9 प्रतिक्रिया

मंगेश पाडगांवकर


 प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ? या ओळी चिल्लर वाटतात ?
काव्याच्या दॄष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुध्दा,तरीसुध्दा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं;
‘लव्ह’ हे त्याचचं दुसरं ‘नेम’ असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

सोळा वर्ष सरली की,
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना ?
तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडलो असतो तरीसुध्दा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं!
तुम्हांला हे कळलं होतं, मलासुध्दा कळलं होतं.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबिम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एकजण चक्क मला म्हणाला :
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी प्रेमबिम कधीसुध्दा केलं नाही !
आमचं काही नडलं का ? प्रेमाशिवाय अडलं का ? ”
त्याला वाटलं मला पटलं;
तेव्हा मी इतकचं म्हटलं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं अगदी ‘सेम’ नसतं !

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्ध-अर्ध खाल्लं असेल गोडीने
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत तासनतास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल.
प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतं सुध्द, निळं चांदणं सांडतं सुध्दा,
दोन ओळींची चिठ्ठीसुध्दा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुध्द प्रेम असतं.

बोलगाणी – मंगेश पाडगांवकर

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

9 comments on “मंगेश पाडगांवकर

 1. kavita vachali tari premachi anubhuti hote………..

 2. Verry Verry Nice!

  Mr.Raju M. Pawar
  At. Mahalaxmikheda,
  Tq. Gangapur.
  Dist. Aurangabad 431136.

 3. mangesh padgaonkar tar kharach great aahet!!!!!!!!!

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: