2 प्रतिक्रिया

बदीनाथ-केदारनाथ


  [ Saturday, March 10, 2007 07:43:47 pm]

बदीनाथ-केदारनाथला केव्हाही गेलो तरी तिथे प्रसन्न, शांत वाटतंच. पण तिथल्या उत्सवांच्या काळात भाविकांच्या मांदियाळीत आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. हजारो भक्तांबरोबर देवाची आराधना करताना निर्माण होणारं भक्तिमय वातावरण निराळीच मन:शांती देऊन जातं.

भारतीय संस्कृतीत चार धाम, तीर्थक्षेत्रं, ज्योतिलिर्ंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणांना भेट द्यावी, असा संकेत आपल्या संस्कृतीत आहे. नेहमी पूजाअर्चा, जपजाप करत असलो तरी या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट दिल्यावर मिळणारं समाधानही खासच असतं. तिथलं वातावरण, प्राचीन मंदिरं, सुंदर मूतीर्, या स्थळांचं धामिर्क महत्त्व आणि त्याला जोड देणारं तिथलं सृष्टीसौंदर्य… शब्दात वर्णन करता येणार नाहीत, पण मनाच्या कप्प्यात राहून सतत प्रेरणा, समाधान देत राहतील असे हे क्षण असतात.

बदीनाथ, रामेश्वर, द्वारका आणि जगन्नाथ हे चारही धाम चार युगांकडे निदेर्श करतात. उत्तंुग हिमालयाच्या उत्तरांचल राज्यात पसरलेल्या टिहरी-गढवाल रांगांत १० हजार २४८ फुटांवर वसलेलं बदीनाथ धाम सत्ययुगाचं प्रतीक मानलं जातं, तर हिमालयाच्या रुद रांगांमध्ये वसलेलं केदारनाथ बारा ज्योतिलिर्ंगांपैकी एक आहे. बदीनाथ हे विष्णूचं, तर केदारनाथ हे शंकराचं देवस्थान.

ब्रम्हदेवानं सांगितलेल्या प्रथेनुसार बदीनाथाचं मंदिर वैशाख ते कातिर्क असे सहाच महिने खुलं ठेवण्याची प्रथा आहे. त्यानुसार एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत मंदिर भक्तांसाठी खुलं असतं. केदारनाथला हिवाळ्यात शंकराची मूतीर् त्याच्या मूळ जागेपासून उक्मीमठ येथे आणली जाते आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा केदारनाथला स्थानापन्न केली जाते. कातिर्क महिन्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातात आणि वैशाख लागला की एप्रिल-मेमध्ये ते पुन्हा बंद होतात.

बदीनाथ तीर्थक्षेत्र अनेक नावांनी ओळखलं जातं. पूवीर् भगवान नारायण येथे वास्तव्यास असल्याची दंतकथा सांगितली जाते. त्यामुळे हे क्षेत्र ‘मुक्तिप्रदा’ नावानं ओळखलं जाई. त्रेतायुगात त्याचं नाव योगसिद्धित, तर द्वापरयुगात त्याचं नाव विशाल होतं. प्रत्येक युगात या क्षेत्राची कीतीर् अधिकाधिक पसरत होती. त्यामुळे कालांतराने त्याला बदीकाश्रम म्हटलं जाऊ लागलं. गंगेच्या प्रवाहावर जिथे विष्णूनं निवास केला ते स्थान बदीनाथ म्हणून मानलं जातं.

भगवान विष्णू या ठिकाणी तपश्चर्या करत असत, असं म्हटलं जातं. देवी महालक्ष्मीनं बदी झाडाचं रुप घेऊन मोकळ्या जागेत तपश्चयेर्ला बसलेल्या विष्णूवर संरक्षक कवच धरलं होतं. त्यामुळे या जागेला बदीनारायण असंही म्हणतात. या बदीनारायणाची मूतीर् शाळिग्रामामध्ये घडवण्यात आली आहे. बदीनाथाचं मंदिर सुमारे दोन शतकांपूवीर् गढवालच्या महाराजांनी बांधलं. मंदिराचं गर्भगृह, दर्शन मंडप आणि सभामंडप असे तीन भाग आहेत. मंदिरात कुबेर, गरुड, नारद, नारायण, महालक्ष्मी, आदी शंकर, रामानुजन गुरु-शिष्य परंपरा यांचंही दर्शन होतं. केदारनाथाचं मंदिर मात्र हजारो वर्षं जुनं आहे. ते आदी शंकराचार्यांनी बांधलं असं म्हणतात. मंदिरांच्या भिंतींवर पुराणातल्या कथा, प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरात शिरताना शिवमंदिरात असतो त्याप्रमाणे नंदीबैल आहे. मंदिर अतिप्राचिन असल्यानं त्याची वेळोवेळी डागडुजी केली जाते.

बदीनाथ-केदारनाथला केव्हाही गेलो तरी तिथे प्रसन्न, शांत वाटतंच, पण तिथल्या उत्सवांच्या काळात भाविकांच्या मांदियाळीत आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. हजारो भक्तांबरोबर देवाची आराधना करताना निर्माण होणारं भक्तिमय वातावरण निराळीच मन:शांती देऊन जातं. बदीनाथला सप्टेंबरमध्ये भलीमोठी जत्रा भरते. त्यामध्ये बदीनाथची आई माता मुतीर्ची पूजा केली जाते. बदी केदार उत्सव जूनमध्ये असतो. आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात देशभरातले कलाकार एकत्र येतात.

केदारनाथ बर्फाच्छादित पर्वतराजींनी वेढलेलं आहे. त्यामुळे मंदिरासभोवतालचा परिसर नेत्रसुखद असतो. पार्वतीनं अर्धनारेश्वराला म्हणजेच शंकराला प्राप्त करण्यासाठी केदारेश्वराची उपासना केली होती. बदीनाथाच्या दंतकथेत येणाऱ्या विष्णूनं केलेल्या आराधनेचा संदर्भ केदारेश्वराची आख्यायिका ऐकताना अधिक स्पष्ट होतो. विष्णूनं शिवलंगासमोर तपश्चर्या केली होती, असं म्हणतात. या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरानी विष्णूला देवत्त्व बहाल केलं. त्यावेळी विष्णूनं शंकराला केदारेश्वरात वास्तव्य करण्याची विनंती केली होती. त्याच्या विनंतीला मान देऊन शंकरानं इथे शिवलिंग स्थापित केलं.

बदीनाथ आणि केदारनाथ इतक्या अप्रतिम ठिकाणी वसलेले आहेत की तिकडे जाताना अन्य अनेक देवांचं दर्शन घेण्याचं पुण्य मिळतं. विविध धामिर्क स्थळांना यानिमित्त भेट देता येते. गांधी सरोवर, गौरीकुंड, वासुकी ताल, सोनप्रयाग, गुप्तकाशी, अगस्तमुनी, तप्तकुंड आणि सूर्यकुंड इथले गरम पाण्याचे झरे, पंच बदी, पंच केदार, प्रयाग, रुदप्रयाग, नंद प्रयाग, पंडुकेश्वर आदींचं दर्शन घेण्याचा योग जुळून येतो.

– गौरी देशपांडे

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “बदीनाथ-केदारनाथ

  1. Thanks For God, I like the Himachal Paradesh.

    Pls go to someboday, OM num shivayam,

  2. read the story iam so happy

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: