१ प्रतिक्रिया

अरूणा ढेरे


क्षणाची कुपी

हौसेने, जीव पाखडून घेतलेली
एखादी अतिनाजूक वस्तू फुटावी
तशी फुटली ही एका क्षणाची कुपी
मी धक्का बसून पाहाते आहे.

माझ्या पलिकडेच तू उभा
तुझं त्याकडे लक्षंच नाही
स्वत:च्याच विचारातला किती अशांत दिसतोस तू,
आणि त्रस्तही.

चेह-यावर उमटल्या आहेत
किती रे या चिरम्या रेषा !
काळवंडला आहेस का रे जरासा ?
कपाळावरच्या आठीत भरली वाटतेय
समजुतदार निराशा.

निवली आहे वाफ, फक्त
डोळ्यांच्या कडांशी किंचित लाली आहे,
मी तरी कुठे राहीले आहे म्हणा
पूर्वीसारखी लढाऊ
क्षणाची ही फुटकी काच
मीही बघ निमूट उचलून टाकली आहे.
एकमेकांच झणझणीतपण
आता आल्या-लसणासारखंच
सोसवत नाही आपल्याला
हा अळणीपणाचा स्वीकार
किती अगतिक ! किती सोयीस्कर !
फुटला हातातला क्षण
अन, अचानकच लक्षात आले
आपल्या सहजीवनाचे काळानं हेरेलेले परीणाम
केवढे छुपे ! केवढे भयंकर !

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “अरूणा ढेरे

 1. कुंभमेळा

  माझ्या बाळपणातून भटकणारा
  एकही मदारी, डोंबारी किंवा जादूगार
  भेटला नाही मला नंतर, पुढच्या वळणावर
  वाटा असतात इतक्या असंख्य आणि दूर निघून जाणा-या
  की भेटू शकत नाही पुन्हा पहिले सारे तसेच
  आल्या वाटेने पुढे किंवा मागे गेल्यावर

  हे समजते, तरी या भुईशी जखडून जाताना
  सतत स्वप्ने पडतात मला
  दंतकथांमधून गाणा-या सोनेरी पाखरांची
  कळ दाबताच आभाळातून झेपावणा-या शुभ्र शुभ्र घोडयांची
  आणि पुस्तकांच्या पानांचे कधी होत असले उडते गालिचे
  तरी येतच राहाते मर्मांतिक आठवण
  जत्रेतल्या तात्पुरत्या दुकानांची
  देवळात अचानक दिसलेल्या पिश्या बैराग्याची
  मणांच्या माळासारखी न आरसे लावलेल्या घाग-यांसारखी
  सैल, रंगीबेरंगी, चमकदार भटकंती करणा-या लमाणांची

  कधीतरी भरणार नाही का एखादा कुंभमेळा
  या वाहत्या वाटेच्या काठावर
  तेवढ्यापुरते येणार नाही का परतून
  आतल्या ओढीने आयुष्यातले सगळे काही
  बारा वाटा उधळलेले ? गूढपणे नाहीसे झालेले ?
  उमलणार नाहीत का डोळ्यांमधून
  काळाला छेद देणारे ते तेव्हाचे स्वच्छ डोळे ?
  स्थिरपदाच्या माथ्यावर, शिवपिंडीला लागावा तसा
  लागणार नाही का जिंवत सुवासिक अस्थिराचा टिळा ?
  नाही का भरणार खरचं , असा एक कुंभमेळा ?

  अरूणा ढेरे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: