2 प्रतिक्रिया

सुडौल बांध्यासाठी…


[ Wednesday, July 04, 2007 01:03:18 am]

आपण सुंदर दिसावं कसं कोणत्या स्त्रीला वाटत नाही? सुंदर दिसण्यामध्ये बांधाही बरीच मोठी भूमिका पार पाडत असतो. शरीराच्या निसर्गदत्त ठेवणीत आपण फेरफार करू Sudaul Bandhaशकत नसलो तरी ‘आरोग्यपूर्ण प्रसन्नता’ आपल्या देहबोलीतून व्यक्त होत असेल तर आपलं व्यक्तिमत्व अधिकच आकर्षक बनतं.

योगसाधनेत वणिर्लेली विविध आसनं आपल्या हालचालीत डौलदारपणा आणतात. योगमार्गातला पुढला टप्पा अर्थातच मन:शांतिचा राजमार्ग- ‘प्राणायाम’ याची तयारी करून घेतात. दोन्ही हातांची स्थिती पर्वताप्रमाणे होत असल्याने ‘पर्वता’चं नाव प्राप्त झालेलं एक विशेष आसन म्हणचे पर्वतासन!

सुडौलपणासाठी विशेषत: बाळंतपणानंतर किंवा वाढत्या वयामध्ये स्त्रियांच्या स्तनांना येणारा बेढबपणा टाळण्यासाठी, पाठीचं दुखणं कमी करणारे, पाठीच्या नसांमधलं रक्तसंवहन सुधारणारं ‘पर्वतासन’ स्त्रियांना अत्यंत लाभदायक आहे.

या आसनात कंबरेपासून वरच्या भागातल्या स्नायूंमध्ये एक सुखद ताण निर्माण होतो. या ताणामुळे, शरीराची लवचिकता वाढते. कंटाळा, आळस यापासून सुटका होते आणि श्वसनक्षमताही सुधारते. वाढीच्या वयात मुलींनी पर्वतासन केल्यामुळे पोक काढणं कमी होते, सुडौलपणा आणि उंचीही वाढते. ऑफिसमध्ये, घरामध्ये काम करताना दोन ते तीन तासांनी अशाप्रकारे स्ट्रेचिंग केलं की फिट राहता येतं.

आसन करण्याची पद्धत :

१सर्वप्रथम पद्मासनात बसा. सुखासन किंवा साधी मांडी घालून बसलं तरी चालेल. बैठक स्थिर असणं महत्त्वाचं!

२दोन्ही हात नमस्कार मुदेत जोडून घ्या.

३मनगटापासून कोपरापर्यंतचे हात जमिनीला समांतर असतील.

४जोडलेले हात हळूहळू बेंबीपासून सरळ रेषेत वर न्या.

५छाती, गळा, ओठ, नाक, कपाळ या ठिकाणांहून क्रमाक्रमाने हात डोक्याच्याही वर जाऊ द्या.

६कोपरातून हात सरळ झाल्यावर दोन्ही कानांना हाताचा स्पर्श होईल.

७सर्व कृतीदरम्यान श्वासोच्छवास अत्यंत सहज असू द्या.

८कंबरेपासून बोटांच्या टोकांपर्यंत सुखद ताण जाणवेल, त्याचा अनुभव घ्या.

९डोळे अलगद मिटून घ्या.

१०क्षमतेप्रमाणे पाच ते दहा श्वास आसनात राहिल्यावर हळूवारपणे नमस्कार मुदेत हात पुन्हा त्याच क्रमाने खाली आणा. (या आसनाची दोन ते चार आवर्तनं करावीत.)

११हात सोडवून, पाय सोडवून जमिनीवर आरामात बसा. (पर्वतासनाच्या अंतिम स्थितीत डावीकडे, उजवीकडे वळून ट्विस्टिंगचा आनंद घेता येतो.)

सावधानी :

१२पाठीत अतिशय वेदना होत असताना हाताचे कोपरे आखडले असताना किंवा पाठीच्या दुखापतीत हे आसन करू नये.

१३आसन करताना पुढे झुकणं, शरीराची थरथर, दोन्ही हात कोपरात दुमडणं, तळवे परस्परांना जास्त दाबणं किंवा नमस्कार मुदा सोडून देणं, या साऱ्या क्रिया टाळाव्यात. ‘स्ट्रेच’ हा कधीही अतिरेकी नसावा.

– डॉ. मधुरा कुलकणीर्

लेखिका एम.डी. (आयुवेर्द-स्त्रीरोग)

आणि योगतज्ज्ञ आहेत.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “सुडौल बांध्यासाठी…

  1. महेन्द्र साहेब, माझ्या अनुदिनीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: