4 प्रतिक्रिया

कळा ज्या लागल्या जीवा


कळा ज्या लागल्या जीवा, मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे? कुणाला काय सांगाव्या ? ॥धृ.॥
उरीं या हात ठेवोनी, उरींचा शूल का जाई?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाहीं ॥१॥
जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू ॥२॥
नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठें नावा,
भुतांची झुंज ही मागें, धडाडे चौंकडे दावा ॥३॥
नदी लंघोनी जे गेले, तयांची हांक ये कानीं,
इथें हे ओढिती मागें, मला बांधोनी पाशांनीं ॥४॥
कशी साहूं पुढें मागें, जिवाला ओढ जी लागे ?
तटातट् काळिजाचे हे, तुटाया लागती धागे ॥५॥
पुढे जाऊ वळू मागे, करू मी काय रे देवा
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा ॥६॥
गायिका : लता मंगेशकर
गीतकार : भा.रा. तांबे
संगीत : वसंत प्रभू

उतरवून घ्या

 

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “कळा ज्या लागल्या जीवा

 1. आपल्या मागणीनुसार सर्च चा पर्याय मी इथे दिला आहे. ही अनुदिनी सुधारण्याला आणि युजर फ्रेंडली करण्याकरता केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद.

  जर या प्रयत्नाने तुम्हाला हवी असलेली पुस्तके उपलब्ध न झाल्यास, तुम्ही उजवीकडच्या विषयवार विभागणीत पुस्तकांची लेखक आणि विषयानुरूप विभागणी केलेली पाहू शकता. नुसता ‘पुस्तके’ हा पर्याय निवडला तरी इथे असलेल्या पुस्तकांची यादी तुम्हाला मिळू शकेल.

 2. how to search for specific thing like book of जोनाथन लिव्हींगस्टन सीगल

 3. भा. रा. तांबे हे माझ्या आवडत्या कवींपैकी एक…आणि ही तर विशेष आवडती कविता…इथे पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.

 4. आपले हे संकेतपृष्ठ फार आवडले. भा.रा.तांब्यांचे आम्ही चाहते आहोत. त्यामुळे मराठी ब्लॉग्स डॉट नेट वर त्याचा उल्लेख दिसतात ते पान उघडले.
  आपण मराठी साठी मोलाचे कार्य करीत आहात, त्याचा आम्हादिकांस आनंद आहे.
  मराठीच्या संवर्धनासाठी आपल्याला आमच्या शुभेच्छा.
  आपला,
  (शुभचिंतक) धोंडोपंत

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: