यावर आपले मत नोंदवा

व्हेजिटेबल उपमा


[ Tuesday, April 10, 2007 07:49:46 pm]

दह्याचा शेष राहणारा भाग म्हणजे ताक. हे ताक बऱ्याचदा जेवणानंतर प्यायलं जातं. परंतु त्याचा वापर इतरही अनेक पदार्थांमध्ये करता येतो. घट्ट झाकणाच्या जारमध्ये ताक घालून ते फ्रीजमध्ये साठवता येतं. पण ते फार काळ ठेऊ नये. अशाने त्याची चव आणखी तीव्र बनते. एखादा पदार्थ बनवताना पाण्याऐवजी ताक वापरता येतं. शिवाय त्याची चव ‘चिझी’ असल्याने त्या पदार्थाची चव आणखी सुधारते. चपाती किंवा पुऱ्यांचं पीठ मळताना पाण्याऐवजी ताक घालावं. डाळ, कढी, खांडवी, उपमा, डोशाचं पीठ, रवा डोसा अशा भारतीय पदार्थांमध्ये तर केक, ब्रेड, बन, पेस्ट्री, मॅश्ड पोटॅटो, सूप, स्टॉक्स, स्ट्यूज, फ्रूट ड्रिंक्स, सॉस आदी परदेशी पदार्थं बनवताना त्यामध्येही ताक वापरता येतं.

साहित्य : पाऊण कप रवा, दोन टेबलस्पून तेल, पाव टीस्पून मोहरी, एक टीस्पून उडदाची डाळ, दोन-तीन कापलेल्या हिरव्या मिरच्या, सात-आठ कढीपत्त्याची पानं, एक मध्यम आकाराचा कांदा, आठ-दहा शेंगदाणे (भरडलेले), पावणेदोन कप ताक, एक टीस्पून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, एक टीस्पून साखर, एक मोठं टोमॅटो (गोल चकत्या कराव्यात), दोन टेबलस्पून बारीक कापलेली ताजी कोथिंबीर.

कृती : मायक्रोवेव्ह ओव्हन ‘हाय’वर ठेवावा. एका पसरट मायक्रोवेव्ह डिशमध्ये रवा घेऊन तो न झाकता तीन मिनिटं ओव्हनमध्ये भाजावा. दुसऱ्या एका बाऊलमध्ये तेल, मोहरी, उडदाची डाळ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कांदा, शेंगदाणे ह सर्व जिन्नस एकत्र करून न झाकता मायक्रोवेव्हमध्ये तीन मिनिटांसाठी शिजवावेत. नंतर त्यात ताक, लिंबाचा रस, मीठ, साखर, भाजलेला रवा घालून ते पुन्हा तीन मिनिटं ओव्हनमध्ये शिजवावं. यावेळी मात्र त्यावर झाकण द्यावं. हा उपमा चार वाट्यांमध्ये गच्च भरावा. नंतर या वाट्या प्लेटमध्ये उपड्या कराव्यात. त्यामुळे छान आकारात उपमा र्सव्ह करता येतो. खायला देताना त्यावर टोमॅटोच्या चकत्या ठेवाव्यात आणि कोथिंबीरीने सजावट करावी.

संजीव कपूर

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: