यावर आपले मत नोंदवा

‘रिव्हर्स मॉर्ट्गेज’साठी वयाची अट शिथिल


[ Monday, June 04, 2007 09:05:22 pm]

पतीपत्नींपैकी एकाचे वय ६० च्या खाली चालेल

म. टा. व्यापार प्रतिनिधी

तुम्ही ज्येष्ठ नागरिक अर्थात ‘सीनियर सिटिझन’ असाल आणि आयुष्याची आणखी किमान २० वषेर् समोर असतील तर आता नक्कीच कोणते तरी ‘रिर्व्हस मॉर्ट्गेज लोन’ (‘आरएमएल’) घेण्याबाबत विचार जरूर कराल. ‘रिर्व्हस मॉर्ट्गेज लोन’अंतर्गत तुमच्या मालकीचे घर (सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपटीर्) बँकेकडे वा अन्य कोणत्याही पात्र वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवून तुम्हाला दरमहा ठराविक उत्पन्न मिळविता येईल. त्याबरोबरच तुमच्या पत्नी अथवा पतीसोबत तुम्ही अशा ‘आरएमएल’चे सहकर्जदार (जॉइंट बॉरोअर) बनू शकता, जरी दोघांपैकी एकजण ६० हून कमी वयाचा असेल, तरी!

गृहकर्ज व्यवसायाची नियामक संस्था (हाउसिंग फिनॅन्स रेग्युलेटर) असलेल्या नॅशनल हाउसिंग बँकेने (‘एनएचबी’) ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरएमएल’बाबतची अट शिथील केल्याची ही घोषणा केली आहे. ‘एनएचबी’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत ‘रिर्व्हस मॉर्ट्गेज लोन’ मिळण्याच्या पात्रतेत असे कर्ज घेणाऱ्या विवाहित जोडप्यातील दोघेही ६० हून अधिक वयाचे असणे बंधनकारक होते. ही अट आता शिथील करण्यात आली असून, दोघांपैकी एका व्यक्तीचे वय ६० हून कमी असले तरी ते जोडपे ‘आरएमएल’ मिळण्यास पात्र राहील. दोघांपैकी एकजण, समजा पती, प्रॉपटीर्चा (घराचा) कायदेशीर मालक असेल आणि पत्नी सहकर्जदार असेल, पण सहमालक (‘को-ओनर’) नसेल तर पतीच्या निधनानंतर तिला मर्यादितच (कमी) रक्कम दरमहा मिळेल. ‘रिर्व्हस मॉर्ट्गेज लोन’ देणारी बँक तिला घरातून बाहेर काढणार नाही, पण तिला द्यावयाच्या रकमेत कपात मात्र करील.

मात्र या सर्व अटी असे ‘उलट गहाण कर्ज’ देतानाच करारपत्रात स्पष्टपणे नमूद केलेल्या असाव्यात, असे ‘एनएचबी’ने म्हटले आहे. ‘रिर्व्हस मॉर्ट्गेज लोन’ देणाऱ्या बँकेने अशा ‘को-बॉरोअर्स’ना घराची मालकी संयुक्त करण्यासाठी उत्तेजन द्यावे, म्हणजे दोघांपैकी एकाचे निधन झाल्यानंतर दुसरी ‘को-बॉरोअर’ व्यक्ती ही ‘को-ओनर’ही असल्याने तिला आधी ठरलेली रक्कम दरमहा सतत मिळू शकेल, असे ‘एनएचबी’ने बँकांना सांगितले आहे.

‘ एनएचबी’ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूत्रांमध्ये म्हटले आहे की, कर्जाची रक्कम ही ‘रेसिडेन्शियल प्रॉपटीर्’च्या बाजारमूल्यावर अवलंबून असेल. हे बाजारमूल्य (माकेर्ट व्हॅल्यु) ‘प्रायमरी लेन्डिंग इन्स्टिट्युशन’ने (‘पीएलआय’) केलेल्या मूल्यमापनावर, कर्जदाराच्या वयावर आणि विद्यमान व्याजदरावर अवलंबून असेल.

‘ पीएलआय’ कर्जदाराच्या कर्ज परतफेडीच्या कालावधीत त्याचा घरातील हिस्सा (इक्विटी) दहा टक्क्यांच्या खाली येणार नाही, हे पाहील. अंतिम अटींनुसार कर्जदाराला कर्जाची परतफेड मुदतीपूवीर् केल्याबद्दल (प्रिपेमेंट) कसलाही दंड भरावा लागणार नाही.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: