2 प्रतिक्रिया

युध्द ता-यांचे, स्वप्न स्वरांचे ( सा रे ग म प )- भाग १


गाईन गीत सुरेल नवे,
जे रसिकांचे मन रिझवे,
संगीताने जग भरले,
हे स्वप्न स्वरांचे उलगडले,
नाचले, रंगले, दंगले, गुंगले,
तन-मन गुणगुणले सा रे ग म प

मागचा सारेगमप चा एवढा मोठा मेगा इव्हेंट झाला पण मी पहिल्यापासून तो कार्यक्रम  बघितलाच नव्हता. लग्नाआधी ब-याच वेळा पहाटगाणी ; खास करून नविन वर्षाच्या सुरूवातीला वगैरे च्या मैफीली ऎकल्या होत्या. पण  अहोंना त्यात काडीचाही रस नाही त्यामुळे घरच्या घरीच जे काही पाहता येईल ते पाहायचे. तर १० ते ११ ची वेळ मला जमत नव्हती म्हणून दुस-या दिवशी का होईना पण दुपारी ३.३० ते ४.३० तरी हा कार्यक्रम मी पहायचाच असे ठरवले.

थोडे कुतुहल हे होते की हे भाग साधासुधे नव्हते, तर खास मालिकेतले कलाकार यात स्पर्धक म्हणून सहभागी होणार होते. कलाकार होते – मेघना वैद्य, सीमा देश्मुख, मधुराणी गोखले – प्रभुलकर, प्रिया बापट, पंकज विष्णू, प्रसाद ओक, सुमित राघवन आणि सुनिल बर्वे. जगावेगळी मालिकेत सीमा देशमुख चा , चार दिवस सासूचे मध्ये पंकज विष्णू चा आणि सध्या चाललेल्या साता जन्माच्या गाठी मध्ये प्रसाद ओक चा या व्यतिरिक्त अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून मी कोणाचाही अभिनय बघितला नव्हता.

पहीला भाग सुरू झाला आणि लक्षात आलं की कौशल इनामदार, डॉ. सलील कुलकर्णी, मिलिंद जोशी आणि मिलिंद इंगळे हे चार गुणी गायक इति संगीतकार या आठ स्पर्धकांचं मूल्यांकन करणार आहेत. त्याप्रमाणे १ ला भाग पार पडला. प्रत्येक स्पर्धकाने गायलेल्या गाण्यावर या प्रत्येक संगीतकाराने आपापल्या परीने भाष्य केले; त्यातल्या त्रुटी त्यांना सांगितल्या; त्यांच्या गुणाची तारीफही केली.

स्पर्धेच्या सुरूवातीला प्रत्येक संगीतकाराने प्रामुख्याने हेच नमूद केलं की स्पर्धक मूलत: कलाकार (अभिनेता/अभिनेत्री) आहेत. त्यामुळे एखादा कलाकार गाताना आपल्या अभिनयाद्वारे हे गाणं श्रोत्यांपर्यंत कसं पोहोचवतो हे पाहणं नक्कीच रंजक असेल.

प्रत्येकाच्या आवाजाचा स्वत:चा एक बाज असतो ; त्याप्रमाणे या संगीतकारांना पंकज विष्णू च्या आवाजात ब्रायन अँडम्सचा हस्कीपणा जाणवला, सुनिल बर्वेच्या आवाजात एक प्रामाणिकपणा जाणवला, सुमित राघवन मध्ये खराखुरा गायक जाणवला तर मधुराणी मध्ये जुन्या काळातील गाणी गायची क्षमता जाणवली.

स्पर्धकाने गाणे म्हणायच्या आधी त्यांच्या एखाद्या सहकलाकाराचे त्यांच्या गाण्याविषयी मांडलेले मतही दाखवण्यात आले.

सगळ्या स्पर्धकांची गाणी संपल्यानंतर ४ महीला स्पर्धक आणि ४ पुरूष स्पर्धक यांच्या नावाच्या चिठ्ठया करून प्रत्येक संगीतकाराला दोन्हीतली एक-एक  निवडण्यास सांगण्यात आले. आणि मग लक्षात आले की स्पर्धक केवळ हे कलाकारच नाहीत तर हे ४ संगीतकार सुध्दा स्पर्धकच आहेत. त्यांनी निवडलेल्या चिठ्ठीतल्या २ कलाकारांची आणि त्या संगीतकाराची अशी मिळून एक टीम होणार. त्या संगीतकाराने त्यांना सोपवलेल्या कलाकारांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून गाणी गाऊन घ्यायची. थोडक्यात ४ टीम एकमेकांशी लढत एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करणार. आता या स्पर्धेत दुहेरी रंगत निर्माण झाली.

निवडलेल्या चिठ्ठयांनुसार अश्या टीम्स तयार झाल्या….

कौशल इनामदार – मधुराणी गोखले प्रभुलकर , पंकज विष्णू

डॉ. सलील कुलकर्णी – मेघना वैद्य , सुनिल बर्वे

मिलिंद जोशी – प्रिया बापट , सुमित राघवन

मिलिंद इंगळे – सीमा देशमुख , प्रसाद ओक

(क्रमश:)
 

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “युध्द ता-यांचे, स्वप्न स्वरांचे ( सा रे ग म प )- भाग १

  1. de naray ne deat jave hi kavita konachi ahay
    te mala sangave.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: