7 प्रतिक्रिया

अक्युपंक्चरने वजन आटोक्यात


 [ Wednesday, January 31, 2007 07:14:26 pm]
 
 आहारावर नियंत्रण मिळवण्याच्या अघोरी पद्धती, रोज मरेपर्यंत वर्कआऊट, मसाज… वजन कमी करण्यासाठी किती करायचं, याला काही मर्यादा आहे की नाही, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर अॅक्युपंक्चर पद्धतीची मदत घ्या. या पद्धतीने शरीरसंस्थेचं कार्य सुधारतं आणि पचनप्रक्रिया सुधारते. याचा परिणाम म्हणजे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील सूज जाऊन जडत्व कमी होतं. मात्र या सर्वाला शॉर्टकट नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे.
 
 स्थूलत्व कमी करण्याच्या प्रचलित उपयांव्यतिरिक्त अॅक्युपंक्चर पद्धतीनेही वजन कमी करता येऊ शकतं. शरीराचं वजन जेव्हा प्रमाणाबाहेर वाढतं,
 
 तेव्हा त्या अवस्थेला ‘स्थूलपणा’ असं म्हणतात. अतिरिक्त चरबीच्या स्वरूपात हे वजन शरीरात ठिकठिकाणी दिसू लागतं. शरीराची दिसणारी आणि न दिसणारी सूज याला मात्र ‘स्थूलपणा’ म्हणता येत नाही. गरजेपेक्षा जास्त जेवल्याने, दिवसभर सतत काही ना काही खात राहिल्याने, जास्त उष्मांक असणारा आहार सतत घेतल्याने, जास्तीचे उष्मांक (कॅलरीज) चरबीच्या रूपात शरीर साठवू लागतं आणि हळूहळू स्थूलपणा येऊ लागतो.
 
 इतरांच्या तुलनेत स्थूल व्यक्तींना शारीरिक दुखणी जडण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. ब्लडप्रेशर, डायबिटिस, थोडंसं चाललं तरी दम लागणं, त्वचाविकार, मानसिक संकोच, कुचंबणा, हृदय आणि इतर रक्तवाहिन्यांचे विकार, गुडघेदुखी, कण्याचे विकार, पायांना सूज आदी अनेक दुष्परिणामांना स्थूल व्यक्तीला सामोरं जावं लागतं. चरबीचा दाब पडून श्वसनाला अडथळे निर्माण होणं, हे प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतं. रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. स्त्रियांमध्ये व्यंध्यत्वाचं एक कारण म्हणजे स्थूलता असू शकते.
 
 यावर असंख्य उपचार उपलब्ध आहेत. त्यात पहिला मानसिक उपचार म्हणजे माझं वजन जास्त खाणं आणि त्या तुलनेत कमी श्रम यामुळे वाढलं आहे. ते कमी करण्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. हे प्रयत्न सकारात्मक मनोवृत्ती आणि कृतीने दीर्घकाळ करायला हवेत. दरवेळी वजनातील फरक बघताना वजनकाटा, पोषाख सारखा असणं गरजेचं आहे. पाणी अथवा दवरूप पदार्थ घेतल्यास, मलविसर्जन झाले नसल्यास, जेवण झालं असल्यास किंवा स्त्रियांना मासिक पाळी येण्यापूवीर् वजन केलं तर त्यात अर्धा ते एक किलोचा फरक जाणवू शकतो.
 
 स्थूलत्व नियंत्रणामध्ये आहार कमी करणं किंवा कमी खाणं ही एक पायरी असते. पूर्ण दिवस उपास करणं, उपास वाढवणं, एक वेळ काहीच न खाणं, अन्न घटकातील काहीच घटक घेणं आदी गोष्टींनी शरीराला उपायापेक्षा अपाय होऊ शकतो. सर्व अन्नघटकांची परिपूर्ण म्हणजेच कबोर्दकं, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वं, क्षार, तंतूमय पदार्थ, पाणी हे योग्य प्रमाणात घ्यायला हवं. यातील प्रत्येक घटकाची शरीराला नितांत आवश्यकता असते. आहारातील बदलाबरोबर योग्य तो व्यायाम आणि शरीराच्या हालचाली वाढवणं अत्यावश्यक आहे. शक्य असतील तेवढी घरातील कामं करण्यात कमीपणा न मानता केली पाहिजेत.
 
 आहार, विहाराच्या योग्य त्या उपचारांबरोबरच वजन कमी करण्यासाठी अॅक्युपंक्चरचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही जे अन्न खाता, ते रक्तात शोषलं जाण्यापूवीर् त्यावर जठर, लहान आतडं इथे पाचकरसांची क्रिया व्हावी लागते. ते शोषणास योग्य अशा अवस्थेत तयार करावं लागतं. चयापचयाच्या क्रियेत पाचक रसांबरोबरच अंतस्थ ग्रंथीचे साव महत्त्वपूर्ण कार्य करतात. तसंच शरीरातील चरबी कमी करण्यासाठी या काही घटकांची निमिर्ती व्हावी लागते. त्यासाठी संपूर्ण आहाराचं महत्त्व आहे.
 
 शरीरातील महत्त्वाचे अवयव यीन आणि यँगमध्ये विभागले आहेत. पोकळी असलेले अवयव आणि पोकळी नसलेले अवयव असंही विभाजन कार्य सूत्रबद्ध सुरू असतं.
 
 पोकळी असलेले अवयव (जठर, लहान आतडे, मोठे आतडे, पित्ताशय, मूत्राशय) हे अवयव पचनाशी संबंधित आहेत. पचनक्रिया पूर्ण करून अन्नरस शोषून नको असलेले मल, मूत्र बाहेर टाकण्याचं काम हे अवयव करतात. यापैकी कोणत्याही एका अवयवाच्या कार्यात बिघाड झाला, तरी पचनावर परिणाम होतो. यकृत, प्लीहा यांचं महत्त्व तर अनन्य साधारण आहे. अॅक्युपंक्चरमध्ये या सर्व अवयवांशी संबंधित आणि इतर काही महत्त्वाच्या बिंदूना उत्तेजित केलं जातं. त्यामुळे शरीरसंस्थेचं कार्य सुधारायला मदत होते. पचन सुधारतं, शरीराला नको असणाऱ्या गोष्टींचं उत्सर्जन योग्य रीतीने पूर्ण आणि व्यवस्थित होतं. याचा परीणाम म्हणजे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील सूज जाऊन जडत्व कमी होतं. मात्र या सर्वाला शॉर्टकट नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे.
 
 अॅक्युपंक्चर हे शास्त्रावर आधारित असल्यामुळे त्याचा परिणाम शरीराला कोणतीही हानी न करणारा आणि दीर्घकाळ असतो. प्रत्येक पेशण्टच्या वय, प्रकृती आणि इतर गोष्टींवर त्याला लागणारी सिटिंग्ज वेगळी असतात. तेवढी सिटिंग्ज पूर्ण करणं पेशण्टच्याच हिताचं असतं. सिटिंग्जनंतर पेशण्टला काही बिंदूवर घरच्या घरीच दाब देऊन स्वत:च उपचार घेता येतो. तसंच आथिर्कदृष्ट्या अॅक्युपंक्चर पद्धती परवडणारी अशी आहे. परदेशात अॅक्युपंक्चरचं महत्त्व समजलं आहे. भारतातही ही पद्धती हळूहळू स्वीकारली जात आहे.
 
 नुसता आहार कमी करणं किंवा ठराविक व्यायाम करणं याचा पेशण्टला कंटाळा येऊ शकतो. शरीरही बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन चयापयाचा वेग ठरवते. त्यामुळे सुरुवातीला वजनात जाणवलेला फरक नंतर कमी होतो, म्हणूनच अॅक्युपंक्चरची जोड देणं स्थूलत्व कमी करण्यास फायदेशीर ठरतं. वजन आणि उंची यांच्या आदर्श तक्त्यांमध्ये अगदी चपखल बसलो नाही तरी त्या वजनाच्या जवळपास पोहोचणं आवश्यक आहे.
 
 – डॉ. आरती साठे

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: