यावर आपले मत नोंदवा

गाडीचा फिटनेस सांभाळूया…


[ Tuesday, April 03, 2007 04:34:50 pm] आपली गाडी अगदी फिट्ट रहावी असं सर्वांना वाटतं पण शेवटी तेही एक यंत्र आहे हे आपण विसरतो. ‘चल रही है ना, तो जाने दो’ म्हणून तिची कुरबूर दुर्लक्षित करतो. हेच दुर्लक्ष आयत्यावेळी आपलं हसं करण्यास कारणीभूत ठरतं. आपल्या गाडीची नियमित तपासणी आणि दुरुस्ती करणं हिताचंच नव्हे, तर आथिर्कदृष्ट्याही फायद्याचं ठरतं. ***************************** अर्ध्या रस्त्यात आपली फोरव्हीलर बंद पडल्यावर काय होतं हे गाडी वापरणाऱ्यांना सांगायला नकोच. …अणि तीही बापुडी, नेमकी अशा वेळी बंद पडते की जेव्हा आपण घाईत असतो किंवा एखाद्या ठिकाणी वेळेत पोहचायचं असतं. या प्रेक्षणीय प्रसंगात आपण नेहमीच गाडीला दोष देऊन मोकळे होतो. पण, शांतपणे विचार केला तर कळतं की चूक आपलीच असते. योग्य वेळी लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती. खरं तर, नियमित मेंटेनन्स हा गाडीचा ‘हेल्थ इन्शुरन्स’ आहे असं म्हणतात. गाडीची सुरक्षितता, कार्यक्षमता, इंधनाची बचत, पर्यावरणाची निगा आणि आथिर्क बचत अशा सर्वांसाठी ही नियमित निगा उपयोगी ठरते. कारण गाडीची निगा राखण्यासाठी केलेला छोटा खर्च हा दुरुस्तीसाठी कराव्या लागणाऱ्या मोठ्या खर्चापेक्षा निश्चितच कमी असतो. जर तुमची गाडी नवीन असेल तर काही वर्षांसाठी किंवा काही माइल्स ड्रायव्हिंगसाठी तिच्या मेन्टेनन्सची वॉरंटी असते. तिचा पूरेपूर फायदा करून घ्या. तसंच जर गाडीची वॉरंटी संपली असेल तर मात्र तुमच्या नेहमीच्या मॅकेनिककडून किंवा ऑथराइझ्ड सव्हिर्स सेंटरमधून गाडीचं सव्हिर्सिंग करुन घ्या. लक्षात ठेवा की आपली गाडी शानसे पळवायची असेल तर तिची योग्य ती काळजी घ्यावीच लागेल. मुंबईसारख्या शहरात ड्रायव्हिंग करणारे बऱ्याचदा प्रचंड ट्राफिकमधून आणि कमालीच्या धुळीमधून गाडी हाकत असतात. त्यामुळे अशा गाड्यांची स्वच्छता, निगा अणि दुरूस्ती वारंवार करणं आवश्यक ठरतं. तुमची गाडी जर डिझेलवर चालणारी असेल तर पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीपेक्षा तिची जास्त निगा राखावी लागते. पण याचा अर्थ डिझेलवर चालणाऱ्या गाड्या वाईट असा होत नाही. कारण नीट निगा राखली आणि उत्तम प्रतीचं डिझेल वापरलं तर तुमची गाडी कुठेच कमी ठरणार नाही. पावसाळा हा गाडी पडण्याचा हक्काचा कालावधी. तो सुखरुप पार पडावा म्हणून दर पावसाळ्यापूवीर् आपली गाडी नीट सव्हिर्स करून घ्यायला विसरू नका. त्यासाठी बऱ्याचदा गाड्यांच्या कंपन्या ‘प्रीमान्सुन सव्हिर्स कॅम्प’ आयाजित करतात. तुमच्या गाडीच्या कंपनीने अशी काही सुविधा दिली आहे का ? नाहीतर आपल्या जवळचा सव्हिर्स सेंटरवाला आहेच! गाडीची काय आणि कधी तपासणी करावी त्याबद्दल… * गाडीचे लाइट आणि टायरमधील दाब तपासणी : महिन्यातून एकदा * ऑईल आणि ऑईल फिल्टर बदलणे : ५००० किमीनंतर किंवा ३ ते ४ महिन्यानंतर * टायरचे रोटेशन आणि बॅलन्सिंग : १०००० किमीनंतर किंवा ६ ते ८ महिन्यानंतर * इंजिनाजवळचा पट्टा आणि पाइप्स तपासणे : ५००० किमीनंतर किंवा ३ ते ४ महिन्यानंतर * ब्रेकची तपासणी : १०००० किमीनंतर किंवा ६ ते ८ महिन्यानंतर * एअर फिल्टर बदलणे : २०००० ते ४००००किमीनंतर (किंवा तपासणीत दोष आढळल्यास) * इंधनाचा फिल्टर बदणे : २४००० ते १ लाख माइल्स * चाकाचा समतोल तपासणे : २०००० ते ३०००० किमीनंतर किंवा दोष आढळल्यास * कुलींग यंत्रणा तपासणे : ४०००० ते १ लाख माइल्स * इंजिन टायमिंग बेल्ट बदलणे : १ लाख किमीनंतर ५ ते ८ वर्षानंतर * वातानुकुलन यंत्रणा तपासणे : दरवर्षी थंडीनंतर – नीलेश बने

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: