यावर आपले मत नोंदवा

ओट्स चाट


[ Monday, April 02, 2007 01:13:05 am]

हेल्दी पदार्थ खाण्याकडे तुमचा कटाक्ष असेल तर दररोजच्या आहारात ‘ओट्स’चा समावेश असलाच पाहिजे. ‘ओट्समिल’ आजकाल सुपरमाकेर्ट्समध्ये सहज मिळतं. रवा, मैदा यांच्याऐवजी ओट्समिलचा वापर करता येतो. इतकंच नाही तर चाटमध्ये ओट्समिल वापरून ती चवदार आणि हेल्दी बनवता येते. दोन जणांना पुरेल इतकी ही चाट तीन ते चार मिनिटांमध्ये बनवता येते.

साहित्य : अर्धा कप ओट्स, अर्धा कप कॉर्नफ्लेक्स, अर्धा कप दही, एक उकडलेलं बटाटं, पाऊण कप उकडलेले काबुली चणे किंवा काळे वाटाणे, एक हिरवी मिरची (बारीक चिरलेले), दोन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, एक टोमॅटो (बारीक कापलेला), पाव टीस्पून सैंधव आणि लाल मिरची पावडर, पाव टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड.

गोड चटणीसाठी : एक टेबलस्पून आमचूर पावडर, दोन टेबलस्पून साखर, पाव कप पाणी, अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून भाजलेलं जिरं.

कृती : सर्वप्रथम गोड चटणी बनवून घ्या. चटणीसाठीचं सर्व साहित्य एकत्र करावं. थोडा वेळ ते शिजू द्यावं. हे मिश्रण थोडं जाड होईपर्यंत शिजवावं. ते सतत ढवळत राहावं. नंतर बाजूला ठेवावं. ओट्स एका कढईत घेऊन पाच मिनिटांसाठी मध्यम आचेवर रोस्ट करून घ्यावेत. दह्यात सैंधव (ते नसल्यास साधं मीठ घालावं) आणि लाल मिरची घालून फेटावं. आता एका मोठ्या भांड्यात बटाटं, चणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि चटणी एकत्र करावी. र्सव्ह करताना या मिश्रणावर ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स घालावेत. दोन काट्यांनी हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करावं. त्यावर भाजलेलं जिरं भुरभुरावं. ही चाट लगेच खायला द्यावी अन्यथा ती नरम होते.

– नीता मेहता

( लेखिका दिल्लीस्थित न्यूट्रिशनिस्ट आहेत)

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: