4 प्रतिक्रिया

महागायक..


आयडीया.. सा रे ग म प मध्ये महागायक म्हणून यशस्वी ठरलेल्या ‘अभिजीत कोसंबी’ याचे मन:पूर्वक अभिनंदन.

खरं सांगयचं तर सुरूवातीपासून मी कधीच हा कार्यक्रम बघितला नव्हता. ३१ डिसेंबर ला ‘झी मराठी’ ने सादर केलेल्या संगीत संध्येत या गुणी कलाकारांची गाणी ऎकली आणि मग मात्र त्यांच्याबद्दल उत्सुकता वाटली. तरीही कार्यक्रमाची वेळ सोयीची नसल्याने उरलेले भागही पाहता आले नाहीत. पण ३१ डिसेंबरचा

कार्यक्रम पाहून (ऎकून) मला ‘विजय गटलेवार’ आणि ‘अभिजीत कोसंबी’ यांचा आवाज, गायकी आवडले होते. अभिजीत शेवटच्या तीन स्पर्ध्कांमध्ये आहे हे कळल्यावर विशेष आनंद झाला होता.

आणि मग तो, वादग्रस्त भाग झाला. ज्यात अभिजीत ला प्रेक्षकांची कमी मते मिळाले; पण परीक्षकांच्या मते त्याला शेवटच्या भागात संधी द्यायचे ठरवले गेले. त्या भागात आणि नंतर वॄत्तपत्रांमधून त्याविषयी बरेच काही छापून आले; जे सगळे परीक्षकांच्या विरोधात होते. याला विरोधाला कारण म्हणजे, या स्पर्धेसाठी प्रेक्षकांनी मोठया संख्येने ‘एसेमेस’ पाठवले होते. त्या सगळ्यांना डावलले गेल्याची चीड लोकांच्या लिखाणातून व्यक्त झाली.
लोकांचे मत होते की, एवीतेवी कोणीतरी एकच विजेता/विजेती ठरणार, जर स्पर्धेचे नियम आधी ठरवले आहेत तर आयत्या वेळी त्यात बदल का करायचा ? प्रत्येक स्पर्धकाला ते नियम माहिती आहेतच. आणि जर प्रेक्षकांच्या मताचा आदर करायचा नसेल तर ‘ एसेमेस’ चा फार्स कशाला ?
तर परीक्षकांचे मत होते, की संपूर्ण कार्यक्रमात अभिजीत चा परफॉर्मन्स चांगला झाला पण निर्णायक क्षणी त्याला कमी मते मिळाली म्हणून त्याला त्याची कला सादर करण्यापासून वंचित करू नये.
शेवटी अभिजीत अंतिम फेरीत दाखल झाला आणि चक्क विजेता ठरला.

लोकांनी आणि प्रसारमाध्यमांनी आधीच्या भागातल्या निर्णयावरून बरेच ताशेरे ओढल्याने अतिंम भागाचा विजेता पूर्णपणे ‘एसेमेस’ वरच ठरवला गेला. पण यात ‘मंगेश’ आणि ‘अनघा’ ला पध्दतशीरपणे बळीचा बकरा बनवण्यात आले असे मला तरी वाटते.
कारण आयोजकांनी आधीच्या वादावर मखलाशी म्हणून “मागच्या भागात अभिजीत बाहेर जाणार नव्हता, तर अनघा बाहेर जाणार होती” हे जाहीर केले. याचा परीणाम म्हणून “अभिजीत अंतिम फेरीत आंगतूक नाही” हा वाद ताबडतॊब थांबला. थोडक्यात अनघा आणि मंगेश यांच्या बाजूने भांडणारे त्यांचे चाहते मूर्ख ठरले.
पण जर हे असे होते तर मग ते त्याच दिवशी का जाहीर केले गेले नाही ? ही गोष्ट अनघा ला माहीती होती का ? बहुदा नसावी कारण, शनिवार च्या लोकसत्तेत, चतुरंग पुरवणीत अनघा ची मुलाखत छापून आली होती त्यात तिने तसा कोणताही उल्लेख केला नव्हता. जर ही घटना खरी असेल तर तिने याचा उल्लेख मुलाखतीत करून तिला अजून एक संधी देणा-या परीक्षकांचे आणि आयोजकांचे आभार मानयलाच हवे होते. म्हणजे एक तर ती या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ होती. किंव्हा असे काही घडले नसावे. या माझ्या शंकेला दुजोरा मिळाला, तॊ तिच्या आजच्या ( २६.०२.२००७) लोकसत्तेतल्या प्रतिक्रियेवर. आणि अंतिम भाग चालू असताना हे जाहीर करून, अनघा चे मानसिक खच्ची:करण यात झाले नसेल का ? केवळ स्वत:ची कातडी वाचवायची या हेतूने झी ने शेवटी स्पर्धकालाच वेठीला धरले.
कदाचित तिच्या वर अन्याय केल्याच्या भावनेतून च तिला खास ‘ज्युरी अँवार्ड’ दिले गेले असावे.
बिचारा मंगेश तर सगळ्यापासून च वंचित राहीला. ना प्रसिध्दी, ना प्रशस्तिपत्र, ना कोणतेही बक्षिस. बिचा-याची बारावी ची परिक्षा सुध्दा राहिली.
अर्थात विजेता कोणीतरी एकच होणार हे माहीती होते पण केवळ ‘एसेमेस’ च्या खेळाने स्पर्धक मात्र होरपळले. फायदा झाला ‘झी मराठी’ चा, आयडिया चा. ‘एसेमेस’ मध्ये ट्रान्सपरन्सी नसते तरीही आजकाल सगळ्या स्पर्धांकरता हाच निकष का लावला जातॊ ? स्पर्धेचे पोस्टकार्ड साध्या पोस्टकार्ड पेक्षा माहग असते त्याप्रमाणे स्पर्धेचा एसेमेस सुध्दा साध्या एसेमेस पेक्षा महाग असतॊ. तरीही ८ लाख, १५ लाख , १९ लाख इतके प्रचंड एसेमेस (केवळ एका शेवटच्या भागाचे) पाठवून फायदा फक्त झी आणि आयडीया यांचा झाला हे सुजाण प्रेक्षक लक्षात का घेत नाहीत ? एसेमेस ने च जर विजेता ठरवायचा तर स्पर्धा तरी कशाला हव्यात आणि परीक्षक तरी काय करायचेत ? पैसे टाकून भरपूर कार्डे घेऊन एसेमेस करणारे काही कमी नाहीत.

जाता जात एकच, सोनीचा ‘इंडियन आयडॉल’ ठरलेला सावंताचा अभिजीत आणि झी चा महागायक ही कोसंबीचा का होईना पण ‘अभिजीत’ च. तेव्हा पुढील कोणत्याही स्पर्धेत ‘अभिजीत’ नावाच्या स्पर्धकाने आपणच जिंकणार या खात्रीने उतरायला हरकत नाही.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “महागायक..

 1. धन्यवाद. ब्लॉगच्या जगात मी अजून नवखाच आहं. बरेच कांही समजून घ्यायचे आहे. मुळात मी एक तंत्रज्ञ आहे, त्यात संशोधकांच्या जगात वावर झाला, त्यात आता मोकळा वेळ मिळाला आहे. (आधीच मर्कट ..)
  🙂

 2. आनंद साहेब,

  मी फक्त शेवटचा भाग अथपासून इतिपर्यंत पाहिला होता त्यामुळे त्याचाच तपशील मी लिहीला.पण आपण तर कमाल केलीत. एकूणच सगळ्या स्पर्धेचा आढावा उत्तमप्रकारे मांडलात.त्यामुळे जे आधीचे भाग मी पाहिले नव्ह्ते त्यांची कल्पना मला आली. धन्यवाद.

  आपण जी मते प्रदर्शित कली आहेत ती अतिशय तर्क सुसंगत आहेत,त्याबद्दल काही वादच नाही.

  आपला ब्लोग अतिशय वाखाणण्याजोगा आहे. विशेषत: आपल्या वयाकडे (फोटोतल्या) पाहून , एखाद्या जेष्ठाने संगणक वापरात एवढी प्रगती करावी; खास करून मराठी टंकलेखनात याचे विशेष कौतुक वाटले.

  माझी दुनिया

 3. नमस्कार, आपण सारेगमप स्पर्धेचा थोडक्यात सुंदर आढावा घेतला आहे. याच स्पर्धेचा सविस्तर वृत्तांत दोन भागात देऊन तिस-या भागात कांही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. सवड मिळाल्यास वाचून आपली प्रतिक्रिया कळवावी ही विनंती.

 4. […] प’ मध्ये अभिजीत कोसंबी साठी sms केलात? माझीदुनिया ला काय म्हणायचे आहे ते वाचा तरी एकदा. […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: