यावर आपले मत नोंदवा

साखरेचं खाणार त्याला …


[ Wednesday, June 20, 2007 07:35:04 pm]

दुपारच्या जेवणानंतर खूप झोप येत असेल तर कधी त्यामागचं कारण जाणण्याचा प्रयत्न केला आहे का? त्या जेवणात बटाटे आणि पास्ता असे पदार्थ असले तर झोप अटळ असते. कधीकधी डोनट आणि एखाद्या फळाचा ज्यूस असलेल्या ब्रेकफास्टनंतरही अशी झोप येते. जेव्हा तुम्ही साखर किंवा स्टार्च असलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाता तेव्हा खूप झोप येते. खाण्याची ही सवय अशीच चालू राहिली तर पुढे रात्रीऐवजी सकाळी किंवा दुपारीच झोपण्याची सवय घालून घ्यावी लागेल! मग आपण बऱ्याच प्रमाणात स्टार्च आणि साखरेचं सेवन करतोय, हे कसं कळणार? त्याचे हे काही निदर्शक…

१ सतत वजन वाढणं : डाएट किंवा व्यायाम करूनही वजनाचा काटा पुढेच सरकत असतो.

२ कंटाळा येणं : दुपारच्या वेळेस झोप येणं. अख्खी दुपार ‘जागेपणात’ घालवल्याचं न आठवणं.

३ नैराश्य : ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला अगोदर खूप रस होता त्या गोष्टी कंटाळवाण्या वाटणं.

४ स्मृतिभ्रंश : साध्या साध्या गोष्टी विसरणं. तुम्ही खोलीत येता पण आपण इथे कशाला आलोय, हेच तुम्हाला आठवत नाही.

५ त्वचेचा पोत बिघडणं : डोळ्याखाली मांसाचा पुंजका येणं आणि त्वचा फुगल्यासारखी वाटणं.

६ ब्लड शुगर कमी होणं : सतत भूक लागणं आणि मूड सतत बदलत राहणं.

७ उच्च रक्तदाबाचा त्रास सतत जाणवणं.

ही सर्व लक्षणं दिसत असली तरी घाबरून जाण्याचं किंवा निराश होण्याचं कारण नाही. कारण स्टार्च आणि साखरेचं सेवन आपण कमी करू शकतो.

यासाठी सर्वप्रथम फास्ट फूड खाणं टाळावं. कारण त्यामध्ये भरपूर प्रोसेस्ड स्टार्च, साखर, सॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्याऐवजी फळं आणि भाज्या खाव्यात. बाहेर काही खायचं झाल्यास शक्यतो सॅलडच खावं.

महिन्याचं सामान भरताना ज्या पदार्थांमध्ये भरपूर स्टार्च आणि साखर असते, असे पदार्थ घेणं टाळावं. त्याऐवजी ताजी फळं, भाज्या आणि मटण असे पदार्थ घ्यावेत. शक्य असल्यास ऑरगॅनिक (सेंदिय) पदार्थ खावेत.

फळांचे ज्यूस खरेदी करू नयेत. त्यामध्ये भरपूर साखर असते. त्यापेक्षा अख्खं फळच खावं. पास्ता खायची इच्छा झाल्यास अख्ख्या गव्हापासून बनवलेला पास्ता खावा. मल्टिग्रेनपासून बनवलेला ब्रेड खावा. ब्रेकफास्टच्या वेळी टोस्ट किंवा बिस्किट खाण्याऐवजी ताजं फळ खावं.

– मुंबई टाइम्स टीम

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: