यावर आपले मत नोंदवा

कुलु – मनाली


कूल कुलु मोहक मनाली

[ Saturday, March 10, 2007 07:44:55 pm]

उकाडा वाढतोय. मे महिना सुरूही व्हायचाय आणि आत्ताच कोल्डड्रिंक, एसी, पंखे याची गरज वाटू लागलीय. शाळाकॉलेजेसचेही शेवटचे काही दिवस राहिले असल्यानं हिल स्टेशनला जाण्याचे वेध लागायला सुुरुवात झाली आहे. माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा नेहमीच होतात. हाकेच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणांवर उन्हाळ्यातले विकेंड घालवायचेच आहेत. मोठ्या सुटीसाठी कुलु मनाली, सिमला, चैल, फागू, कुफरी, नारकंडा, नग्गर असे अनेक ऑप्शन्स आहेत.

लेहकडे जाणाऱ्या नॅशनल हायवेच्या एका बाजूला असलेल्या दरीच्या टोकाला मनाली हे नितांतसुंदर ठिकाण आहे. अप्रतिम सृष्टीसौंदर्य, बर्फ पांघरलेली पर्वतशिखरं, रस्ताभर सोबत करणारी देवदार आणि पाईनची झाडं, छोटी छोटी शेतं, डोंगरांच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या नद्या, बियास नदी, फळझाडं… हे सगळं असल्यावर रिलॅक्स होण्यासाठी आणखी काय हवं? मनालीच्या या मोहक रूपामुळेच या परिसराला ‘भारताचं स्वित्झलँड’ म्हणतात. कुलुही तितकंच आकर्षक आहे. बियास नदीच्या बरोबर विरूद्ध बाजूला कुलु वसलंय.

कुटुंबकबिल्यासह, मित्रांच्या गोतावळ्या-सह इथे भटकंतीसाठी यावंच, पण ट्रेकर्ससाठीही हा प्रदेश आयडियल आहे. ट्रेकिंग, रॉक क्लायंबिंग, रिव्हर्स क्रॉसिंग याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर कुलु-मनालीला यावंच. त्यासाठी विविध इन्स्टिट्यूट तुमचे स्वागत करण्यासाठी

सज्ज आहेत.

पूवीर् कुलु कुलंथपीठा या नावानं ओळखलं जायचं. कुलु दसरा या सणासाठी लोकप्रिय आहे. दसऱ्यादरम्यान इथे नृत्य, संगीत, देवदेवतांच्या पालख्या अशी धमाल असते. कुलुच्या शाली आणि कॅप आवर्जून खरेदी कराव्यात.

खास आकर्षणे

रघुनाथजी टेम्पल : १७व्या शतकात राजा जगतसिंग याने अयोध्येहून रघुनाथाची मूतीर् आणून तिची इथे स्थापना केली.

सुलतानपूर पॅलेस : कुलुमधली कलाकुसर पेंटिंगच्या रूपात इथे बघायला मिळते.

पार्वती व्हॅली : इथे सल्फरमिश्रित गरम पाण्याचे झरे आहेत.

हिडिंबा टेम्पल : मनालीतलं हे मंदिर खास महत्त्वाचं आहे. धुनगिरी वनविहार जंगलाच्या मध्यावर हे चारमजली लाकडाचं मंदिर बांधलं आहे.

रोहतँग खिंड : खिंडीच्या डाव्या बाजूला दसोहर नावाचं तळं आहे. जून ते नोव्हेंबरमध्ये ही खिंड सुरू असते.

कुलु मनाली

जवळचे विमानतळ : कुलु

जवळचे रेल्वेस्टेशन : चंदीगड, जोगिंदरनगर

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : मे, जून

– डी. विशाखा

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: