22 प्रतिक्रिया

संता बंता चे विनोद १


[सदर विनोद या पूर्वी दैनिक महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिध्द झाले होते.]

अगदी रमतगमत चालत असलेल्या सुभेदार बंताला पाहून मेजर संता कडाडला, ”सुभेदार बंता, हा युद्धसराव सुरू आहे. काल्पनिक शत्रू समोरून अतिशय वेगानं आपल्या दिशेनं सरकतोय. प्रचंड काल्पनिक गोळीबार सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या काल्पनिक धुमश्चक्रीत तू अडकला आहेस.”

बंतानं ताबडतोब जमिनीवर लोळण घेतली, दोन गिरक्या घेऊन तो एका जागी तो उठून बसला. ते पाहून चक्रावलेल्या संतानं विचारलं, ”सुभेदार संता, हे तू काय केलंस?”

” सर, मी एका काल्पनिक झाडाच्या आडोशाला दडलोय!!!!”

********

संताचे वीज पडूनिधन झाले. आश्चर्य म्हणजे त्याच्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर हास्य होते.
चित्रगुप्ताने विचारले, ”अशा वेळी तुझ्या चेहऱ्यावर हास्य कसे?”
” ओ जी वो तो ऐसा हुआ…” संता तसंच हसत सांगू लागला, ”मला वाटलं कुणीतरी फोटो काढतंय!!!!!”

**********************

एका विद्यार्थ्यानं उत्तरपत्रिकेला १००० रुपयांची नोट जोडली आणि लिहिलं, ”प्रत्येक मार्काला १० रुपये.”
पेपर तपासायला संताकडे गेला. त्यानं उत्तरपत्रिकेला ८०० रुपये जोडले आणि लिहिलं, ”तुला २० मार्क मिळाले आहेत

*****************

नवव्या महिन्यात कुलविंदरला कळा सुरू झाल्या. तिनं संताला कळवळून सांगितलं, ”चला, मला घेऊन चला. डिलिव्हरीची वेळ झाली.”

संता तिला घाईघाईने ‘पिझा हट’ला घेऊन गेला…

तिनं विचारलं, ”इकडे का आणलंत मला?”

तोंडभर हसून स्वकौतुकानं थबथबलेल्या संतानं समोरच्या बोर्डाकडे बोट दाखवलं… त्यावर लिहिलं होतं, ‘फ्री डिलिव्हरी”!!!!

***************

बंता विमनस्क स्थितीत बसला होता. समोर गॅसवर पाणी उकळत होतं. आत चाकू होता.

संतानं विचारलं, ”हे काय करतोयस तू?”

बंता म्हणाला, ”मी स्वत:च्या हाताची शीर कापून आत्महत्या करणार आहे.”

संतानं विचारलं, ”पण मग हा चाकू उकळत का ठेवलायस?”

बंता म्हणाला, ”वा रे शहाण्या! चुकून इन्फेक्शन वगैरे झालं म्हणजे!!!!”

*****************

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

22 comments on “संता बंता चे विनोद १

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: