2 प्रतिक्रिया

मायेच्या हळव्या…


मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते,
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान ? कसे गहिवरते ?

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते,
सावरते, बावरते , घडते, अडखळते, का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते,
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते,
अन क्षणांत फिरूनी आभाळाला भिडते,
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान ? कसे गहिवरते ?

रूणझुणते, गुणगुणते , कधी गुंतते , हरवते,
कधी गही-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते,
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते,
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
नावडे तरी भासांच्या मागून पळते ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “मायेच्या हळव्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: