या सुमारे ३०० पानांत त्यांनी या महाविद्यालयाला नामांकित करण्यासाठी केलेल्या धडपडीचं वर्णन आहे.

संस्थेला जागा मिळवण्यापासून ते निधी जमा करून देईपर्यंत त्यांनी केलेले अथक प्रयत्न यात वणिर्लेेले आहे. अर्थात बहुतेक महाविद्यालयांना सुरुवातीच्या काळात अगदी अशाच प्रयत्नांतून जावं लागलं आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आपल्या महाविद्यालयाचं वेगळेपण निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेेले कष्ट कौतुकास्पद आहेत. मुंबईतल्या एका ख्रिश्चन मिशनकडून पहिला निधी मिळवण्यासाठी त्यांना पडलेल्या कष्टांचं वर्णन केलं आहेत. शेवटी याच मिशनने संस्थेला सुमारे ७५ लाखपर्यंतचा निधी जमवून दिला, हे विशेष.

आपल्या संस्थेतले विद्याथीर् सर्वत्र चमकलेच पाहिजेत ही जिद्द मनात धरून त्यांनी जो कार्यक्रम आखला तोच प्रारंभी ‘शाहू पॅटर्न’ आणि नंतर ‘लातूर पॅटर्न’ म्हणून गाजला. कोणत्याही प्राध्यापकाने शिकवण्या किंवा खाजगी वर्ग चालवायचे नाहीत. कॉलेज सुरू होण्यापूवीर् पहिल्या टर्मचा अभ्यास मुलांकडून करून घ्यायचा, दुसऱ्या टर्मचा वेळ उजळणी आणि पडताळणीसाठी ठेवायचा. मराठवाड्यातली मुलं भाषा विषयात कमी पडतात. विशेषत: मराठी इंग्रजी बोलतांना हे लक्षात घेऊन भाषा लिखाण, वाचन उच्चार यावर लक्ष दिलं. परिणाम असा झाला की गुणवत्ता यादीतल्या ५० पैकी ३५ विद्याथीर् शाहू महाविद्यालयाचे असत. महाराष्ट्रात विशेषत: मुंबई-पुण्यात हलकल्लोळ माजला. या यशामागे काही ट्रिक आहे असंही दबत्या आवाजात बोललं जाऊ लागलं. शेवटी ‘लातूर पॅटर्न’ला सरकार दरबारीही मान्यता मिळाली.

याचवेळी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर सुरू झालं. डॉ. वाघमारे प्रथम नामांतरविरोधी होते. ‘मराठवाडा’ नावाचा इतिहास त्यांना ठाऊक होता. गोविंदभाई, कुरुंदकर, अनंत भालेराव यांच्यासारखे नेते प्रतिगामी नाहीत हेही ते सांगत असत. परंतु विधानसभेने नामांतराचा ठराव मंजूर केल्यावर मात्र त्यांनी नामांतराला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. हा ठराव शरद पवारांच्या पहिल्या कालखंडात मंजूर झाला होता. वाघमाऱ्यांचा ओढा सुरुवातीपासूनच पवारांकडे होता. पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी हा प्रश्ान् सोडवण्याचं ठरवलं. आता नामांतराऐवजी नामविस्ताराची सूचना पुढे आली होती. पवारांनी जनार्दन वाघमारे यांना निरोप पाठवून नामांतराच्या बाजूने लेख लिहिण्याची सूचना केली. तो एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात छापून आणण्याचीही सोय पवारांनी करून ठेवली होती. वाघमारेंनी आपल्या लेखात असं प्रतिपादन केलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबादेत, तर स्वामी रामानंदतीर्थ यांनी नांदेडला १९५० मध्ये एकाच तारखेला महाविद्यालयं सुरू केली. मराठवाडा ही उच्च शिक्षणाची गंगोत्री आहेत. तेव्हा औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं तर नांदेडला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करून त्याला स्वामीजींचं नाव द्यावं. पवारांनी आधीच ठरवून ठेवल्याप्रमाणे ही सूचना मान्य केली. नांदेडला स्वामीजींच्या नावे विद्यापीठ स्थापन झालं आणि त्याचे कुलगुरू म्हणून डॉ. वाघमारे यांचीच नियुक्ती झाली.

डॉ. वाघमारे स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ५ वर्षं कुलगुरू होते. त्यांनी अगदी शेंडीपासून सुरुवात करून विद्यापीठाला अगदी उच्च स्थानावर नेऊन ठेवलं. पण त्यांना काही कमी विरोध झाला नाही. विद्यापीठ स्थापन होण्यापूवीर् नांदेडला उपकेंद होतं. शंकरराव चव्हाण यांचे पुतणे बी. एन. चव्हाण हे त्यांचे संचालक होते. पहिले कुलगुरू होण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. पण शरद पवार यांनी वाघमारे यांची कुलगुरूपदी निवड केली त्यामुळे शंकरराव कसे नाराज झाले, तर बी. एन. चव्हाण कसे संतापले याचं मजेशीर वर्णन या पुस्तकात आहे.

वाघमारे यांच्या कार्यकालाचं तिसरं प्रकरण त्यांनी लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून केलेल्या कामगिरीचं आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कारभाराला त्यांनी वळण लावलं. लातूरला पाण्याची टंचाई आहे. आजही तिथल्या जनतेला आठवड्यातून एकदाच पाणी मिळतं. पण जनतेचा वाघमाऱ्यांच्या सचोटीवर विश्वास असल्याने कारभार चांगला चालला.

डॉ. वाघमारे अत्यंत कार्यक्षम गृहस्थ आहेत यात शंका नाही. त्यांनी राजषीर् शाहू महाविद्यालय, स्वा.रा.ती. विद्यापीठ आणि लातूर नगरपालिकेत केलेलं कार्य अद्वितीयच आहे. हे काम ‘मी न करता’ ‘आम्ही केलं’ असं ते म्हणतात. (खरं म्हणजे ‘आम्ही’ म्हणजे ‘मी’चं आदराथीर् बहुवचन असून यशात मुख्य वाटा आपला असून बाकीचे सहकारी गोवर्धनाला काठ्या टेकवण्यापुरतेच आहेत, असा त्यांच्या बोलण्याचा अविर्भाव असतो असं त्यांचेच एक सहकारी खाजगी बैठकीत मला म्हणाले.) सारं श्रेय आपल्याकडे घेण्याची विपरीत प्रतिक्रिया होऊन वाघमारे निवृत्त झाल्यावर संस्थेने ‘लातूर पॅटर्न’चं श्रेय उपप्राचार्य अनिरूद्ध जाधव यांना दिलं असं जाणवतं. त्यांचे पडसाद या पुस्तकातही दिसतात. कित्येक व्यक्तींनी खाजगी बैठकीत व्यक्त केलेली मतं त्यांच्या नावानिशी लिहून त्यांना अडचणीत आणलेलं या पुस्तकात दिसतं. अर्थात खाजगी संवाद नावानिशी उघड करणं कितपत सभ्यपणाचं आहे हाही वादाचा विषय होऊ शकेल.

डॉ. वाघमारे यांचं निग्रो साहित्यावरचं लिखाण ‘दलित पँथरवाल्यां’ना मार्गदर्शक ठरलं आहे. वाघमारे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. सर्व कार्याचा परिचय करून देण्यासाठी त्यांनी सुमारे साडेआठशे पाने खचिर्ली आहेत. अनावश्यक तपशील टाळता आला असता तर हे पुस्तक निम्म्या पानात बसू शकलं असतं.

जिथे शिक्षण घेणं हाच जणू गुन्हा होता त्या निजामी राजवटीतल्या मराठवाड्याने केवळ ५० वर्षांत उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने येण्यासाठी जी उरफोडी धाव केली, ते समजावून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरेल.

– सुधाकर डोईफोडे

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “मूठभर माती – डॉक्टर जनार्दन वाघमार

  1. good sudhakar – thanks for introducing me to this person. had heard a lot about ‘latur pattern’ – the pros and cons of which are debatable, but never knew who started it and what happened to him later.

    thanks.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: