१ प्रतिक्रिया

आमटीचा चटकदार, पौष्टिक पर्याय


 इतर कडधान्यांच्या, डाळींच्या मानाने महाराष्ट्रीय जेवणात उडदाचा वापर कमी केला जातो. परंतु उडदात भरपूर पौष्टिक तत्त्व असतात. उडदाचे पापड, आमटी, घुटं, अगदी उडीद पिठाचे तूपसाखर घालून पौष्टिक लाडूही बनविले जातात. शहरापेक्षा खेड्यांमधून आजही उडदाचं घुटं, आमटी आवर्जून केली जाते.

उडदाचं घुटं
साहित्य – एक वाटी उडदाची डाळ किंवा आख्खे उडीद, मूग व चणा डाळ प्रत्येकी पाव वाटी, चार हिरव्या मिरच्या, ८-१०लसूण पाकळ्या, अर्धी वाटी ओलं खोबरं, आल्याचा छोटा तुकडा, चमचाभर चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे, ३ चमचे तेल, फोडणीचे साहित्य, कढीपत्ता, २ सुक्‍या लाल मिरच्या, कोथिंबीर.

कृती – उडीद भाजून घ्या. डाळी व उडीद थंड पाण्याने धुऊन घ्या व पाणी घालून शिजवून घ्या. हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, ओलं खोबरं, जिरे एकत्र वाटून घ्या. शिजवलेली डाळ घोटून घ्या. कढईत तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्ता घालून खोबऱ्याचे वाटण घाला. घोटलेल्या डाळीत दोन वाट्या गरम पाणी घालून ती फोडणीत घाला. त्यात मीठ, गरम मसाला, गूळ, चिंचकोळ घाला. मंद आचेवर उकळू द्या. सरसरीत ठेवा. सुक्‍या लाल मिरच्यांची फोडणी व कोथिंबीर घालून सजवा. थंडीत अगर पावसाळ्याच्या गारव्यात भाकरी- पोळीबरोबर गरमागरम घुट्याची लज्जत औरच.

– निर्मला देशपांडे

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “आमटीचा चटकदार, पौष्टिक पर्याय

  1. hummm! tondala pani sutlay

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: