यावर आपले मत नोंदवा

कार रिपेअरिंग


[ Tuesday, March 27, 2007 07:11:06 pm]

कार रिपेअरिंग हे काम नित्यनेमाने करायचं नसलं तरी ते कमी महत्त्वाचं नाही. गाडीच्या आवश्यक त्या भागांची वेळच्या वेळी दुरुस्ती करून घेतली तर वाटेत येणारे अडथळे टाळता येतील. सहज सोप्या पद्धतीने आणि अवास्तव खर्च न करता कार कशी रिपेअर करता येऊ शकते याविषयी…

– आपली कार कोणत्याही मेकॅनिकच्या हातात सोपवण्यापूवीर् तो मेकॅनिक ओळखीचा आणि विश्वासातला असणं गरजेचं आहे. पण अशा मेकॅनिकची शोधाशोध ऐनवेळी करण्यापेक्षा आधीपासूनच एखादा चांगला मेकॅनिक शोधून ठेवा. कुठल्या गॅरेजमध्ये रिपेअरिंगच्या चांगल्या सुविधा आहेत हे हेरून मगच तुमची गाडी त्यांच्या हातात सोपवा.

– ज्याप्रमाणे प्रत्येकाचा फॅमिली डॉक्टर असतो त्याप्रमाणे मेकॅनिक हा गाडीचा डॉक्टर असतो. मेकॅनिकबरोबर तुमची चांगली मैत्री झाली, की तुम्ही बिनधास्तपणे आणि विश्वासाने त्याच्या हातात गाडी सोपवू शकता. मात्र ‘गरज पडली तर…’ किंवा ‘गरज सरो वैद्य मरो’ या न्यायाने न वागता मेकॅनिकच्या संपर्कात राहा. विशेषत: गाडीसारख्या महागड्या वस्तूंची दुरुस्ती करून घ्यायची म्हणजे मेकॅनिक ही व्यक्ती महत्त्वाची.

– गाडीला दर काही दिवसांनी सव्हिर्सिंग करून घ्या. तुमच्या गाडीच्या गरजेनुसार कालावधी निश्चित करा आणि दर तीन महिन्यांनी किंवा दर महिन्यांनी न चुकता गाडी सव्हिर्सिंगला देत जा. यातूनच मेकॅनिकशीही तुमची ओळख होईल आणि अर्थातच या ओळखीचा फायदाही.

– प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गॅरेजमध्ये गाडी नेणं किंवा वरचेवर मेकॅनिक बदलणं टाळा. ज्या गॅरेजमध्ये गाडी सव्हिर्सिंगला देत असाल त्याच गॅरेजमध्ये इतर वेळी गाडी न्या. रेग्युलर सव्हिर्सिंगव्यतिरिक्त एरवी जरी गाडी गॅरेजमध्ये न्यायची वेळ आली तरी गॅरेज आणि मेकॅनिक शक्यतो बदलू नका. ज्याप्रमाणे आरोग्यविषयक तक्रारींसाठी आधी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला जातो आणि फॅमिली डॉक्टर सारखा बदलत नाहीत त्याचप्रमाणे गाडीच्या बाबतीतही नेहमीच्या मेकॅनिकचा सल्ला घेणं अधिक श्रेयस्कर.

– एकाच गॅरेजमध्ये गाडीच्या सर्व भागांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल केली की त्या मेकॅनिकलाही तुमच्या गाडीची हिस्ट्री-जिओग्राफी माहिती होते आणि अर्थातच त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. या दृष्टीने गॅरेज आणि मेकॅनिकशी तुमचा चांगला संपर्क असणं गरजेचं आहे.

– आजकाल कंपन्यांच्या अधिकृत सव्हिर्स स्टेशनात गाडी घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. अशा स्टेशनमध्ये गाडी घेऊन जाणारा ग्राहक सर्व प्रथम तिथल्या सव्हिर्स मॅनेजरशी संपर्क साधतो. परंतु सव्हिर्स स्टेशनमध्ये मॅनेजरपेक्षा तंत्रज्ञ महत्त्वाचा. ज्याला गाडीचं तंत्रज्ञान माहिती आहे अशा तिथल्या टेक्निशियनशी संपर्क साधायला हवा. कारण गाडीची दुरुस्ती, देखभाल तो करणार असतो त्यामुळे मॅनेजरपेक्षा टेक्निशियनशी आपल्या गाडीविषयी सविस्तर बोललं तर ते फायद्याचं ठरू शकतं.

– आजकाल ‘ सव्हिर्स मॅनेजर’ नावाची व्यक्तीची नेमणूक ही त्याच्या मेकॅनिकल ज्ञानापेक्षा त्याचं संभाषणचातुर्य आणि कस्टमर फ्रेण्डली आहेत का, हे पाहून केली जाते. जेणेकरून तो ग्राहकांशी चांगला संवाद साधू शकेल. त्यामुळे गाडीच्या तांत्रिक बाबींची त्याला किती माहिती आहे याचा विचार दुय्यम ठरतो. म्हणूनच सव्हिर्स मॅनेजरपेक्षा टेक्निकल बाबींची माहिती असणारा टेक्निशियन आपल्या गाडीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. टेक्निशियनशी तुमचा चांगला संपर्क प्रस्थापित झाला की त्या रिलेशनशिपचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि त्या गॅरेजबरोबर तुम्ही सहज डिल करू शकता.

– स्कुटी वीन

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: