यावर आपले मत नोंदवा

युध्द ता-यांचे, स्वप्न स्वरांचे ( सा रे ग म प )- भाग २


मला हे लेख लिहायला तब्बल ५ आठवडे उशीर झाल्याने ५ स्पर्धक या स्पर्धेतून आधीच बाद झाले आहेत. पण या आठवडयात ‘कॉल बँक एपिसोड’ होणार आहे. तेव्हा विचार केला की आधीच्या घडून गेलेल्या ५ भागांचा परामर्श या लेखात घेऊया.

आठवडा १
खरी स्पर्धा पुढल्या आठवडयापासून सुरू झाली. पहील्या आठवडयातल्या २ भागांचे परीक्षक होते ज्येष्ठ गीतकार / संगीतकार श्री. सुधीर मोघे.

ज्या संगीतकाराचा स्पर्धक गात असेल त्याच्या व्यतिरीक्त इतर तिघांनी गुण द्यायचे हे ठरले होते. शिवाय या संगीतकारांच्या मतांचा विचार ३०% आणि मान्यवर परीक्षकांचा विचार ७०% ग्राह्य धरला जाईल हे ही ठरले. तसेच एखादया  संगीतकाराचे दोन्ही स्पर्धक बाद झाले तर त्यालाही या स्पर्धेतून बाद व्हावे लागेल , आठवडयाच्या पहिल्या भागात एखादया थीमवर गावे लागेल पण दुस-या दिवशी स्पर्धक आपल्या इच्छेनुसार आवडती गाणी गाऊ शकतात इ. नियम सांगून आणि प्रेक्षकांना आवडलेल्या स्पर्धकाला जास्तीत जास्त एसेमेस पाठवा जेणेकरून त्याला कॉल बँक एपिसोड मध्ये संधी मिळेल असे आवाहन करून स्पर्धेला सुरूवात झाली.

पहिल्या भागाची थीम होती नवरसांवर आधारीत गाणी. सगळ्यांची गाणी गाऊन झाल्यावर मिळालेल्या गुणांच्या आधारे ८ पैकी पंकज विष्णू, सुनिल बर्वे आणि प्रिया बापट हे ३ स्पर्धक मागे असल्याचे निष्कर्षास आले.
दुस-या भागाची सुरूवात आधीच्या भागतल्या गुणानुसार जो संगितकार आघाडीवर आहे त्याच्या स्पर्धकाने होते. संगणकाने निर्देश केलेल्याप्रमाणे १ ते ४ असा अनुक्रम लावून पुन्हा ४ ते १ असा क्रम लावण्यात येतो. त्यानुसार मिलिंद इंगळे हे पहिल्या आठवडयात आघाडीवर होते. त्यांच्या स्पर्धकापासून सुरूवात होऊन स्पर्धेचा पहिल्या आठवडयाचा दुसरा भाग संपन्न झाला. आणि परीक्षकांच्या निर्णयानुसार ‘पंकज विष्णू’ याला या स्पर्धेबाहेर जावे लागले. मात्र त्याच वेळी त्याची या स्पर्धेतली जोडीदार आणि ‘कौशल इनामदारांची’ दुसरी स्पर्धक ‘मधुराणी’ मात्र सगळ्यात जास्त गुण मिळवून आघाडीवर होती.

आठवडा दुसरा (२)
दुस-या आठवडयाचे परीक्षक होते मान्यवर तबलावादक ‘श्री. विजय घाटे’. तालांवर बेतलेली गाणी अशी या पहील्या भागाची थीम होती. पहील्या भागाअखेरीस ७ पैकी मागे पडलेल्या ३ स्पर्धकांमध्ये होते; ‘सुनिल बर्वे’, ‘प्रिया बापट’ आणि पहिल्या आठवडयात आघाडीवर असणारी ‘मधुराणी गोखले – प्रभुलकर’
दोन्ही भागांचा आढावा घेतल्यावर ‘मिलिंद जोशींच्या’ ‘प्रिया बापट’ ला प्रेक्षकांना निरोप द्यावा लागला. पण त्याच वेळी आघाडीवर होता त्यांचाच दुसरा स्पर्धक ‘सुमित राघवन’.

आठवडा तिसरा (३)
तिस-या आठवडयाचे परीक्षक होते लोकशाहीर ‘श्री. विठ्ठल उमप’. लोकसंगीतावर आधारलेली गाणी अशी या पहील्या भागाची थीम होती. पहील्या भागाअखेरीस ६ पैकी मागे पडलेल्या २ स्पर्धकांमध्ये होते; ‘सुनिल बर्वे’,  आणि पहिल्या आठवडयात आघाडीवर असणारी ‘मधुराणी गोखले – प्रभुलकर’
दोन्ही भाग पूर्ण झाल्यावर कमी गुण मिळाल्याने ‘मधुराणी’ ला या स्पर्धेतून बाद व्हावे लागले. तिचा सहकारी आणि ‘कौशल इनामदार’ यांचा दुसरा स्पर्धक ‘पंकज विष्णू’ पहिल्या आठवडयातच बाद  झाल्याने आता ‘कौशल इनामदार’ यांनाही स्पर्धेच्या नियमांप्रमाणे बाद व्हावे लागले.
या आठवडयात आघाडीवर होता ‘मिलिंद इंगळें’ चा ‘प्रसाद ओक’

आठवडा चौथा (४)
चौथ्या आठवडयाचे परीक्षक होते मान्यवर शास्त्रीयगायक ‘श्री. प्रभाकर कारेकर’. रागांवर आधारलेली गाणी अशी या पहील्या भागाची थीम होती. पहील्या भागाअखेरीस ५ पैकी मागे पडलेल्या २ स्पर्धकांमध्ये होते; नेहमीप्रमाणेच ‘सुनिल बर्वे’, आणि चक्क दुस-या आठवडयात आघाडीवर असणारा ‘सुमित राघवन’.
दोन्ही भागांचा आढावा घेतल्यावर ‘डॉ. सलील कुलकर्णीं’  च्या ‘मेघना वैद्यं’ ना प्रेक्षकांना निरोप द्यावा लागला. त्या आठवडयात आघाडीवर होती ‘सीमा देशमुख’.

आठवडा पाचवा (५)
पाचव्या आठवडयाच्या परीक्षक होत्या मान्यवर नाट्यासंगीत गायिका ‘श्रीमती. फैय्याज.
नाट्यासंगीत अशी या पहील्या भागाची थीम होती. आता या स्पर्धेत ४ च स्पर्धक उरले असल्याने नाट्यसंगीताची फेरी झाल्यावर त्याच भागात आपली आवडती गाणी म्हणायची मुभा स्पर्धकांना दिलि होती. पहील्या भागाअखेरीस ४ पैकी मागे पडलेल्या २ स्पर्धकांमध्ये होते; नेहमीप्रमाणेच ‘सुनिल बर्वे’, आणि चौथ्या आठवडयात आघाडीवर असणारी ‘सीमा देशमुख’.
दोन्ही भागांचा आढावा घेतल्यावर लागोपाठ ‘डॉ. सलील कुलकर्णीं’  च्या ‘सुनिल बर्वे’ ला एकदाचा प्रेक्षकांना निरोप द्यावा लागला. त्या आठवडयात आघाडीकरता ‘सुमित राघवन’ आणि ‘प्रसाद ओक’ मध्ये टाय झाला होता .

अश्या त-हेने ५ आठवडयांमध्ये अनुक्रमे ‘पंकज विष्णू’, ‘प्रिया बापट’, ‘मधुराणी गोखले’ , ‘मेघना वैद्य’ आणि ‘सुनिल बर्वे’ यांना स्पर्धेतून बाद व्हावे लागले. सहाव्या आठवडयाचा भाग हा कॉल बँक एपिसोड होणार आहे तेव्हा पाहूया कोणाची वर्णी लागते ते.

(क्रमश:)

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: