यावर आपले मत नोंदवा

पावसात गाडी नेण्यापूर्वी


 [ Wednesday, June 27, 2007 02:20:27 am]
 
 पावसाळ्यात गाडीची देखभाल करणं कठीण वाटत असलं तरी ते अत्यंत आवश्यक आहे. एरवी नियमित गाडीची काळजी घेतली जात असली तरी पावसाळ्यापूवीर् किमान एकदा तरी तिची देखभाल केली पाहिजे. दुरुस्ती आणि देखभाल वेळच्यावेळी झाली तरच पावसा-पाण्यातून गाडी न कुरबुरता सुरळीत चालू शकेल. त्यादृष्टीने या काही महत्त्वाच्या टीप्स –
 
 ………………………………….
 
 टायर : पावसात नेण्यापूवीर् तुमच्या गाडीचे टायर योग्य स्थितीत का आहेत हे तपासून घ्या. पावसाळ्यात सतत ओल्या आणि निसरड्या रस्त्यांवरून हे टायर फिरणार आहेत हे लक्षात घेऊन टायर्सची तपासणी करा. चाकं घसरून अपघात होऊ नये किंवा वारंवार हिसके बसू नयेत यासाठी टायरचा पृष्ठभाग जमिनीला पुरता टेकलेला असणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने चाकांची डेप्थ तपासा. कार टायर्सची डेप्थ दोन एमएम इतकी असावी. पावसाळ्यात चिखल, धूळ बसून टायर जाम होण्याची शक्यता असते अशावेळी एक स्पेअर बरोबर असावा. पाण्याशी संबंध आला की रबर मऊ पडतो. म्हणूनच चाकातील हवेचा दाब नियमित तपासून घ्या आणि थंड वातावरणात आवश्यक असते तेवढी हवा चाकात असूद्या. यामुळे ड्रायव्हिंग सुलभ होईल आणि चाकांचे आयुष्यही वाढेल.
 
 व्हायपर्स : गाडीला चांगल्या दर्जाचे व्हायपर लावून घ्या. व्हायपरच्या ब्लेड्स नवीन असताना चांगल्या प्रकारे काम करतात. व्हायपरचा स्मूथनेस तपासून घ्या. व्हायपरच्या ब्लेड्स टणक नसाव्यात तसेच त्याला तडा गेलेला नसावा. व्हायपरला जर तडा गेला असेल तर गाडीच्या काचेवर ओरखडे उठून काच खराब होऊ शकते. नॉर्मल, स्लो आणि फास्ट यापैकी कुठलाही वेग असला तरी व्हायपर नीट काम करताहेत हे तपासून घ्या. साध्या पाण्याने व्हायपर धुण्यापेक्षा साबणाच्या पाण्याचा वापर करा जेणेकरून व्हायपर स्मूथ राहतील.
 
 ब्रेक्स : ब्रेक्स हा सर्वात महत्त्वाचा पार्ट. वारंवार तपासणी आणि गरजेनुसार ब्रेक्स बदलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ब्रेक्स खूप घट्ट किंवा खूप सैल असता उपयोगी नाही. गाडीचा नियमित चेकअप यादृष्टीने आवश्यक ठरतो. हॅण्डब्रेक्सची सुद्धा वेळोवेळी तपासणी करून घ्या.
 
 कार फिनिशिंग : पावसाळ्यात चिखल लागून गाडीचा बाह्यरंग खराब होतो. तसेच जास्त वेळ पाण्यात राहिल्याने गाडीचा रंग उतरण्याची किंवा गंज चढण्याची भीती असते. हे टाळण्याकरीता गाडीच्या फिटिंगला अॅन्टी रस्ट कोटींग करून घ्या. गाडीच्या इंजिनचं सव्हिर्ंसिंग करून घ्या. अॅन्टी-मॉयश्चर स्प्रे किंवा सिंपली रिमुव्हिंग प्लग लावून घ्या. यामुळे गाडीवर जमणारा ओलसरपणा सहज पुसता येईल.
 
 कार इंटेरियर्स : पावसाळ्यात बऱ्याचदा पाणी गाडीच्या आत येतं. त्यामुळे कारपेट आणि फ्लोरींगमध्ये ओलावा साचून राहतो. गाडीत येणारं पाणी टिपण्याकरीता जुन्या चटया पायाखाली ठेवा. रबरी चटयांपेक्षा पावसाळ्यात फेब्रिकच्या मॅट वापराव्यात. फेब्रिकच्या चटया पाणी लवकर शोशून घेतात. गाडीच्या आतील भाग व्हॉक्युम क्लिनरने वरचेवर स्वच्छ ठेवा आणि कार परफ्युमचा वापर करा म्हणजे दमट वासाचा त्रास होणार नाही. गाडीची सीट भिजली असेल तर खिडक्या उघड्या ठेवा म्हणजे सीट लवकर वाळेल आणि बुरशी येणार नाही.
 
 कार इलेक्ट्रिकल्स : पावसाळ्याच्या दिवसात कार इलेक्ट्रिकल्सचीही काळजी घ्यायला हवी. इलेक्ट्रिकल कनेक्शन्स नीट तपासून घ्या. कनेक्शन सैल असेल तर ते बदला. बाह्य वायरी आणि इन्स्टॉलेशनचीही तपासणी करून घ्या. गाडीतील फ्युज योग्य स्थितीत आहेत का याची खात्री करून घ्या आणि एखादा जास्तीचा फ्युज जवळ बाळगा.
 
 – टॉप गियर टीम

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: