यावर आपले मत नोंदवा

महात्माजींचे पत्र


महात्माजींचे पत्र
महात्माजींचे लिलावात निघणारे पत्र परत मिळविण्यात आपल्या केंद्र सरकारला यश आले आहे. “ख्रिस्तीज्‌’ या विख्यात कंपनीकडून या पत्राचा लिलाव होणार होता. पत्र परत मिळाल्याचा बराच गाजावाजा आता सरकारकडून करण्यात येईल. ते भारतात आणल्यावर त्याचे समारंभपूर्वक स्वागतही होईल. असले समारंभ करण्यात आपला हात धरणारा कुणी नाही. महात्माजींच्या या पत्राचे ऐतिहासिक मूल्य काय किंवा एकूणच इतिहासाबद्दल आपल्याला कितपत आस्था आहे, असल्या प्रश्‍नांचा खोलवर विचार करण्याचे आपण कैक वर्षांपूर्वीच सोडून दिले आहे. पण महात्माजींच्या कोणत्याही वस्तूला भारतात भावनात्मक मूल्य आहे, हे सरकार जाणते. पत्र हातातून गेले असते तर बरीच टीका झाली असती. आता वाद होणार नाही, पण सरकार स्वतःची पाठ थोपटून घेईल. मागे अंतुले यांनी शिवाजी महाराजांची भवानी तलवार थेट लंडनहून आणल्याचा बराच गाजावाजा केला होता. ती खरोखरच भवानी तलवार होती की नाही, हे कधीच कळले नाही. जनतेला महाराजांच्या तलवारीबाबत नक्कीच प्रेम होते; पण तलवारीपेक्षा शिवरायांसारखे येथे राज्य चालवावे ही अपेक्षा अधिक होती. तसे कधी झाले नाही; उलट भलतेच “भोसले’ अलीकडे आदर्श ठरू लागले आहेत. महात्माजींच्या पत्राचे तसेच होणार आहे. या पत्राबद्दल बातम्या प्रसिद्ध झाल्यावर सरकार जागे झाले. तोपर्यंत महात्माजींच्या पत्राचा लिलाव होणार आहे याचा पत्ताही नव्हता. पत्राची माहिती मिळाली असती तरी सरकारी पातळीवर त्वरेने हालचाल झाली असती, असे म्हणता येत नाही. याचे कारण आपल्या हाडीमासी खिळलेली इतिहासाबद्दलची अनास्था. मुळात नोंदी करून ठेवण्याची सवय भारतीयांना नाही. केलेल्या नोंदी क्वचितच जतन केल्या जातात. ऐतिहासिक कागदपत्रांबाबत कमालीची अनास्था असल्याने इतिहासाचा अभ्यासच होत नाही. अध्यात्मात जसे तत्त्वज्ञानापेक्षा पुराणात आपण अधिक रमतो, तसेच स्वच्छ नजरेने इतिहास समजून घेण्यापेक्षा बखरी आपल्याला आवडतात. कोणतीही माहिती उघड करण्याची सरकारला धास्ती वाटते. म्हणून गेल्या पन्नास वर्षांतील अनेक महत्त्वाच्या घटनांचे सरकारी दस्तावेज अभ्यासकांना उपलब्ध होत नाहीत. नेहरूंची अनेक कागदपत्रे अद्याप गोपनीय आहेत. लढाया, आपत्ती, महत्त्वाचे करार याबद्दल बरीचशी माहिती विनाकारण गोपनीय ठेवण्यात येते. सरकारला धास्ती वाटली, की कोणतीही कागदपत्रे या देशात “गोपनीय’ होऊ शकतात. परदेशात ठराविक वर्षांनी बहुतेक सर्व कागदपत्रे उघड केली जातात. भूतकाळातील घटनांवर त्यातून प्रकाश पडतो, चुका समजून घेता येतात. नवे दृष्टिकोन स्वीकारताना या जुन्या माहितीचा फायदा होतो. यातून ती राष्ट्रे शिकत जातात. असे शिक्षित होण्यापेक्षा बखर वा प्रचारकी इतिहासात आपले सार्वजनिक जीवन मश्‍गूल होत आहे. कागदपत्रांचा आधार घेऊन बोलण्याची वा निर्णय घेण्याची सवय आपल्याला नाही. अगदी वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्येही याचा अनुभव येतो. युरोपीय समाजातील ऐतिहासिक भान, महात्माजींच्या पत्रासोबत थोडे तरी भारतात आले तर पत्रासाठी मोजलेले पैसे सार्थकी लागले, असे म्हणता येईल.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: