यावर आपले मत नोंदवा

व्हिडीयो फाईल चे ऑडीयो मध्ये रुपांतर


मला आठवतोय तो काळ, ज्यावेळी दूरदर्शनवर आजच्या इतक्या वाहीन्या नव्हत्या. एकच एक वाहीनी आणि ती सुध्दा आजच्या सारखी २४ तास न चालणारी. पण त्यामुळेच त्या वाहिनीचं खूप अप्रूप होतं आणि कार्यक्रमांचही. त्यावेळी ‘हम लोग’ सारखी वर्षभर (५२ आठवडे) चालणारी पहिलीच मालिका निघाली होती, पण त्याचे सगळे भाग दर शनिवारी मोठया उत्सुकतेने पाहिले जायचे. त्या मालिकेपासूनच विविध प्रोडयुसर्स अशा जास्त दिवस चालणा-या मालिका काढायला लागले. मग प्राईम टाइम, प्रायोजक, टीआरपी अश्या पुर्वी अस्तित्वात नसलेल्या भानगडी उपटायला लागल्या. बाकी कोणत्याही कार्यक्रमाचा टीआरपी घसरला असेल नसेल माहीत नाही, पण एक कार्यक्रम मात्र सगळ्यांना पुरून उरला. तो म्हणजे ‘छायागीत’. दर बुधवारी ठराविक वेळेला टीव्ही लावायलाच लागायचा. तुम्हाला बघायचा नसेल तरी सगळ्यांकडे टिव्ही नसल्याने, शेजारधर्म म्हणून तरी का होईना पण छायागीत बघितले जायचेच. बर आतासारखी अश्लील गाणी त्यात नव्हती. संगीताचा सुवर्णकाळच असल्याने चित्रपटातलं का होईना पण दर्जेदार संगीत ऎकायला मिळत होतं.

असॊ, मुद्दा हा की त्यात चित्रपटातली गाणी पहायला मिळत. एकूणच त्यावेळी तंत्रज्ञान एवढं पुढारलेलं नसल्याने आजच्या टिनएजर्स ना हे विचित्र वाटेल, कारण आजचा जमाना….कॉम्पँक, ब्रॉडबँड, केबलनेट, पी२पी नेटवर्क, युटयुब, गुगल व्हिडियो अश्या गोष्टींचा आहे. त्यावेळी एखादे आवडते गाणे आपल्याकडे असण्याकरता आधी आपल्याकडे टेपरेकॉर्डर असणे आवश्यक होते, जे बहुदा अशक्य असायचे. त्यातून टेपरेकॉर्डर असला तरी सोनी किंव्हा टीडीकेच्या टेप्स फार महाग मिळायच्या. मग एखाद्या कस्टम्स फ्री दुकानात एखाद्याचा वशिला लावून अख्खा १० टेप्सचा बॉक्स स्वस्तात मिळवायचा. मग आपल्याला आवडलेल्या गाण्यांची यादी करून ती त्या टेप सकट ऑडियो कँसेटच्या दुकानात द्यायची. मग ४-५ दिवसांनी दुकानातून ती कँसेट मिळवायची. माझा शाळा-कॉलेचा ९०% पॉकेटमनी मी असाच खर्च करायचे. गेले ते दिन गेले.

पण आता हे सगळे करायची गरज नाही. हाताशी कॉम्पुटर आणि इंटरनेट असले की काम झाले. सध्या सीडीचा खरं तरं डिव्हीडी चा जमाना आहे. पण सीडी कुठेही , कशावरही लावता येते त्यामुळे मला डिव्हिडी पेक्षा जास्त आवडते.

आता कल्पना करा, तुमच्याकडे सीडी किंव्हा डिव्हीडी प्लेयर आहे. तुमच्या मित्र-मैत्रिंणींकडून तुम्ही एखादा पिक्चर आणला आहे. पिक्चर आवडला असेल तर तुम्ही तो राईट करून घेणार यात काही वाद नाही. पण सगळा पिक्चर राईट न करता फक्त त्यातली गाणी राईट करता आली तर ? त्याची mp3 करून मोबाईल किंव्हा आयपॉड मध्ये साठवून केव्हाही येता जाता ऎकता आली तर ? पण हे कसे शक्य होईल ?

का नाही, हे सहज शक्य आहे. आज अशी काही मोफत सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत की त्यायोगे हे सहज साध्य होऊ शकते. त्यापैकी एक म्हणजे एम्पी३ एक्स्ट्रँक्टर. हे सॉफ्टवेअर तुमच्याकडची व्हिडियो फाईल ऑडीयो फाईल मध्ये परावर्तित करते. अर्थात परावर्तित झालेली फाईल हे त्या व्हिडियॊ फाईल चं ऑडियॊ रुप असेल. पण त्यातून फक्त गाणी हवी असतील अथवा इतर काही संवाद हवे असतील तर थोडं एडिटींग करणे भाग आहे. घाबरू नका, ऑडासिटी नावाच्या या सॉफ्टवेअर च्या मदतीने  तुम्ही लगेचच ते काम करू शकता. त्याकरता फार काही तंत्रज्ञान  माहित असण्याची गरज नाही. तुमचा विश्वास बसत नसल्यास मी स्वत:  हे तंत्र वापरून तयार केलेली एम्पी३ ऎका.

कॉर्पोरेट – तू भी बन सकता है सिकंदर

क्रिश – दिल ना दिया

क्रिश – कोई तुमसा नही

कभी अलविदा ना कहना – मितवा

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: