यावर आपले मत नोंदवा

मानेला सावरणारी ‘दत्तमुदा’


[ Tuesday, May 08, 2007 10:44:50 pm]

‘ डॉक्टर, माझे खांदे अवघडतात, हाताच्या बोटांना मुंग्या आल्यासारखं वाटतं. अधूनमधून चक्करही येते. एक्स-रेचं निदान मानेच्या मणक्याचं दुखणं (सव्हिर्कल स्पॉण्डिलायटिस) दाखवतंय. आता मी काय करू?’ व्यवसायाने इंजिनीअर असलेली पस्तिशीची शिल्पा अस्वस्थपणे विचारत होती. नव्या युगाचा मंत्रच आहे प्रगती आणि वेग. पण या वेगानेच अनेक आजारही आपल्या शरीरात शिरतात. त्यामुळे केवळ जीवनशैलीतल्या फरकामुळे कमी वयातच अनेक आजारांनी आपल्याला ग्रासलेलं असतं.

बसण्याची आणि उभं राहण्याची अयोग्य पद्धत, खड्ड्यांतून होणारा रिक्षा-स्कुटरचा प्रवास, मान मोडून कम्प्युटरसमोर काम करणं, एकाच खांद्यावर पर्स आणि इतर पिशव्यांचा भार असणं आणि लोकलचा प्रवास आदी कारणांमुळे मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अशा आजारांपुढे मान तुकवावी लागते. यासाठी योगसाधनेला आपल्या दिनक्रमात सामावून घेतलं पाहिजे. डोक्यापासून पायापर्यंत फिटनेस मिळवायचा असेल तर सर्वप्रथम डोकं आणि धड यांना जोडणाऱ्या मानेलाच आराम दिला पाहिजे. मानेचे स्नायू, गळा, संतुलन आणि उत्तम रोगप्रतिकारक्षमतेसाठी आवश्यक थायरॉइड, टॉन्सिल्स आदी गंथी, घसा या सगळ्यांचंच आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, स्वत:च्या क्षमतांची जाणीव होऊन आत्मविश्वासाचा आनंद देणारी ‘दत्त-मुदा’ कशी करतात ते पाहू.

ही मुदा कोणीही, कुठेही, केव्हाही सहज करता येतेे.

१) कोणत्याही आरामदायक स्थितीत ताठ बसा. (साधी मांडी घालून, पाय पसरून खुचीर्वर बसलं तरी चालेल)

२) एक क्षण डोळे मिटून संपूर्ण शरीर आणि मन ताणरहित करून घ्या. अत्यंत सहज चालणाऱ्या श्वासोच्छवासाकडे लक्ष केंदित करा.

३) हळूवारपणे डोळे उघडून, डोळ्यासमोर एक बिंदू कल्पून सावकाश हनुवटी हलवत मान संपूर्णपणे शक्य तितकी उजव्या खांद्याकडे न्या.

४) क्षमतेनुसार अंतिम स्थितीत डोळे एका बिंदूवर स्थिर ठेवा व हलकेच मिटून घ्या. चार-पाच श्वास आपल्या क्षमतेनुसार या मुदेत राहिल्यावर हळूहळू डोळे उघडून हनुवटी हलवत मान पूर्ववत सरळ करा.

५) याच पद्धतीने हनुवटी संपूर्णपणे डाव्या खांद्याकडे नेत मान पूर्णपणे डावीकडे वळवा. थोडे क्षण थांबून मान पुन्हा सरळ करा.

६) हनुवटी गळ्यापासून वर उचलून संपूर्णपणे मागे जाऊ द्या व मानेचे स्नायू शिथील करून डोकं पाठीकडे येऊ द्या. अंतिम स्थितीत दृष्टी भुवयांवर केंदित करा आणि डोळे मिटून घ्या. काही क्षणांनंतर डोकं वर उचलून मान पूर्ववत सरळ करा.

आता ‘दत्तमुदे’चं एक आवर्तन पूर्ण झालं. याच स्थितीत हनुवटी पूर्णपणे गळ्याजवळ लावून मान खाली झुकवली तर या संपूर्ण क्रियेला ‘ब्रह्मामुदा’ म्हणतात. थायरॉइडच्या विकारात ‘ब्रह्मामुदा’, ‘सिंहमुदा’, ‘जिव्हाबंध’ यांचा एकत्रित अभ्यास व ‘सर्वांगासन’, ‘मत्स्यासन’ आदी योगाभ्यास लाभदायक ठरतो.

थोडक्यात महत्त्वाचं :

१) स्पॉण्डिलायसिसची तक्रार असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमुदेचा अभ्यास करावा. सांधे सैल करणारं ‘पवनमुक्तासन’, ‘शशांकासन’, ‘पद्मासन’, ‘मत्स्यासन’, पूरक आहार व औषधं आदींचा एकत्रित विचार लाभदायक ठरतो.

२) दत्तमुदा करत असताना मानेच्या स्नायूंची हालचाल होताना वेदना झाल्यास तिथेच थांबावं. खोलवर श्वास घ्यावा, सोडून द्यावा. क्षणभर थांबून पुन्हा मान पुढे हलवण्याचा सहज प्रयत्न करावा. पुन्हा थांबावं. अशाप्रकारे स्ट्रेचिंग केल्याने सरावानंतर आखडलेले मानेचे स्नायू मोकळे होऊन हालचालीतला आत्मविश्वास वाढतो.

३) डोकं सावकाशपणे वर्तुळाकार फिरवून केलेल्या मानेच्या हालचालीमुळे झटपट तणावमुक्तीचा अनुभव येतो.

४) दत्तमुदेच्या अंतिम अवस्थेतल्या सजगतेमुळे मन:शांती आणि आत्मविश्वासाचा अनपेक्षित लाभ होतो.

दत्तमुदेच्या अभ्यासकांनी या गोष्टींची काळजी घ्यावी.

१) मानेत तीव्र वेदना असताना, व्हटिर्गोचा त्रास असताना मुदेचा अभ्यास करू नये.

२) मानेला झटका देऊन हालचाल करू नये.

३) कोणत्याही टप्प्यावर श्वासोच्छवास कोंडून ठेऊ नये.

स्त्रीसौंदर्यासाठी वाढवणाऱ्या ‘सिंहमुदा’ व ‘जिव्हाबंध’ याविषयी पुढल्या सदरात.

– डॉ. मधुरा कुलकणीर्

एम.डी. (आयुवेर्द – स्त्रीरोग, योगतज्ज्ञ)

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: