2 प्रतिक्रिया

युध्द ता-यांचे, स्वप्न स्वरांचे ( माझे मनोगत )- भाग ३


खरं तर प्रत्येक भागाच्या गाण्यांसकट , वैशिष्ट्यांसकट मला ते भाग मांडायचे होते; पण आज लिहू उद्या लिहू करता करता राहून गेलं. प्रत्येक भागागणिक आधीच्या भागात घडलेलं विसरायला व्हायला लागलं तेव्हा सगळ्यांत आधी कागद , पेन घेऊन जेवढं काही आठवलं ते लिहून काढलं.

आत्तापर्यंत बाद झालेल्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर ……

पंकज विष्णू :-  याने बोलताना कॉलेज मध्ये असताना गायल्याचे सांगितले पण  ज्याचा आवाज बोलतानाच इतका खरखरीत लागतो कींवा ज्याला साधं बोलताना सुध्दा इतक्या शिरा ताणाव्या लागतात तो गाऊ कसा काय शकत असेल याचे मला आश्चर्य वाटले.

प्रिया बापट :- नाकात गाते. वयाने इतर स्पर्धकांपेक्षा सगळ्यात लहान असल्याने आणि या क्षेत्रात नव्यानेच श्रोते , प्रेक्षक आपल्याला आजमावताहेत या जाणीवेने दडपण आलेली; तरी ते न दाखवता हस-या चेह-याची प्रिया  ‘केतकीच्या वनी’ आणि ‘नारायणा रमारमणा’ सहजसुंदर म्हणून गेली. पण अर्थातच इतर स्पर्धक तिच्यापेक्षा सरस ठरल्याने तिला बाद व्हावे लागले.

मधुराणी गोखले-प्रभुलकर :- तिच्या आवाजात नेहमी आढळणारा गोडवा नव्हता पण जरा हटके असल्याने त्यात एक वेगळेच माधुर्य होतं. रोजं साखरभात  खाणा-याला एखाद्या दिवशी पिठलं भात सुध्दा अमॄताप्रमाणे वाटतं तसा तिचा आवाज होता. प्रसिध्द गाणी म्हणण्यापेक्षा  जास्तीत जास्त अप्रकाशित गाणी गाण्याचं धाडस या स्पर्धेत तिनं एकटीनंच दाखवलं. त्या निमित्ताने ‘कौशल इनामदार’ आणि ‘मधुराणी’ ला दाद द्यावी तितकी कमीच आहे. ती या स्पर्धेत राहती तर अजून अनेक चांगल्या रचना आपल्याल ऎकता आल्या असत्या.

मेघना वैद्य :- यांचं बाद होणं थोडं धक्कादायकचं झालं. खरं तरं त्या बाद झाल्या त्या भागात काय किंवा आधीच्या कोणत्याही भागात त्या डेंजर झोन मध्ये गेल्या नव्हत्या. चेह-याप्रमाणेच आवाजही सात्विक असणा-या मेघनाताई इतक्या लवकर बाद होतील असे वाटलेचं नव्हते मला. भले आशाच्या उडत्या चाली त्यांना मानवल्या नसत्या कदाचित पण लताचे संयत सूर त्यांनी उत्तम पेलले होते. त्या बाद झाल्यावर त्यांचा या स्पर्धेतला सहकारी ‘सुनिल बर्वे’ याने दिलेली प्रतिक्रीया खूपचं बोलकी होती. तो म्हणाला, “मला स्वत:ला व्हिलन झाल्यासारखं वाटतयं. दर वेळी मी डेंजर झोन मध्ये जातो पण दुसरंच कोणीतरी बाद होतं. आताही जर मला चान्स दिला तर मेघनाताईंच्या ऎवजी मी बाद व्हायला तयार आहे”. त्याचं भाष्य आणि कल्पना न केलेलं मेघनाताईंच बाद होणं खूप चटका लावून डोळ्यांतून बरसून गेलं.

सुनिल बर्वे :- मध्येच चुकणारा पण सुरूवातीपासून चांगलं गायचा खूप प्रामाणिक प्रयत्न तो करत होता. दुर्दैवाने बाद होईपर्यंतच्या प्रत्येक भागात तो डेंजर झोन मध्ये येत राहिल्याने त्याच्या गाण्यावर त्याचा नर्व्हसनेस जाणवत राहिला. खरं तरं त्याची गाण्यांची निवड चुकीची  ठरली. तो सातत्याने स्वत:च्या व्यक्तिमत्वाला शोभतील अशी संथ , उदास गाणी गात राहीला. एकदाच त्याने एका भाजीवाल्याचे एक धमाल गाणे म्हटले होते आणि त्याचा त्याला पुरेपुर फायदा मिळाला होता.
तो बाद झाला तेव्हा त्याच्या बायकोने सांगितले की, “त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने गायक व्हावे. आणि या स्पर्धेत त्यांची इच्छा पूर्ण करायचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केला असे मला वाटते”. मेघनाताई बाद झाल्या त्या वेळी दाखवलेला खिलाडूपणा त्याने स्वत:च्या बाद होण्याच्या वेळीही दाखवला. कॉल बँक करता एसेमेस चे आवाहन करताना त्याने “मी जर चांगला गायलो असेन तरचं मला बोलवा, नाहीतर माझ्यापेक्षा चांगलं गायलेल्या इतर कोणत्याही स्पर्धकाला तुम्ही बोलवा” असे सांगितले. तर दुसरीकडे ‘डॉ. सलील कुलकर्णीं’ ना “पुढच्या भागात आपण येऊच” म्हणून स्पिरीटही दाखवले. हँट्स ऑफ टू यू सुनिल.

सातत्याने प्रयोग करायला न कचरणारी म्हणून ‘मधुराणी’चं , सातत्याने पहिल्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स देणा-या म्हणून ‘मेघनाताईं’चं आणि स्पर्धेतून दुर्मिळ होत चाललेल्या खिलाडूवॄत्तीचं दर्शन देणा-या ‘सुनिल’चं मला खास अभिनंदन करावेसे वाटते.  स्पर्धेतून जरी हरले तरी रसिकांचे मन त्यांनी जिंकले आहे. ते प्रेम कायम त्यांच्या पाठीशी राहील याची शाश्वती वाटते.

(क्रमश:)

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “युध्द ता-यांचे, स्वप्न स्वरांचे ( माझे मनोगत )- भाग ३

  1. धन्यवाद कौशल, माझ्या अनुदिनीला भेट दिल्याबद्दल. आलेल्या प्रतिसादात तुमचे नाव वाचून धस्सं झालं; वाटलं आपण उगाच काहीतरी मनाला येईल ते लिहीलं, तुमच्यापैकी कोणी ते वाचेल याची तमा बाळगली नाही. आणि वाचलं तरी कोणी प्रतिसाद द्यायच्या भानगडीत पडेल असेही वाटले नव्हते. त्यामुळे खरं तरं आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
    तुमचा ब्लॉग सुध्दा मी पाहिला. अजून वाचला नाही. मी ब्लॉग ला भेट देण्यापेक्षा आर्.एस.एस. फीड ने वाचणे पसंत करते ज्यामुळे संग्राह्य लेख आपल्याकडे राहू शकतात. केव्हाही ऑफलाईन वाचता येतात. त्यामुळे वाचले की नक्की त्याबद्दल कळवीन. अर्थात तुमच्यापुढे आम्ही म्हणजे पु.लं. च्या भाषेत सूर्याने काजव्यापुढे चमकण्यासारखे आहे.

    कळावे लोभ असावा.

  2. इतका सविस्तर आणि समर्पक लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि आमचं इतक्या खुल्या दिलानं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद! तुमचा ब्लॉग वाचत राहीन.

    माझा ब्लॉग:

    http://musicandnoise.blogspot.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: